‘एकरकमी परतफेड योजने’ला मुदतवाढीसाठी आंदोलन

‘एकरकमी परतफेड योजने’ला मुदतवाढीसाठी आंदोलन
‘एकरकमी परतफेड योजने’ला मुदतवाढीसाठी आंदोलन

नगर : छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेअंतर्गत बऱ्याच शेतकऱ्यांना एक रकमी परतफेड योजनेअंतर्गत दीड लाखावरील कर्ज रक्कम भरल्यावर दीड लाखाची कर्जमाफी मिळणार आहे. मात्र, दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक शेतकऱ्यांना पैसे भरता आले नसल्याने एक रकमी परतफेड योजनेला मुदतवाढ द्यावी, या मागणीसाठी शनिवारी (ता. १) मढेवडगाव (ता. श्रीगोंदा) येथे रयत क्रांती संघटनेतर्फे रास्ता रोको अंदोलन करण्यात आले.  शेतकरी कर्जमाफीत छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेअंतर्गत दीड लाखावरील कर्ज रक्कम एकाच वेळी भरल्यास त्यावरील रक्कम माफ केली जाण्याची योजना आहे. त्यासाठी ३१ ऑक्टोबर २०१९ ही अंतिम मुदत होती. मात्र, अनेक शेतकरी त्यासाठी पात्र झालेले आहेत. मात्र, गतवर्षी दुष्काळ यंदाची अतिवृष्टी व अन्य कारणाने अनेक शेतकऱ्यांना पैसे भरता आले नाहीत. श्रीगोंदा तालुक्यात या योजनेसाठी पात्र असलेले सहा हजार शेतकरी वंचित राहिले आहेत. त्यामुळे योजनेच्या लाभासाठी मुदत वाढवावी, अशी मागणी रयत क्रांती संघटनेतर्फे मढेवडगाव (ता. श्रीगोंदा) येथे संघटनेचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब मांडे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. मंडळाधिकारी कांबळे यांनी निवेदन स्वीकारले. आंदोलनात राजेंद्र खरात, राहुल साळवे, भाजप महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष सुवर्णा पाचपुते, माजी पंचायत समिती सभापती भैय्या लगड, प्रा. योगेश मांडे, आंबादास मांडे, निळकंट उंडे यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com