पपईला सव्वाआठ रुपये प्रतिकिलो दराची मागणी

पपईला सव्वाआठ रुपये प्रतिकिलो दराची मागणी
पपईला सव्वाआठ रुपये प्रतिकिलो दराची मागणी

नंदुरबार : पपईच्या दराचा तिढा पुन्हा नंदुरबार व धुळे जिल्ह्यातील शिरपूर, शिंदखेडा भागात निर्माण झाला असून, शेतकऱ्यांनी आठ रुपये २५ पैसे प्रतिकिलोचा दर मिळणार नाही तोपर्यंत पपई काढणी करणार नसल्याची भूमिका मंगळवारी (ता.२९) झालेल्या बैठकीत घेतली. एवढे दर देण्यास व्यापाऱ्यांनी नकार दिला असून, पपईची काढणी बंद झाली आहे.  सध्या पपईच्या बागा अनेक ठिकाणी अंतिम टप्प्यात आहेत. दर्जेदार फळे येत आहेत, परंतु मागील १०-१२ दिवस हवे तसे दर शेतकऱ्यांना मिळालेच नाहीत. प्रतिकिलो चार ते साडेचार रुपये प्रतिकिलोचे दर शेतकऱ्यांना मिळत होते. या संदर्भात शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांबाबत तक्रारी केल्या. या तक्रारी येताच तहसीलदार यांच्या निर्देशानुसार गठीत शेतकऱ्यांच्या संघर्ष समिती व व्यापारी आणि बाजार समितीचे प्रतिनिधी यांच्यात शहादा (जि. नंदुरबार) येथे मंगळवारी सायंकाळी बाजार समितीमध्ये बैठक झाली. त्यात शेतकऱ्यांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे घनःश्‍याम चौधरी व पपई खरेदीदार, व्यापारी आदी उपस्थित होते. या बैठकीत शेतकऱ्यांकडून पपई दरांबाबत तक्रारी करण्यात आल्या. किमान आठ रुपये २५ पैसे प्रतिकिलोचा दर जागेवरच मिळावा, अशी मागणी करण्यात आली, परंतु व्यापाऱ्यांनी पावणेसहा रुपये प्रतिकिलोपेक्षा अधिक दर देण्यास नकार दिला. अपेक्षित दर मिळाला नाही म्हणून शेतकऱ्यांनी पपईची काढणी बंद करण्याचा निर्णय घेतला. हाच निर्णय शहादानजीकच्या शिंदखेडा व शिरपूर तालुक्‍यातही शेतकऱ्यांनी स्वीकारला असून, या भागातही पपईची काढणी बंद झाली आहे. बुधवारी (ता.३०) कुठेही पपईची काढणी न झाल्याने लाखो रुपयांचे व्यवहार थांबल्याचे सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com