agriculture news in marathi, farmers demand to give full compensation, satara, maharashtra | Agrowon

सातारा : पंचनाम्याचा फेरा नको; सरसकट मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी

टीम अॅग्रोवन
सोमवार, 11 नोव्हेंबर 2019

सातारा  ः जिल्ह्यात पावसाने अक्षरश: थैमान घातले. महापूर, अतिवृष्टीच्या तडाख्यातून शेतकरी सावरतोय, तोच पुन्हा मॉन्सूनोत्तर पावसाने हातातोंडाला आलेली पिके वाहून गेली. त्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे मदतीकडे लागले आहेत. पण, काळजीवाहू सरकार केवळ पंचनाम्यांचा बागुलबुवा करण्यात मश्गूल आहे. पंचनाम्यांचा फेरा नको; तर सरसकट मदत द्या, अशीच मागणी हतबल शेतकरी करत आहेत. 

सातारा  ः जिल्ह्यात पावसाने अक्षरश: थैमान घातले. महापूर, अतिवृष्टीच्या तडाख्यातून शेतकरी सावरतोय, तोच पुन्हा मॉन्सूनोत्तर पावसाने हातातोंडाला आलेली पिके वाहून गेली. त्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे मदतीकडे लागले आहेत. पण, काळजीवाहू सरकार केवळ पंचनाम्यांचा बागुलबुवा करण्यात मश्गूल आहे. पंचनाम्यांचा फेरा नको; तर सरसकट मदत द्या, अशीच मागणी हतबल शेतकरी करत आहेत. 

जिल्ह्यात गेल्या चार महिन्यांत झालेल्या पावसामुळे शेती होत्याची नव्हती झाली. खरीप हंगामाला सुरुवातीपासूनच अडचणींचा सामना करावा लागला. उशिरा पावसाच्या आगमनाने पेरण्याही उशिरा झाल्या. जिल्ह्यात तीन लाख चार हजार ८१० हेक्‍टरवर म्हणजेच ८६ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या. ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने कृष्णा, कोयना नद्यांना महापूर आले. बहुतांश नद्यांनी पूर मर्यादा ओलांडल्या होत्या. त्यामुळे नदीकाठची शेती पाण्याखाली गेली. तसेच अतिपावसामुळे शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने पिकांचे नुकसान झाले. ऑगस्टपर्यंत कृषी विभागाने केलेल्या पंचनाम्यांत २८ हजार हेक्‍टर क्षेत्र बाधित झाले होते. या झालेल्या नुकसानीची आजवर मदत मिळालेली नाही. अतिवृष्टीमुळे खचलेला शेतकरी स्वतःला सावरतोय, तोच ऑक्‍टोबर महिन्यात पिके काढणीला आली असतानाच मॉन्सूनोत्तर, तसेच वादळी पावसाने झोडपून काढले. या नुकसानीने शेतकरी पुरता कोलमडला आहे. पहिले पंचनामे पूर्ण होताच आता दुसऱ्या नुकसानीच्या पंचनाम्यांचे कामकाज सुरू झाले आहे.

सरासरी चार गावांसाठी एक कृषी सहायक कार्यरत आहे. प्रत्येक गावात शेकडो एकर जमिनी असून, बहुतांश शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करणे, शेतकऱ्यांकडून अर्ज भरून घेणे या कामांसाठी ते कसे पुरणार? निवडणुकीच्या कामासाठी सर्वच प्रशासन दावणीला बांधले जाते, मग शेतकऱ्यांच्या मदतीसाठी का प्रशासन झटून काम करत नाही, असा सवाल केला जात आहे. बहुतांश शेतकऱ्यांचा शेती हाच आर्थिक आधार असतो. आधीच त्याला फटका बसलेला आहे. अनेकांचे सोयाबीन, भुईमूग, भात आदी पिके वाया गेली. काहींनी सोयाबीन काळे पडले असतानाही कुटुंबाला थोडाफार आर्थिक हातभार लागण्यासाठी निम्म्या दराने विक्री केली.

सततच्या पावसामुळे मशागतीची, भांगलणीची कामे करता आली नाहीत. त्यामुळे उत्पन्नापेक्षा पीक काढणीचा खर्च जादा झाला. अनेक शेतकऱ्यांनी रब्बीची पेरणी करण्यासाठी नुकसान झालेली पिके काढली आहेत. अतिपावसामुळे काहींच्या शेतात पिकेच राहिली नाहीत. त्यामुळे पिकेच नाही, तर पंचनाम्यात दाखवू काय? अशी स्थिती शेतकऱ्यांची झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात गुरुवारअखेर २८ हजार ६३७ हेक्‍टरवर नुकसान झाल्याचे नजरअंदाज पाहणीत दिसून आले आहे. पंचनाम्याचे काम सुरू असून, नुकसानीच्या आकडेवारी वाढ होणार आहे. 
 
