Agriculture news in marathi, Farmers deprived of compensation due to lack of information in Mangalvedha taluka | Page 2 ||| Agrowon

मंगळवेढा तालुक्‍यात माहितीअभावी शेतकरी भरपाईपासून वंचित

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

बाजरी, तूर, सूर्यफुलाचा विमा भरला. बाजरी व सूर्यफुलाची भरपाई मिळाली. तुरीची मिळाली नाही. ड्रायव्हर असल्यामुळे जादा क्षेत्रातून वगळण्यात आल्याची माहिती मिळाली नाही. त्यामुळे तक्रार दाखल करता आली नाही. त्यामुळे तूर पिकाच्या भरपाईपासून वंचित राहावे लागले. वास्तविक एकूण क्षेत्र आणि विमा संरक्षित क्षेत्राचा विचार करता हे क्षेत्र जादा होत नाही. तरीही विमा कंपनीने मला वगळले. 
- तुकाराम व्हरगर, शेतकरी 

दाखल एक हजार ५२१ प्रस्ताव छाननी करून वरिष्ठ कार्यालयाला सादर केले आहेत. वरिष्ठांची मंजुरी येताच या लाभार्थींना रक्कम त्यांच्या बॅंक खात्यांवर जमा करण्यात येईल. 
- बसवराज करपे, मंडल प्रबंधक, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी, सोलापूर
 

मंगळवेढा, जि. सोलापूर : दुष्काळ आणि पावसाने तालुक्‍यातील शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीत आणले. तोच खरीप हंगाम २०१८ मधील दोन हजार ४९१ शेतकऱ्यांवर माहितीअभावी नुकसानभरपाईपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. तक्रार अर्ज दाखल केलेल्या शेतकऱ्यांनादेखील दोन महिने झाले, अद्याप भरपाई मिळाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे. 

पीकविम्यात होत असलेला गैरप्रकार लक्षात घेऊन केंद्र शासनाने पंतप्रधान पीकविमा योजना या संकेतस्थळावर खरीप व रब्बी हंगामातील पीकविमा ऑनलाइन भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. २०१८ च्या खरीप हंगामात ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडे तालुक्‍यातील विमाधारक शेतकऱ्यांना बाजरी व सूर्यफुलाचा विमा लोकसभा निवडणुकीच्या पूर्वसंध्येला आठ महिन्यांत मिळाला. परंतु, याच हंगामातील तालुक्‍यातील १६ हजारांपेक्षा अधिक तूर उत्पादक शेतकरी वंचित आहेत. 

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पूर्वसंध्येला शिवसेनेने मुंबईत केलेले आंदोलन व आमदार भारत भालके यांची लक्षवेधी, शिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर केलेल्या आंदोलनानंतर विमा कंपनीने तूर उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिहेक्‍टरी २३ हजार ९१० रुपये इतकी भरपाई त्यांच्या बॅंक खात्यांवर जमा केली. परंतु, यामधील जादा क्षेत्राच्या नावाखाली चार हजार १२ तूर उत्पादक शेतकरी वगळण्यात आले. त्याच हंगामात बाजरी व सूर्यफुलाची भरपाई देऊन तुरीची भरपाई देताना जाणून-बुजून वगळण्यात आले.

क्षेत्र जादा होत नसल्याचे पुरावे म्हणून ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या सोलापूर येथील कार्यालयात विम्याचे प्रस्ताव, सातबारा, बॅंक पासबुक आणि शेतकऱ्यांचा अर्ज दाखल केला. त्यापैकी या सर्व एक हजार ५२१ शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला. परंतु, उर्वरित २४९१ शेतकऱ्यांना या संपूर्ण प्रकाराची माहितीच नसल्याने तुरीची भरपाई मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे या शेतकऱ्यांतून संताप व्यक्त केला जात आहे. 


इतर ताज्या घडामोडी
रासायनिक खतांचा योग्य वापर महत्त्वाचापिकांना खताची मात्रा ठरविण्यापूर्वी जमिनीचे...
मका, सीताफळ, केळी, भाजीपाला पीक सल्ला (...प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्‍त...
दूध प्रश्नी मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप...नगर ः दुधाला प्रतिलिटर किमान 30 रुपये दर मिळावा...
सुपारी, आंबा, नारऴ, काजू फळबाग सल्ला (...ढगाळ व दमट वातावरणामुळे, आंब्याच्या नवीन येणाऱ्या...
राज्यात लिंबं २०० ते १६०० रूपये क्विंटलऔरंगाबादमध्ये क्विंटलला ५०० ते ७०० रुपये दर...
खानदेशात भिज पावासाने पिकांना लाभजळगाव  ः खानदेशात मागील दोन दिवस भिज पाऊस...
सोलापूर जिल्ह्यात मूगाची पाने पिवळी पडू...सोलापूर  ः जिल्ह्यात पावसाने वेळेवर हजेरी...
प्राथमिक शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या...कुसुंबा, जि. धुळे ः सर्वांत मोठा नोकर वर्ग म्हणून...
बार्शीतील रेशनच्या धान्य...सोलापूर  ः बार्शी तालुक्यातील रेशनचे धान्य...
शेत जमिनीच्या मोजणीसाठी चार हजार...सोलापूर ः पती-पत्नीच्या नावावर असलेल्या...
‘आयआयएचआर’चे बियाणे आता ऑनलाइन नाशिक : भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या बंगळुरू...
मराठवाड्यात पीक कर्जाचे ४०.८३ टक्केच...औरंगाबाद : मराठवाड्यात शेतकऱ्यांना खरीप पीक...
पुणे जिल्ह्यातील सहा धरणांत ८०...पुणे ः धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम...
सातारा जिल्हा बँकेतर्फे १३४ टक्के...सातारा : जिल्हा वार्षिक पत आराखाड्यात २०२०-२१...
जनावरांमध्ये `लंपी स्किन`चा संसर्ग नांदेड  ः अर्धापूर परिसरात गाय, बैल आदी...
नांदेड जिल्ह्यातील एक लाख ९२ हजार...नांदेड  ः यंदा जिल्ह्यातील २ लाख ६८ हजार...
ओसंडून वाहतोय आडोळ प्रकल्पशिरपूरजैन, जि. वाशीम ः दमदार पावसामुळे येथील आडोळ...
काटेपूर्णा प्रकल्प तुडुंब, पाणी साठ्यात...अकोला ः यंदाच्या मोसमात आत्तापर्यंत वेगवेगळ्या...
अकोला जिल्ह्यात युरिया खताचा वापर वाढलाअकोला ः जिल्ह्यामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत...
राधानगरी धरणाचे दोन दरवाजे खुलेचकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील...