द्राक्षबागांचे पंचनामे करण्याची मागणी

द्राक्ष नुकसान
द्राक्ष नुकसान

पुणे ः गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे द्राक्ष फळपिकांचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने द्राक्ष फळपिकांचे पंचनामे करून शासनाने त्वरित तीन लाख रुपयांची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी द्राक्ष उत्पादक संघाचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे. जितेंद्र बिडवई म्हणाले, की अवेळी पावसामुळे दरवर्षी द्राक्षबागांचे कमी-अधिक प्रमाणात नुकसान होते. ही बाब विचारात घेऊन शासनाने हवामान आधारित फळपीक विमा योजना लागू केली आहे, ही शेतकऱ्यांसाठी चांगली बाब आहे. दरवर्षी मृग व आंबिया बहरांकरिताही योजना लागू केली जाते. चालू वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१९ मध्येही राज्यात अनेक ठिकाणी अवेळी पावसामुळे द्राक्षबागांची अपरिमित हानी झालेली आहे. अद्यापही पाऊस पडत आहे. जुन्नर, आंबेगाव, दौड, इंदापूर आणि बारामती तालुक्यांत मोठ्या प्रमाणात अवेळी पावसामुळे द्राक्ष बागांचे नुकसान होऊन शेतकरी हवालदिल आहे. २०१७-१८ व २०१८-१९ मध्ये आंबिया बहर फळपीक विमा योजनेअंतर्गत द्राक्ष पिकासाठी अवेळी पाऊस या हवामान धोक्यासाठी १६ ऑक्टोबर, डिसेंबरअखेर संरक्षण देण्यात आले होते. ते अनुक्रमे प्रतिहेक्टर २०१७-१८मध्ये दोन लाख ८० हजार रुपये, तर २०१८-१९ मध्ये तीन लाख ८ हजार रुपये होते. या दोन्ही वर्षी शासन निर्णय २८ सप्टेंबर रोजी निर्गमित झाला होता. त्याचा फायदा शेतकऱ्यांना चांगलाच झाला होता.  चालू वर्षी ३१ ऑक्टोबरपर्यंत फळपीक विमा योजनेचा शासननिर्णय निघालेलाच नाही. त्यामुळे चालू वर्षी जुन्नर, आंबेगाव, इंदापूर, बारामती, दौंड तालुक्यांत ऑक्टोबर महिन्यात अवेळी पावसाने द्राक्षाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊनही शेतकऱ्यांना कोणतेही विमा संरक्षण मिळालेले नाही. शासनाने महावेळ प्रकल्पाअंतर्गत प्रत्येक महसूलमध्ये स्वयंचलित हवामान केंद्र बसवलेले आहे. त्यामधील माहितीचा उपयोग तर करावाच; पण प्रत्यक्ष गावागावांमध्ये पडलेल्या पावसातदेखील खूप फरक आहे. या ऑक्टोबर २०१९ मधील पावसाने द्राक्ष उत्पादकांचे मोठे नुकसान झाले असून, फवारणी खर्च वाढूनही १०० टक्के नुकसान झाले आहे. तरी शासनाने बाधित द्राक्ष बागांचे सर्वेक्षण पंचनामे करून आम्हा शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर तीन लाख रुपयांची नुकसानभरपाई द्यावी, अशी आमची मागणी आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com