agriculture news in marathi farmers demands electricity at day for agriculture sector | Agrowon

शेतीला रात्रीची नको, दिवसा वीज द्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 डिसेंबर 2020

दौंड तालुक्यातील केडगाव येथील महावितरण विभागाने डिसेंबर महिन्याचे वीज पुरवठ्याचे वेळापत्रक जाहीर करताच तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

पुणे : दौंड तालुक्यातील केडगाव येथील महावितरण विभागाने डिसेंबर महिन्याचे वीज पुरवठ्याचे वेळापत्रक जाहीर करताच तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सद्या रब्बी हंगाम सुरू असून, अनेक ठिकाणी पेरण्या सुरू आहेत. त्यामुळे शेतीला दिवसा थ्री फेज वीज पुरवठा करा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.  

दौंड तालुक्यातील केडगाव येथील महावितरण विभागाने दर महिन्याप्रमाणे डिसेंबर महिन्याचे वीज पुरवठा वेळापत्रक जाहीर केले आहे. यामध्ये नोव्हेंबर महिन्यात शेतीसाठी एक आठवडा दिवस व एक आठवडा रात्री या वेळेत वीजपुरवठा केला जात होता. डिसेंबर महिन्याच्या नवीन वेळा पत्रकाप्रमाणे शेतीसाठी एका आठवड्यात सकाळी ७.४५ ते दुपारी ३.४५ वाजेपर्यंत व दुसऱ्या आठवड्यात रात्री ८.२५ ते पहाटे ६.२५ वाजेपर्यंत थ्री फेज वीज पुरवठा केला जाणार आहे.

 राज्य सरकार शेती आणि शेतकरी यांच्या बाबत घेतलेले काही निर्णय हे शेतकऱ्यांसाठी अडचणीचे ठरत असून, पिण्याचे पाणी व शेतीच्या पाण्यासाठी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना रात्रीचे काम करावे लागत आहे. रात्री होणाऱ्या थ्री फेज वीज पुरवठ्यामुळे शेतातील पिकांना पाणी देणे धोक्याचे ठरत आहे.

 सध्या हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे नदीकाठी तसेच शेतात मोठे गवत झाले आहे. रात्रीच्या वेळेस अशा गवतातून जाऊन कृषी पंप सुरू करून पिकांना पाणी द्यावे लागत आहे. साप, विंचू यासह हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्याला रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. उद्योग धंद्याच्या तुलनेत शेतीसाठी कमी प्रमाणात वीज दिली जाते.

दिवसाला सात ते आठ तास वीज पुरवठा उपलब्ध केली जात आहे. त्याच वेळी शेतकऱ्यांना पिकांना पाणी द्यावे लागत आहे. त्यातच अडचणीत वाढ म्हणजे दर महिन्याला विजेच्या वेळापत्रकात बदल करून शेतकऱ्यांना नाहक त्रास देण्याचे काम महावितरणकडून होत असल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे. परिणामी शेतकरी वर्ग वीजवितरण कंपनीवर तीव्र नाराजी व्यक्त करत आहे. वीजवितरण कंपनीकडून करण्यात आलेला हा बदल अजब स्वरूपाचा बदल असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत, काबाडकष्ट करून शेतकऱ्यांना या बदलामुळे जागरण करावे लागत आहे. 

प्रतिक्रिया..
औद्योगिक वसाहतीला २४ तास वीजपुरवठा केला जातो. शेतीसाठी ८ ते १० तास वीजपुरवठा केला जातो, तो पण रात्रीचा. सरकार आणि महावितरण कंपनी शेतकऱ्यांच्या जिवाशी खेळत आहे. कोरोना काळात सर्व कारखाने बंद होते. पण या वाईट काळात जगाचा पोशिंदा मात्र जगाला जगवण्यासाठी धडपड करीत होता. त्यामुळे शेतकऱ्याचे जगणे मान्य करावे. बळीराजाच्या संजीवनीसाठी सरकारने व महावितरणने दिवसा ५ तास व रात्री ५ तास वीजपुरवठा करावा.
- संदीप घोले, प्रगतशील शेतकरी, पाटस, दौंड


इतर बातम्या
औरंगाबादेत सर्वच पक्षांकडून गुलालाची...औरंगाबाद : मतदानाची प्रक्रिया शांततेत पार...
पुणे जिल्ह्यात संमिश्र निकाल; दावे-...पुणे ः जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये...
साताऱ्यात स्थानिक आघाड्यांचा जल्लोषसातारा ः दोन दिवसांपूर्वी मतदान झाले. गेले दोन...
प्रस्थापितांना दणका; तरुणाईची मुसंडी पुणे : राज्यात सोमवारी (ता. १८) ग्रामपंचायतींच्या...
नांदेड जिल्ह्यात प्रस्थापितांनी सत्ता...नांदेड : नांदेड जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे...
नाशिक जिल्ह्यात प्रस्थापितांना धक्कानाशिक : जिल्ह्यात एकूण ६२१ ग्रामपंचायतीच्या...
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या...यवतमाळ : माजी मुख्यमंत्री व जलक्रांतीचे प्रणेते...
किमान तापमानात वाढ पुणे ः राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र व...
परभणी जिल्ह्यात संमिश्र यशपरभणी ः परभणी जिल्ह्यातील मतदान झालेल्या ४९८...
भाजपचे ४४, शिवसेनेचे २२ ग्रामपंचायतीवर...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील ७० ग्रामपंचायतीपैकी...
शेतकऱ्यांच्या रॅलीबाबतचा निर्णय ...नवी दिल्ली ः विविध शेतकरी संघटनांकडून प्रजासत्ताक...
नागपुरात संत्रा दरात तेजीनागपूर ः आंबिया बहाराचा हंगाम अंतिम टप्प्यात...
सांगलीत भाजपला धक्का;  महाविकास आघाडीला...सांगली : ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालात...
गहू, तांदळाच्या दराच्या प्रश्‍नांमुळेच...माळेगाव, जि. पुणे : देशपातळीवर आणि विशेषतः...
निर्यातीची साखर वाहतूक कंटेनर अभावी...कोल्हापूर: केंद्राच्या साखर निर्यात अनुदान...
रत्नागिरीत शिवसेनेला कौल रत्नागिरी : जिल्ह्यातील ३६० ग्रामपंचायतींचे निकाल...
सोलापुरात प्रस्थापितांना धक्कासोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ५९०...
उमरेड येथील महिलांनी स्थापन केली शेतकरी...उमरेड. जि. नागपूर : शेतीमधील विषम परिस्थितीची दखल...
रंगीत कापसाचा प्रयोग यशस्वीयवतमाळ  ः शेतीचा व्यासंग जपलेल्या मारेगाव...
स्वाभिमानीचा विजयासाठी संघर्षकोल्हापूर : कोण म्हणतंय येत नाही, आल्याशिवाय राहत...