Agriculture news in marathi Farmers deprived of kharif crop insurance | Page 2 ||| Agrowon

खरीप पीकविम्यापासून शेतकरी वंचित

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 23 जानेवारी 2020

जळगाव  ः खरिपात पिकांचे अतिपावसाने अतोनात नुकसान झाले. शासनाने कृषी विभागाचे पंचनामे ग्राह्य धरून शेतकऱ्यांना हेक्‍टरी आठ हजार रुपये नुकसानभरपाई जाहीर केली, परंतु हेच पंचनामे ग्राह्य धरून पीकविमा कंपन्यांनी अजूनही पीक कर्जदार शेतकऱ्यांना विमा परतावे दिलेले नसल्याची स्थिती आहे. 

जळगाव  ः खरिपात पिकांचे अतिपावसाने अतोनात नुकसान झाले. शासनाने कृषी विभागाचे पंचनामे ग्राह्य धरून शेतकऱ्यांना हेक्‍टरी आठ हजार रुपये नुकसानभरपाई जाहीर केली, परंतु हेच पंचनामे ग्राह्य धरून पीकविमा कंपन्यांनी अजूनही पीक कर्जदार शेतकऱ्यांना विमा परतावे दिलेले नसल्याची स्थिती आहे. 

पीकविमा योजनेचा संरक्षण कालावधी संपून ४५ दिवसांपेक्षा अधिक दिवस झाले आहेत. परंतु ही भरपाई अजूनही कंपन्यांकडून मिळालेली नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मध्यंतरी शेतकऱ्यांनी या प्रश्‍नी स्थानिक कृषी विभागाशी संपर्क केला होता. पीक कर्ज देताना संबंधित बॅंकेने पीकविमा हप्त्याची रक्कम या कर्जाच्या रकमेतून कपात केली होती. ही कपात परस्पर झाली होती. तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ही योजना ऐच्छिक स्वरूपाची होती.

खासगी कंपन्यांची नियुक्ती या योजनेसाठी झाली होती. विमा कंपनीचा प्रतिनिधी शेतकऱ्यांना भेटलेला नाही. कृषी विभागात संपर्क केल्यास त्यांचा ई-मेल आयडी, फॅक्‍स क्रमांक व इतर माहिती दिली जाते. परंतु विमा परतावे केव्हा मिळतील? याची माहिती कृषी विभाग देत नाही. तसेच ज्या बॅंकेने विमा हप्त्यांची रक्कम पीक कर्जातून कपात केली आहे, त्या बॅंकेतर्फे विमा कंपनीकडे बोट दाखविले जात आहे. 
 

खरिपात ज्वारी, कापूस या पिकांसाठी विमा संरक्षण अधिक शेतकऱ्यांनी घेतले आहे. या दोन्ही पिकांचे ८० टक्‍क्‍यांवर नुकसान झाले आहे. आता कापूस पिकात गुलाबी बोंड अळीने ९० टक्के नुकसान केले आहे. नुकसानीसंबंधीची कार्यवाही मध्यंतरी कृषी विभागाने पूर्ण केली. त्यानुसार राज्यपाल यांनी शेतकऱ्यांसाठी तात्पुरती मदतही जाहीर केली. ही मदत किंवा मदतनिधी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा केला जात आहे. परंतु विमा परताव्याची रक्कम केव्हा मिळेल?’असा प्रश्‍न आहे. 
- नाना पाटील, शेतकरी, पिंप्री खुर्द, जि.जळगाव


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर, नगर जिल्ह्यांतील ‘माळढोक’चे...सोलापूर : जिल्ह्यातील नान्नज (ता. उत्तर सोलापूर)...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऊस उत्पादन घटणारसिंधुदुर्ग : जिल्ह्यात १५२० हेक्टर क्षेत्र ऊस...
सातारा जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांसाठी...सातारा  : राज्याच्या अर्थसंकल्पातून...
पीकपद्धतीनुसार शेतकरी उत्पादक कंपन्या...नाशिक  : आपल्या विभाग, जिल्ह्यातील...
राज्यात तूर्त मध्यावधी निवडणूक नाही :...मुंबई  : राज्यात तूर्तास तरी मध्यावधी...
एलईडीच्या मदतीने केल्या जाणाऱ्या...मुंबई  : समुद्रात एलईडीच्या मदतीने...
शेतीमाल विषाणूमुक्त असल्याचे प्रमाणपत्र...पुणे  ः कोरोना विषाणूबाबत देशात भीतीचे...
नगर, नाशिक जिल्ह्यात साखर उताऱ्यात दीड...नगर  ः नगर, नाशिक जिल्ह्यांत यंदाच्या गाळप...
मुंबई बाजार समिती निवडणूकीसाठी ५८...मुंबई  : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पैठण येथे होणार मोसंबी क्‍लस्टर ः ‘...पैठण, जि. औरंगाबाद  : ‘‘मोसंबीमधील लागवडीचे...
औरंगाबादेत बटाटे ८०० ते १६०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
विकासकामांमध्ये लोकसहभाग महत्त्वाचा ः...अकोला  ः ‘‘महाराष्ट्र शासन व भारतीय जैन...
वाघी खुर्द येथे तुरीची सुडी जळून खाक शिरपूरजैन  ः येथून जवळच असलेल्या वाघी खुर्द...
जळगाव जिल्ह्यात ३६९ टंचाईग्रस्त गावेजळगाव  ः जिल्ह्यात यंदा १३९ टक्के पाऊस...
'कांद्याची निर्यातबंदी हटवून हमीभाव...अमरावती  ः निर्यातबंदी हटवून कांद्याला प्रति...
वाई येथील ‘ते’ ठरलेय स्वच्छतादूतयवतमाळ : संत गाडगे महाराज यांनी हातात झाडू घेऊन...
सांगली जिल्ह्यात साखर उत्पादन नीचांक...सांगली : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी अडीच...
नगर जिल्हाभरातआवक वाढल्याने कांदा दरात...नगर : नगर कृषी उत्पन्न बाजार समितीसह जिल्हाभरात...
ढेबेवाडी खोऱ्यात रानडुकरांकडून ज्वारीचे...ढेबेवाडी, जि. सातारा : रानडुकरे आणि...
परभणीत २० हजार ६५१ हेक्टरवर ऊस लागवडपरभणी  ः यंदा (२०१९-२०) परभणी जिल्ह्यात...