agriculture news in marathi Farmers demands sixteen rupees per kilo rate for papaya | Agrowon

पपईला १६ रुपये दराची खानदेशात शेतकऱ्यांकडून मागणी

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 17 मार्च 2020

जळगाव : खानदेशात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पपई दरांचा तिढा पुन्हा तयार असून, पपईला जागेवरच १५ ते १६ रुपये प्रतिकिलोचा दर द्यावा लागेल, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. 

खानदेशात पपईची सर्वाधिक दोन हजार हेक्‍टरपर्यंतची लागवड नंदुरबार जिल्ह्यात केली जाते. यापाठोपाठ जळगाव जिल्ह्यात लागवड असते. खानदेशात मिळून चार ते साडेचार हजार हेक्‍टरवर पपईची लागवड झाली आहे. नंदुरबारमधील शहादा, तळोदा, नंदुरबार, अक्कलकुवा, धुळ्यातील शिरपूर, शिंदखेडा, जळगावमधील चोपडा, यावल, रावेर, जामनेर, जळगाव या भागात पपईची लागवड केली जाते.

जळगाव : खानदेशात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पपई दरांचा तिढा पुन्हा तयार असून, पपईला जागेवरच १५ ते १६ रुपये प्रतिकिलोचा दर द्यावा लागेल, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. 

खानदेशात पपईची सर्वाधिक दोन हजार हेक्‍टरपर्यंतची लागवड नंदुरबार जिल्ह्यात केली जाते. यापाठोपाठ जळगाव जिल्ह्यात लागवड असते. खानदेशात मिळून चार ते साडेचार हजार हेक्‍टरवर पपईची लागवड झाली आहे. नंदुरबारमधील शहादा, तळोदा, नंदुरबार, अक्कलकुवा, धुळ्यातील शिरपूर, शिंदखेडा, जळगावमधील चोपडा, यावल, रावेर, जामनेर, जळगाव या भागात पपईची लागवड केली जाते.

पपईचे दर खरेदीदारांनी पाडले होते. नोव्हेंबरमध्ये २० रुपये प्रतिकिलोचे दर होते. नंतर १८ रुपये प्रतिकिलोचे दर झाले. यानंतर थेट आठ ते ७ रुपये प्रतिकिलो दरात पपईची खरेदी धुळे, जळगाव व नंदुरबार भागात केली जात होती. शहादा, तळोदा येथील दरांनुसार धुळे व जळगाव जिल्ह्यातही पपईची खरेदी केली जाते. दर परवडत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. नंतर बैठक होऊन १३.५१ रुपये प्रतिकिलोचा दर जागेवरच देण्याचा निर्णय झाला होता. परंतु, किमान १५ ते १६ रुपये प्रतिकिलोचा दर मिळावा, कारण यंदा पीक जेमतेम आहे. खर्च अधिक लागला. अतिपावसामुळे सुरुवातीच्या बहाराला फटका बसला, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. खानदेशात ९५ टक्के पपईची शिवार खरेदी केली जाते. शिवार खरेदी दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश व धुळे, जळगाव भागातील व्यापारी करतात.
 


इतर ताज्या घडामोडी
सकस चाऱ्यासाठी पेरा बाजरी,मकाजनावरांच्या पोषणामध्ये हिरवा चारा महत्वाचा आहे....
उन्हाळी चारा मका पिकातील लष्करी अळीचे...बऱ्याच भागांमध्ये चाऱ्यासाठी उन्हाळ्यात मका...
हवामान सुसूत्रीकरण करणारी जागतिक हवामान...पृथ्वीच्या बदलत्या वातावरणामध्ये तापमान वाढीसोबतच...
खामसवाडीतील फुल उत्पादकांना दररोज...खामसवाडी, जि. उस्मानाबाद : ऐन लग्नसराईत जरबेरा...
भंडाऱ्यात ‘बीटीबी’ भाजी बाजाराच्या...भंडारा ः ‘कोरोना’ विषाणूच्या विरोधातील शासनाच्या...
खानदेशात बाजार समित्यांमधील लिलाव...जळगाव ः खानदेशात कलिंगडाची शिवार खरेदी ठप्प...
नँचरल उद्योग समूह सुद्धा करणार...शिराढोण, जि. उस्मानाबाद ः अन्न व औषध प्रशासन तसेच...
सांगलीत खतांची दुकाने सुरू; पोलिसांची...सांगली : जिल्ह्यातील ग्रामीण भागात असणारे कृषी...
अकोल्यात पीककर्ज व्यवहारास ३१ मेपर्यंत...अकोला ः ‘कोरोना’ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या...
कोल्हापूरात कृषी निविष्ठा केंद्रे दहा...कोल्हापूर : जिल्ह्यातील कृषी निविष्ठा केंद्रे...
सोलापूर बाजार समितीतील विस्कळीतपणा कायमसोलापूर  ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत...
परराज्यातील ४५० कामगारांची...सोलापूर : लॉकडाऊनमुळे अडचणीत आलेल्या परराज्यातील...
साताऱ्यात ६५ हजार लिटर दूध संकलनाअभावी...सातारा  : ‘कोरोना’च्या पार्श्‍वभूमीवर काही...
निघोजच्या शेतकऱ्याकडून थेट ग्राहकांना...नगर  ः कोरोना विषाणू संसर्गाच्या...
मोबाईल ‘ॲप’द्वारे मिळणार कोरानाविषयीची...जिनिव्हाः जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणू...
कांदा साठवणीसाठी शेतकऱ्यांची धावपळ नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चार दिवसांपासून अवकाळी...
नगर बाजारसमितीत भाजीपाला खरेदी-विक्री...नगर  ः नगर शहरात भाजीपाला, फळांची मागणी आणि...
नगर जिल्ह्यात पावसाचा कहर सुरुचनगर ः जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून अवकाळी...
अकोल्यात भाजीपाला विक्रीची घडी...अकोला  ः कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
सूचनांचे पालन न केल्यास दंड आकारण्याचे...पुणे  ः सध्या सर्वत्र कोरोना विषाणूच्या...