agriculture news in Marathi farmers deprived from insurance claim Maharashtra | Agrowon

हजारो नुकसानग्रस्त दाव्यापासून वंचित 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 27 जुलै 2021

अतिवृष्टी तसेच संततधार पावसामुळे जिल्ह्यातील हजारो हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान झाले. याबाबत विमा भरलेल्या शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्तीत विमा कंपनीला ७२ तासांच्या आत कळविण्याची मुदत होती.

नांदेड : अतिवृष्टी तसेच संततधार पावसामुळे जिल्ह्यातील हजारो हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान झाले. याबाबत विमा भरलेल्या शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्तीत विमा कंपनीला ७२ तासांच्या आत कळविण्याची मुदत होती. परंतु या कालावधीत कंपनीचा टोलफ्री नंबर बंद होता. तर ई-मेलव्दारे कळविण्यासाठी शेतकऱ्यांना जमले नाही. यामुळे नुकसान झालेले हजारो शेतकरी दावे दाखल करण्यापासून वंचित राहिले आहेत. 

जिल्ह्यात जुलै महिन्यात जोरदार पाऊस झाला. यावेळी अनेकवेळा अतिवृष्टीची नोंद झाली. तसेच संततधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला. सखल भागातील शेताचे तळे झाले होते. यामुळे खरिपातील सोयाबीन, कपाशी, तूर, मुग, उडीद, ज्वारी यासह भाजीपाला व फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसानीचे प्रमाण अधिक असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी ७२ तासाच्या आत विमा कंपनीला नुकसानीबाबत कळविण्याचे आवाहन केले होते.

परंतु या कालावधीत पावसामुळे अनेक भागात वीज खंडित झाली होती. तसेच विमा कंपनीचा टोलफ्री नंबर लागला नाही. विमा कंपनीचे तालुका प्रतिनिधीही फोन घेत नव्हते. ई-मेल करण्यासाठी शेतकऱ्यांकडे यंत्रणा नसल्यामुळे हजारो शेतकऱ्यांना नुकसानीबाबत दावे दाखल करता आले नाहीत. यामुळे नुकसान होऊन अनेकांना भरपाईपासून वंचित राहावे लागणार आहे. 

प्रतिक्रिया 
अतिवृष्टीनंतर विमा कंपनीकडे क्लेम करण्यासाठी दिलेला टोलफ्री नंबर लागत नव्हता. कंपनीचे प्रतिनिधीही फोन उचलत नव्हते, यामुळे नुकसान होवूनही दावा दाखल करता आला नाही. 
- माधव कदम, शेतकरी, लिंगणकेरुर, ता. देगलूर 
 


इतर अॅग्रो विशेष
बीजोत्पादनातून साधली कुटुंबाची भरभराटसुरेश हुसे यांना वडिलोपार्जित केवळ दीड एकर शेती....
ऑनलाइन ठिबक योजनेत पुन्हा कागदपत्रांचा...पुणे : कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याची परंपरा...
सर्वदूर जोरदार पावसाची शक्यतापुणे : बंगालच्या उपसागरातील ‘गुलाब’...
प्रगतिपथावरील जलसंधारण प्रकल्प लवकर...औरंगाबाद : जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साध्य...
‘रूफटॉप सौरऊर्जे’ला कसे मिळणार बूस्टर?नागपूर ः दीर्घ खोळंब्यानंतर महावितरणने पुन्हा...
केळी, संत्रा क्लस्टरमध्ये वर्ध्याचा...वर्धा : केंद्राच्या धर्तीवर राज्याने निर्यात धोरण...
सांगलीत ३० टक्के द्राक्ष फळछाटणी पूर्णसांगली ः जिल्ह्यात यंदाच्या द्राक्ष फळ छाटणीस...
‘अलमट्टी’ची उंची वाढवू नका ः राजू शेट्टीकोल्हापूर : कोल्हापूर, सांगली व बेळगाव...
'गुलाब' चक्रीवादळ कलिंगापट्टणमनजीक...पुणे : बंगालच्या उपसागरात घोंगावणारे 'गुलाब'...
येवला बाजार समितीचा ‘अंनिस’कडून गौरवयेवला, जि. नाशिक : ६४ वर्षांची परंपरा मोडीत काढत...
सोयाबीन विक्रीची घाई नकोनागपूर : मुहूर्ताचे दर पाहून शेतकऱ्यांकडून अधिक...
‘गुलाब’ चक्रीवादळ आज पूर्व किनाऱ्याला...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
राज्यात पावसाचा जोर वाढणारपुणे : बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणालीमुळे...
साहित्य संमेलनातून वैचारिक दिशा...औरंगाबाद : साहित्य हे समाजाच्या विकासासाठी...
लहान संत्रा फळांचे करायचे काय?नागपूर : लहान आकाराच्या संत्रा फळांवर नांदेड...
दहा जिल्ह्यांत ‘कृषी तंत्रज्ञान पारायण’नगर ः फळबागा, शेतीपिके आणि पशुसंवर्धनाबाबत ऐनवेळी...
दुग्ध व्यवसायातून उंचावले शेती-...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवजे (ता. कुडाळ) येथील...
सोनपेठ तालुक्यातील शेतकरी महिलांचा...परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथे महिला आर्थिक विकास...
बंगालच्या उपसागरात घोंघावतेय चक्रीवादळपुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
शेतीसह पर्यावरणाचे संवर्धनमान्हेरे (ता. अकोले, जि. नगर) येथील तुकाराम भोरू...