पुणतांब्यात शेतकऱ्यांच्या मुलींचे अन्नत्याग अांदोलन

शेतकरी कन्या उपोषण
शेतकरी कन्या उपोषण

पुणतांबा, जि. नगर ः शेतकरी संपकाळात सरकारने दिलेली अाश्वासने पूर्ण केली नाहीत. शेतकऱ्यांच्या प्रलंबीत प्रश्नांची सरकारने तातडीने सोडवणूक करावी यासह अन्य मागण्यांसाठी पुणतांबा (ता. राहाता, जि. नगर) येथे आजपासून (सोमवार) शेतकऱ्यांच्या मुलींनी अन्नत्याग अांदोलनाला सुरवात केली आहे. आज तीन मुलींनी अांदोलन सुरू केले असून उद्यापासून त्यात अनेक मुली सहभागी होणार आहेत. आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार नाही, असा निर्धारही त्यांनी बोलून दाखविला. राज्यात गेल्यावर्षी "शेतकरी संप'' करण्याची हाक पुणतांब्याहून दिली गेली. त्याचे पडसाद राज्यात पसरले. त्यातूनच राज्यात शेतकऱ्यांचा ऐतिहासिक संप झाला. त्याची वेळी सरकारने अाश्‍वासने दिली. वर्षाचा कालावधी उलटून गेला असला तरी अाश्‍वासनाची पूर्तता झाली नाही. त्यामुळे पंधरा दिवसांपूर्वीच येथून पुन्हा एकदा अांदोलनाची हाक दिलेली आहे. जनजागृती केली जात आहे. मात्र सरकार गांभीर्याने घेत नसल्याने आता येथे शेतकऱ्यांच्या मुलींनीच अन्नत्याग अांदोलन पुकारले आहे. ग्रामपंचायत कार्यालयाजवळील शेतकरी पुतळ्याचे पूजन केले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार घालून निकिता धनंजय जाधव, पूनम राजेंद्र जाधव आणि शुभांगी संजय जाधव या महाविद्यालयीन मुलींनी राष्ट्रगीत म्हणून अन्नत्याग अांदोलनाला सुरवात केली आहे.  अांदोलनाला लोकांनीही पाठिंबा दिला आहे. किसान क्रांतीचे समन्वयक किरण सुराळकर, अॅड. सुभाष जंगले, प्रशांत गार्गे, नितीन सांबारे, चंद्रकांत वाटेकर, गणेश बनकर, संभाजी गमे, प्रताप वहाडणे यांच्यासह गावकरी, शेतकऱ्यांनी कृषी कन्यांच्या अांदोलनाला पाठिंबा दिला. आज तीन मुलींनी अांदोलन सुरू केले असले, तरी उद्यापासून त्यात अनेक मुली सहभागी होणार आहेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com