शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या कालबद्धरित्या सोडवणार: मुख्यमंत्री

शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या कालबद्धरित्या सोडवणार: मुख्यमंत्री
शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या कालबद्धरित्या सोडवणार: मुख्यमंत्री

मुंबई : या शिस्तबद्ध मोर्चेकऱ्यांच्या सगळ्या मागण्या कालबद्धरितीने सोडवू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिले. आज कामकाज सुरू झाल्यावर विधानसभेचे सदस्य पतंगराव कदम यांच्यावरील शोक प्रस्ताव हेच कामकाजात होते. तरीही काही विशेष बाब म्हणून मुख्यमंत्री यांनी ठोस निवेदन करावे, अशी मागणी विरोधी पक्षातील सदस्यांनी शेतकरी मोर्चाच्या बाबातीत केली. यावर मुख्यमंत्री म्हणाले ,विशेष बाब म्हणून विचार मांडले आहेत..मोर्चा नाशिकपासून मुंबईत हा मोर्चा आला. नाशिकचे पालकमंत्री गिरीश माहाजन यांनी चर्चा केली मात्र ते ठाम होते, त्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चा काढला ते सर्व्हिस रोडने ते आले, परिक्षा असल्याने ते पुन्हा चालत आले. त्यांचे विषय महत्त्वाचे असल्याने त्यांना सर्वाचा पाठिंबा आहे. आम्ही सरकार असल्याने समर्थन देऊ शकत नाही तर प्रश्न  सोडवू. आम्ही समिती निर्माण केलीय. ती कालबद्ध पद्धतीने त्यांच्या मागण्या पूर्ण  करू. त्यांना मी एक वाजता वेळ दिली आहे.

यापुर्वी विधानसभेतील विरोधी पक्षनेते म्हणाले, की शोक प्रस्ताव महत्त्वाचा असला तरी शेतकरी मोर्चाही महत्वाचा आहे. सरकारने या गरीब शेतकऱ्यांच्या मागण्यांवर आजच निर्णय घेऊन त्यांना न्याय द्यावा. यानंतर अजित पवार म्हणाले, की नाशिकचे पालकमंत्री या मोर्चेकऱ्यांना सहा दिवसापूर्वी भेटले होते. तर त्यांनी त्या दिवशीच त्यांच्याशी चर्चा करून हा प्रश्न सोडवायला पाहिजे होता. ते पायी अनवाणी चालत आज मुंबईत धडकले अहेत. यानंतर शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ट नेते गणपतराव देशमुख म्हणाले, की हा निर्धार मोर्चा आहे. सरकारने या शेतकऱ्यांचे प्रश्न ताबडतोब सोडवावेत. कारण त्यांनी निर्धार केला आहे. त्यामुळे ते मुंबईततून हलणार नाहीत. त्यामुळे मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न  निर्माण होईल.सरकारने समिती नेमली असली तरी ताबडतोब निर्णय घ्यावा. यानंतर शिवसेनेचे शंभुराज देसाई म्हणाले, की या मोर्चेकऱ्यांना शिवसेनेने पाठिंबा दिला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पहिल्यापासून शेतकऱ्यांच्या हिताची काळजी घेतात. त्यामुळे सरकारने ताबडतोब सर्व मागण्या मान्य कराव्यात. आमचे गटनेते एकनाथ शिंदे, नेते आदित्य ठाकरे यांनी काल भेट देऊन ते मोर्चात चालत आले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com