agriculture news in marathi, farmers demand to lift ban on Moha flowers | Page 2 ||| Agrowon

मोहफुलांच्या संकलनावरील बंदी उठवावी; शेतकऱ्यांची मागणी

टीम अॅग्रोवन
शनिवार, 31 मार्च 2018

भंडारा : पूर्व विदर्भातील भंडारा व गोंदिया जिल्ह्यात मोहफुले रानमेवा म्हणून ओळखले जाते. अनेक पिढ्यांपासून येथील शेतकरी व गरीब वर्ग त्याचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात करीत असतात. मात्र, शासनाने मोहफुलांच्या संकलन तसेच प्रक्रिया उद्योगावरील बंदी उठवावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

भंडारा : पूर्व विदर्भातील भंडारा व गोंदिया जिल्ह्यात मोहफुले रानमेवा म्हणून ओळखले जाते. अनेक पिढ्यांपासून येथील शेतकरी व गरीब वर्ग त्याचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात करीत असतात. मात्र, शासनाने मोहफुलांच्या संकलन तसेच प्रक्रिया उद्योगावरील बंदी उठवावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर जंगल आहे. या जंगलात मोहाची  झाडे आहेत. या पैकी १० टक्‍के झाडे ही जंगलात आढळतात. उर्वरित झाडे ही शेतजमिनीवर आहेत. मोहाच्या झाडांना जानेवारी ते मे महिन्यात फुले येतात. झाडाखाली पडणारी फुले गोळा करून घरी आणून वाळवून त्यांची विक्री केली जाते. या झाडाची पाने पत्रावळी बनविण्यासाठी उपयोगात येतात. फळापासून तेल काढले जाते. एक मोहाचे झाड अंदाजे पाच हजार रुपयांचे उत्पन्न दरवर्षी देते. या येथील जनतेला फार मोठे आर्थिक पाठबळ मिळते. मोहफुलापासून तयार केलेल्या राबीचा उपयोग या पूर्वीचे लोक जेवणात करीत होते. या राबीपासून लाडू, पापड्या, लोणचे आदी पदार्थ बनविले जातात. तसेच मोहफुलांमध्ये औषधीगुण असल्यामुळे गायी, बैल, म्हशी आदींना खायला दिले जाते, असे शेतकरी सांगतात. 

मोहफुलात औषधी गुण मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे प्रक्रिया उद्योग सुरू करून त्यातून स्थानिकांना रोजगार प्राप्त होऊ शकतो. छत्तीसगड व मध्य प्रदेश मध्ये मोहफुलाचा प्रक्रियेवर उद्योग उभारण्यात आल्याने त्यातून स्थानिकांना रोजगार मिळाला आहे. आता पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली याजिल्ह्यात मोहफुलाचे संकलनावरील तसेच वाहतुकीची बंदी हटली तर त्यातून हजारोंचे रोजगार प्राप्त होऊ शकतात. पूर्व विदर्भात मोहफुलापासून औषधी व इतर निर्मितीचे कारखाने नाहीत, असे कारखाने उघडून सरकारने मान्यता दिल्यास मागासलेल्या पूर्व विदर्भातील लोकांना काही प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊ शकेल, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.


इतर ताज्या घडामोडी
शेतकरी अपघात विमा योजनेत कुटुंबातील...सोलापूर ः शासनाने शेतकऱ्यांसाठी गोपीनाथ मुंडे...
अकोल्यात शनिवारपासून महाराष्ट्र सिंचन...अकोला  ः  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी...
नांदेड, परभणी, हिंगोलीत करडईचा पेरा घटलानांदेड  ः नांदेड, परभणी, हिंगोली या...
सोलापूर ‘झेडपी’चे कृषी, पशुसंवर्धनच्या...सोलापूर : जिल्हा परिषदेतील चार विषय समिती...
सिल्लोडमध्ये प्रात्यक्षिकांतून लष्करी...पळशी ता. सिल्लोड : मका पिकावर लष्करी अळीचा...
हरितगृहामध्ये आर्द्रता कमी करण्यासोबत...हरितगृहामध्ये वातावरण नियंत्रणासाठी सातत्याने...
शेतकऱ्यांच्या वाटेत विमानतळाचा अडथळाजळगाव : नाइट लॅंडिंगसाठी विमानतळावरील धावपट्टीचे...
शासकीय विभागांना निधी खर्चाची ३१ मार्च...सातारा : पाच महिने निवडणुकीच्या आचारसंहितेत...
सिंचन आवर्तनांचे योग्य नियोजन करा :...नाशिक : ‘‘विभागातील रब्बी व उन्हाळा हंगामांसाठी...
खानापुरातील द्राक्ष निर्यातीच्या...सांगली : जिल्ह्यातून निर्यातक्षम द्राक्षासाठी...
‘गाव तिथे काँग्रेस’ अभियान राबविणार ः...मुंबई : राज्यात काँग्रेस पक्षसंघटना मजबूत...
परभणी जिल्ह्यात महसूल मंडळे अधिसूचित...परभणी : जिल्ह्यातील महसूल मंडळांची पुनर्रचना...
अशी करा पपईची लागवडपपई लागवड वर्षभर मुख्यत्वे जून-जुलै, सप्टेंबर-...
नियोजन कलिंगड लागवडीचेकलिंगड लागवडीसाठी हलकी, पोयट्याची, वालुकामय,...
नवीन द्राक्ष बागेमध्ये रिकट घेण्याचा काळसध्या वातावरण कमी होत असून, काही ठिकाणी ढगाळ...
हिंगोली जिल्ह्यात ज्वारीवर लष्करी अळीचा...हिंगोली : जिल्ह्यातील रब्बी ज्वारीवर अमेरिकन...
मंत्रिमंडळ बैठकीत ‘स्मार्ट’ प्रकल्पाचे...मुंबई : राज्यातील कृषी व कृषिपूरक व्यवसायाशी...
असे करा संत्रा बागेत आंबिया बहरासाठी खत...संत्रा-मोसंबी बागेपासून आर्थिक उत्पादन...
कृषी सल्लावाल  फुलोरा अवस्था वाल पिकावरील शेंगा...
जळगावात आले २४०० ते ४८०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. १५...