महसूल, ग्रामविकास विभागाचे दुर्लक्ष 
ऑगस्टमध्ये ग्रामसेवकांचे कामबंद आंदोलन सुरू होते. तोपर्यंत विधानसभा निवडणुकीचे कामकाज सुरू झाल्याने महसूल प्रशासन त्यात व्यस्त झाले. त्या वेळीही कृषी विभागाने पंचनामे करण्याचे काम केले. आता पुन्हा एकदा पंचनाम्यांचे काम सुरू असताना महसूल, ग्रामविकास विभागाकडून केवळ ‘फौजदारकी’चे कामकाज सुरू असल्याची टीका होताना दिसत आहे. त्यांचे कार्यालयातून कामकाज सुरू असल्याने शेतकऱ्यांत अन्याय होण्याची भीती आहे. 

‘सरसकट मदत द्या’
कृषी विभागाकडून पंचनाम्याचे काम सुरू आहे. जिल्ह्यात तीन लाख हेक्‍टरहून अधिक क्षेत्रावर खरिपाच्या पेरणी झाल्या आहेत. शासकीय अधिकारी, कर्मचारी सर्वच शेतांच्या बांधावर जातील, याला मर्यादा आहेत. शिवाय, सर्वच शेतकऱ्यांना स्वत: अर्ज करणे जमेल, असे नाही. तसेच वाया गेलेली पिकेही शेतातून काढली आहेत. अनेकांच्या पिकांच्या उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष पेरणी आणि नुकसानीचे क्षेत्र यामध्ये मोठी तफावत होण्याची दाट शक्‍यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी, अशी मागणी पुढे येत आहेत. 


इतर ताज्या घडामोडी
नांदेड, परभणी, हिंगोलीत जून, जुलैमध्ये...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ६९...
औरंगाबाद, जालन्यातील दोन मंडळांत...औरंगाबाद : औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील दोन...
नांदेडमधील आठ केंद्रांत अडीच लाख...नांदेड : जिल्ह्यातील सात केंद्रांवरील शेतकऱ्यांची...
सोयाबीनमध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा...अंबड, जि. जालना  ः ‘‘सर्व शेतकऱ्यांनी...
नगर जिल्ह्यात १३२ टक्के पेरणीनगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाला....
खानदेशात ‘किसान सन्मान’चे अर्ज प्रलंबित...जळगाव  ः खानदेशात सुमारे सव्वालाख शेतकरी...
शेतकऱ्यांची कृषिमंत्र्यांना दोन हजार...जळगाव : केंद्र सरकारच्या हवामानावर आधारित फळ...
खानदेशात हलक्या जमिनीतील पिके संकटातजळगाव  ः खानदेशात मागील आठ ते १० दिवसांपासून...
जळगाव जिल्ह्यातील मका, ज्वारीची खरेदी...जळगाव : शासकीय मका, ज्वारी खरेदी पुन्हा सुरू...
माळेगाव कारखान्याचे अकरा लाख टन ऊस...माळेगाव, जि. पुणे ः माळेगाव सहकारी साखर...
अकोला कृषी विद्यापीठातील क्वारंटाइन...अकोला ः डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील...
नाशिक जिल्ह्यात चार हजारांवर शेतकरी मका...नाशिक : बाजारात व्यापाऱ्यांकडे खरेदी होणाऱ्या...
वीज बिल माफीसाठी सोमवारी राज्यभर धरणेकोल्हापूर : दरमहा ३०० युनिटसच्या आत वीज वापर...
कोल्हापूर जिल्ह्यात पुरेशा पावसाअभावी...कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून...
पीकविमा भरण्यासाठी मुदतवाढीची मागणीअकोला ः पीकविमा पोर्टल व्यवस्थित न चालल्याने अनेक...
पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये कृत्रिम...रत्नागिरी : उच्च प्रतीची वंशावळ तयार करण्यासाठी...
कपाशीवरील फुलकिडे, पांढऱ्या माशीचे...फुलकिडे : ही कीड फिकट पिवळसर रंगाची असून अत्यंत...
सेंद्रिय शेतीबाबत शरद पवार घेणार बैठकपुणे ः राज्यातील सेंद्रिय व रासायनिक अवशेषमुक्त...
यवतमाळ जिल्ह्यात चार लाख शेतकऱ्यांनी...यवतमाळ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पीक विमा...
कपाशीवरील किडींचे कामगंध सापळ्याद्वारे...पिकातील किडीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड...