मोहफुलांच्या संकलनावरील बंदी उठवावी; शेतकऱ्यांची मागणी

मोहफुलांच्या संकलन तसेच प्रक्रिया उद्योगावरील बंदी उठवावी
मोहफुलांच्या संकलन तसेच प्रक्रिया उद्योगावरील बंदी उठवावी

भंडारा : पूर्व विदर्भातील भंडारा व गोंदिया जिल्ह्यात मोहफुले रानमेवा म्हणून ओळखले जाते. अनेक पिढ्यांपासून येथील शेतकरी व गरीब वर्ग त्याचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात करीत असतात. मात्र, शासनाने मोहफुलांच्या संकलन तसेच प्रक्रिया उद्योगावरील बंदी उठवावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर जंगल आहे. या जंगलात मोहाची  झाडे आहेत. या पैकी १० टक्‍के झाडे ही जंगलात आढळतात. उर्वरित झाडे ही शेतजमिनीवर आहेत. मोहाच्या झाडांना जानेवारी ते मे महिन्यात फुले येतात. झाडाखाली पडणारी फुले गोळा करून घरी आणून वाळवून त्यांची विक्री केली जाते. या झाडाची पाने पत्रावळी बनविण्यासाठी उपयोगात येतात. फळापासून तेल काढले जाते. एक मोहाचे झाड अंदाजे पाच हजार रुपयांचे उत्पन्न दरवर्षी देते. या येथील जनतेला फार मोठे आर्थिक पाठबळ मिळते. मोहफुलापासून तयार केलेल्या राबीचा उपयोग या पूर्वीचे लोक जेवणात करीत होते. या राबीपासून लाडू, पापड्या, लोणचे आदी पदार्थ बनविले जातात. तसेच मोहफुलांमध्ये औषधीगुण असल्यामुळे गायी, बैल, म्हशी आदींना खायला दिले जाते, असे शेतकरी सांगतात.  मोहफुलात औषधी गुण मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे प्रक्रिया उद्योग सुरू करून त्यातून स्थानिकांना रोजगार प्राप्त होऊ शकतो. छत्तीसगड व मध्य प्रदेश मध्ये मोहफुलाचा प्रक्रियेवर उद्योग उभारण्यात आल्याने त्यातून स्थानिकांना रोजगार मिळाला आहे. आता पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली याजिल्ह्यात मोहफुलाचे संकलनावरील तसेच वाहतुकीची बंदी हटली तर त्यातून हजारोंचे रोजगार प्राप्त होऊ शकतात. पूर्व विदर्भात मोहफुलापासून औषधी व इतर निर्मितीचे कारखाने नाहीत, असे कारखाने उघडून सरकारने मान्यता दिल्यास मागासलेल्या पूर्व विदर्भातील लोकांना काही प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊ शकेल, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com