Agriculture news in marathi Farmers deprived of insurance benefits Take action against holding companies | Page 2 ||| Agrowon

विमा लाभापासून शेतकऱ्यांना वंचित ठेवणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करा

टीम अॅग्रोवन
रविवार, 25 जुलै 2021

नैसर्गिक आपत्ती, अन्य कारणाने नुकसान होऊनही कंपन्यांकडून विमा भरलेल्या लाभापासून नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विमा कंपन्यांनी वंचित ठेवले आहे.

नगर : नैसर्गिक आपत्ती, अन्य कारणाने नुकसान होऊनही कंपन्यांकडून विमा भरलेल्या लाभापासून नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विमा कंपन्यांनी वंचित ठेवले आहे. त्यामुळे कंपन्यांवर कारवाई करावी आणि विम्यापासून वर्षभर वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना तातडीने विम्याचा लाभ देण्याबाबत विमा कंपन्यांना सूचित करावे, अशी मागणी शेतकरी मराठा महासंघाचे प्रदेश अध्यक्ष संभाजीराव दहातोंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

पंतप्रधान मोदी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, ‘‘नगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या वर्षी खरिपात अति पाऊस व इतर नैसर्गिक कारणामुळे शेतपिकांचे सातत्याने नुकसान झाले आहे. परतीचा पाऊसही जोरदार पडल्याचा शेतकऱ्यांना फटका सोसावा लागला. नैसर्गिक आपत्ती व अन्य कारणाने शेतपिकाचे नुकसान झाले तर नुकसान भरपाई मिळावी म्हणून पंतप्रधान पीकविमा योजनेत सहभागी होत शेतकऱ्यांनी पिकाचा विमा उतरला.

नगर जिल्ह्यासह राज्यातील लाखो शेतकरी या योजनेत सहभागी झाले. मात्र नुकसान होऊनही पीकविमा कंपन्यांनी अजून, नगरसह अनेक जिल्ह्यात शेतकऱ्यांना विमा योजनेचा लाभ दिला नाही. नगर येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडूनही शेतकऱ्यांना विम्याच्या लाभाबाबत वस्तुस्थिती सांगितली जात नाही. विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांवर अन्याय केला जात आहे.

कोरोनासह अनेक नैसर्गिक संकटामुळे शेतकरी अडचणीत असून, सध्याची परिस्थिती पाहता शेतकऱ्यांना पीकविमा योजनेचा लाभ मिळणे अत्यंत गरजेचे आहे, मात्र यंदाच्या खरीप हंगामातील महिनाभराचा कालावधी गेला असला तरी अजूनही गतवर्षीच्या पीकविमा योजनेचा लाभ देण्याबाबत विमा कंपन्या काहीही बोलत नाही. शेतकरी त्रस्त आहेत.``


इतर ताज्या घडामोडी
देवसंस्थांच्या जमिनीवर वहिवाटदारांचा...जेजुरी, जि. पुणे : देवसंस्थानच्या मालकीच्या...
पुरस्कारांच्या प्रस्तावावरून कृषी...अकोला : विविध पुरस्कारांसाठी शेतकऱ्यांनी दाखल...
कोयना धरणात १०१ टीएमसीवर पाणीसाठाकोयनानगर, जि. सातारा : शंभर दिवस ओलांडलेल्या...
उजनी धरणात उपयुक्त साठा ६४ टक्केच;...सोलापूर : उजनी धऱणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही...
अकोला जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा...अकोला ः जिल्ह्यात अतिपावसाने धुमाकूळ घातला असून...
राज्यात तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे...नाशिक : राज्यातील तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे...
वाशीम झेडपी निवडणुकीचा चेंडू पुन्हा...वाशीम : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रिक्त...
‘एफआरपी’च्या तुकड्यांनी शेतकरी...कऱ्हाड, जि. सातारा : एकरकमी ‘एफआरपी’चे तीन तुकडे...
हिंगोलीत मुहूर्ताच्या सोयाबीनला ११ हजार...हिंगोली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
पीक नुकसान नोंदीसाठी विमा कंपन्यांच्या...परभणी : ७२ तासांच्या आत पीक नुकसानीची नोंद...
राज्यसभेच्या एका जागेसाठी ४ ऑक्टोबरला...नवी दिल्ली : महाराष्ट्रातून राज्यसभेवर रिक्त...
गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग सज्ज; तीन...सिंधुदुर्गनगरी : घरोघरी गणेशोत्सव साजरा करण्याची...
ई-पीक पाहणीसाठी सोलापुरचे जिल्हाधिकारी...सोलापूर ः माढा तालुक्यात सुरू असलेल्या ई-पीक...
परभणी जिल्ह्यात १२७ गावे बाधितपरभणी ः जिल्ह्यात सोमवार (ता. ६) ते मंगळवार (ता....
हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूभुसावळ, जि. जळगाव : तालुक्यातील हतनूर धरणात...
संगणकीय सातबारावर कुळांची नावे नोंद करागडहिंग्लज, जि. कोल्हापूर : हस्तलिखित सातबारा...
पावसाचा २७ हजार हेक्टरला फटकानाशिक : नांदगाव तालुक्यातील झालेल्या...
सहा हजार क्विंटल धान्याचे होणार कंपोस्ट...भंडारा : वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे गेल्या...
शेतकरी पुरस्कारासाठी दाखल केलेले...अकोला : शेतीत विविध प्रयोग करणाऱ्या, उत्पादन...
एकरकमी ‘एफआरपी’साठी ‘मिस कॉल’ मोहीमकोल्हापूर : केंद्र सरकारने ‘एफआरपी’चे तुकडे...