Agriculture news in marathi Farmers Debt Relief Scheme releases lists in two villages | Agrowon

अकोला : शेतकरी कर्जमुक्ती योजनेत दोन गावांत याद्या जाहीर

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 27 फेब्रुवारी 2020

अकोला ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत सोमवारी (ता.२४) अकोला जिल्ह्यातील दोन गावात कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांच्या नावांची यादी पहिल्या टप्प्यात जाहीर झाली आहे.  

अकोला ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत सोमवारी (ता.२४) अकोला जिल्ह्यातील दोन गावात कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांच्या नावांची यादी पहिल्या टप्प्यात जाहीर झाली आहे.  

अकोला तालुक्यातील गोरेगाव आणि बाळापूर तालुक्यातील देगाव येथील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध झाल्या. या याद्यांनुसार ९२६ शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळाला आहे. त्यानंतर तत्काळ त्यांच्या आधार क्रमांक, बॅंक खाते क्रमांक व कर्ज खात्यातील रक्कम यांची बायोमेट्रीक पडताळणी व प्रमाणिकरण करण्यात आले. कर्जमुक्तीच्या याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी देगाव आणि गोरेगाव येथे जाऊन भेट दिली. जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे या वेळी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी पापळकर यांच्या उपस्थितीत लाभार्थ्यांची पडताळणी प्रक्रिया पार पडली. त्यानंतर त्यांना ऑनलाइन प्राप्त झालेले प्रमाणपत्र जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते व उपस्थितीत वितरित करण्यात आले. गोरेगाव व देगाव येथे याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत, अशी माहिती डॉ. लोखंडे यांनी दिली. जिल्ह्यात आत्तापर्यंत १ लाख ११ हजार २४५ शेतकऱ्यांची नावे अपलोड करण्यात आली आहेत. त्यात पहिल्या टप्प्यात ९२६ शेतकऱ्यांची यादी आज प्राप्त झाली. त्यातील आज ३१३ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण यशस्वी झाले.

 पडताळणी न झाल्यास काय कराल?
काही शेतकऱ्यांना बायोमेट्रीक पडताळणी होण्यास अडचण निर्माण झाल्यास ( बोटाचे ठसे न जुळणे ) अशा शेतकऱ्यांनी पडताळणीसाठी तहसीलदारांकडे जावे. तर ज्या शेतकऱ्यांना कर्जखात्यातील रकमेबाबत वा बॅंक खात्याबाबत पडताळणी होत नसेल अशांनी मात्र जिल्हास्तरीय समितीकडे जावे, असे जिल्हास्तरीय समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे यांनी सांगितले.


इतर बातम्या
विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची ओवाळली आरतीअकोला ः ग्रामीण भागात ‘कोरोना’ची धास्ती वाढलेली...
शेतकरी कंपन्यांचाही ‘ई-नाम’मध्ये समावेश नवी दिल्ली: केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर...
राज्यात उन्हाचा चटका वाढला पुणे: एप्रिल महिना सुरू होताच राज्यात उन्हाच्या...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात केळी...नांदेड : लॅाकडाऊनमुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे....
पिंपळगाव बसवंत बाजार समितीत ३० हजार...नाशिक: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मजुरटंचाई...
आंब्याची वाहतूक, वितरण व्यवस्थेतील...मुंबई : एप्रिलपासून आंब्याचा हंगाम सुरू झाला आहे...
कोल्हापुरात वाहतुक बंदीचा रेशीम कोषाला...कोल्हापूर : वाहतूक बंद असल्यामुळे शेतकऱ्यांचे...
मुख्यमंत्री साहायता निधीसाठी ‘कृषी’च्या...नाशिक: कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे...
खानदेशात कडब्याच्या दरांवर दबाव जळगाव : खानदेशातून परराज्यासह इतर जिल्ह्यांत कडबा...
मदत व पुनर्वसन मंत्री देणार ४० हजार...चंद्रपूर ः खऱ्या अर्थाने पालकत्वाची जबाबदारी पार...
खानदेशात धान्याची शिवार खरेदी, मार्केट...जळगाव : खानदेशात धान्याची शिवार खरेदी बंद आहे....
भंडारा बॅंक देणार १५ एप्रिलपासून...भंडारा ः ‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव...
कोल्हापुरात तीस हजार ऊस तोडणी कामगार...कोल्हापूर: जिल्ह्यातील सुमारे तीस हजार ऊस तोडणी...
नंदुरबार जिल्ह्यात पपईची कवडीमोल दराने...नंदुरबार : लॉकडाऊनचा फटका सर्वसामान्य...
कोरोनामुळे कृषी पर्यटन व्यवसाय अडचणीत सातारा : कोरोनाच्या संसर्गामुळे दिवसेंदिवस बळी...
जळगाव जिल्ह्यातील बॅंका पीक कर्ज...जळगाव : जिल्ह्यात अपवाद वगळता बॅंकांनी नव्याने...
हिंगोलीत एका व्यक्तीचा कोरोना चाचणी...हिंगोली : हिंगोली येथील जिल्हा रुग्णालयात भरती...
संकटावेळी तरी पंतप्रधानांनी गंभीर...मुंबई : देशात कोरोना विषाणूने थैमान घातले असून...
‘कोरोना विरोधात जाणिवेसाठी रविवारी...पुणे : ‘‘कोरोना विरोधात उभारलेल्या लढ्याची...
कोरोनाच्या निदानासाठीच्या ‘मायलॅब'ला...पुणे ः देशातील कोरोनाच्या प्रत्येक रुग्णाच्या...