खरीप पीकविम्यापासून शेतकरी वंचित

खरीप पीकविम्यापासून शेतकरी वंचित
खरीप पीकविम्यापासून शेतकरी वंचित

जळगाव  ः खरिपात पिकांचे अतिपावसाने अतोनात नुकसान झाले. शासनाने कृषी विभागाचे पंचनामे ग्राह्य धरून शेतकऱ्यांना हेक्‍टरी आठ हजार रुपये नुकसानभरपाई जाहीर केली, परंतु हेच पंचनामे ग्राह्य धरून पीकविमा कंपन्यांनी अजूनही पीक कर्जदार शेतकऱ्यांना विमा परतावे दिलेले नसल्याची स्थिती आहे.  पीकविमा योजनेचा संरक्षण कालावधी संपून ४५ दिवसांपेक्षा अधिक दिवस झाले आहेत. परंतु ही भरपाई अजूनही कंपन्यांकडून मिळालेली नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मध्यंतरी शेतकऱ्यांनी या प्रश्‍नी स्थानिक कृषी विभागाशी संपर्क केला होता. पीक कर्ज देताना संबंधित बॅंकेने पीकविमा हप्त्याची रक्कम या कर्जाच्या रकमेतून कपात केली होती. ही कपात परस्पर झाली होती. तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ही योजना ऐच्छिक स्वरूपाची होती. खासगी कंपन्यांची नियुक्ती या योजनेसाठी झाली होती. विमा कंपनीचा प्रतिनिधी शेतकऱ्यांना भेटलेला नाही. कृषी विभागात संपर्क केल्यास त्यांचा ई-मेल आयडी, फॅक्‍स क्रमांक व इतर माहिती दिली जाते. परंतु विमा परतावे केव्हा मिळतील? याची माहिती कृषी विभाग देत नाही. तसेच ज्या बॅंकेने विमा हप्त्यांची रक्कम पीक कर्जातून कपात केली आहे, त्या बॅंकेतर्फे विमा कंपनीकडे बोट दाखविले जात आहे.   

खरिपात ज्वारी, कापूस या पिकांसाठी विमा संरक्षण अधिक शेतकऱ्यांनी घेतले आहे. या दोन्ही पिकांचे ८० टक्‍क्‍यांवर नुकसान झाले आहे. आता कापूस पिकात गुलाबी बोंड अळीने ९० टक्के नुकसान केले आहे. नुकसानीसंबंधीची कार्यवाही मध्यंतरी कृषी विभागाने पूर्ण केली. त्यानुसार राज्यपाल यांनी शेतकऱ्यांसाठी तात्पुरती मदतही जाहीर केली. ही मदत किंवा मदतनिधी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा केला जात आहे. परंतु विमा परताव्याची रक्कम केव्हा मिळेल?’असा प्रश्‍न आहे.  - नाना पाटील, शेतकरी, पिंप्री खुर्द, जि.जळगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com