agriculture news in Marathi farmers deprived from loan waive Maharashtra | Agrowon

परस्पर पुनर्गठन केल्याने शेतकरी कर्जमाफीपासून वंचित 

टीम अॅग्रोवन
रविवार, 9 ऑगस्ट 2020

येथील सेवा सहकारी सोसायटीने विश्वासात न घेता परस्पर पिककर्जाचे पुर्नगठन केल्याने ३० ते ३५ शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्तीपासून वंचित राहावे लागले आहे.

दानापूर, जि. अकोला ः येथील सेवा सहकारी सोसायटीने विश्वासात न घेता परस्पर पिककर्जाचे पुर्नगठन केल्याने ३० ते ३५ शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्तीपासून वंचित राहावे लागले आहे. याबाबत संबंधित शेतकऱ्यांना पीक कर्जाचे परस्पर पुनर्गठन झाल्याबाबत सखोल चौकशी करून न्याय देण्यात यावा, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे. मात्र यावर कुठलीही हालचाल झालेली नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. 

याबाबत तेल्हारा येथील सहायक निबंधकांना शेतकऱ्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले की, सन २०१६ ते २०१९ पर्यंत थकीत असलेल्या पीककर्जाचे विश्वासात न घेता सेवा सहकारी संस्थेने परस्पर पुनर्गठन केले. या पुनर्गठनामुळे तुटपुंज्या स्वरूपात कर्जमाफी झाली आहे. याबाबत सचिवांना विचारले असता समाधानकारक उत्तरे दिली जात नाहीत.

काही लोकांचे संमतिपत्र दाखवले परंतु त्यावरील स्वाक्षऱ्या खऱ्या नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. एकाच वेळेस सभासदांनी कर्ज काढले होते. काही सभासदांना संपूर्ण कर्जमाफी झाली. काहींचे पुनर्गठनामुळे महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेपासून वंचित रहावे लागले आहे. 

या संपूर्ण प्रकरणावरून सेवा सहकारी संस्थेने मनमानी करून जाणीव पूर्वक शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवून आर्थिकदृष्ट्या नुकसान केले जात आहे. दरवर्षीची नापिकी, गारपीट यामुळे हलाखीची परिस्थिती बनलेली आहे. त्यातच आता हा अन्याय झालेला आहे.

या प्रकरणाची तत्काळ चौकशी करून कार्यवाही करावी, अशी मागणी कमला शालीग्राम हागे प्रमिला वासुदेव पिंजरकर, गोकूळा मनोहर फोकमारे वसंता चवंडकार, भगवान ढगे, रमेश गळसकार, प्रकाश कूले, शालीग्राम हागे, गंगाधर झगडे, भिकाजी हागे, देवेंद्र सिंह सिसोदिया, सै.अयूब सै.याकूब व शेतकऱ्यांनी केली आहे.


इतर अॅग्रो विशेष
कपाशी सल्ला कपाशीच्या बोंडे सडण्याच्या समस्येवर उपाययोजना...
कोकण, खानदेशात पावसाचा धुमाकूळ पुणे ः कोकण आणि खानदेशला पावसाने झोडपून काढले....
हलका ते मध्यम पावसाची शक्यता पुणे ः कोकण, मध्य महाराष्ट्र व खानदेशात दोन...
कृषी विधेयकांविरोधात शेतकरी रस्त्यावरचंडीगड ः केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी...
नाशिकमध्ये खरीप कांदा लागवडी बुरशीजन्य...नाशिक: खरीप हंगामातील पोळ कांदा लागवडी पूर्ण...
कुलगुरू निवडीचे निकष ऐरणीवर पुणे: राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये...
काजू बागायतदारांना गंडा घालणाऱ्या...सिंधुदुर्ग: काजू बागायतदारांना जादा दराचे आमिष...
सोयाबीन ठरेल ‘मॅजिकबीन’ नागपूर: देशात यावर्षी सोयाबीन खालील क्षेत्रात घट...
ऊस उत्पादक पट्ट्यात पेरूचा यशस्वी प्रयोगसांगली जिल्ह्यातील अंकलखोप (ता. पलूस) या ऊस...
झेंडू ठरलंय हमखास उत्पन्नाचे पीकशहरी बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन मोह (ता.सिन्नर...
पावसाचा जोर ओसरणार पुणे ः गेले काही दिवस मराठवाडा, मध्य महाराष्ट्र,...
मोडून पडली काढणीला आलेली केळी औरंगाबाद: काही दिवसांत जवळपास दोन वर्ष...
निर्यातबंदीनंतरही कांदा खाणार भाव पुणे: निसर्ग चक्रीवादळात कांदा रोपवाटिकांचे...
पावसाचे धुमशान सुरुच पुणे   ः राज्यातील काही भागांत...
जळगाव जिल्ह्यात केळीचे १०० कोटींवर...जळगावः केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव...
यांत्रिकीकरण योजना सुरु, पोर्टल मात्र...नगर ः शेती अवजारांसह अन्य वैयक्तिक लाभाच्या...
निम्मे कांदा कंटेनर अद्यापही बंदरावरच नाशिक: कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाअगोदर मुंबई...
कृषी विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी...बुलडाणा : कृषी विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या...
कृषी विधेयकांमध्ये मोठा विरोधाभास ः शरद...मुंबई : कृषी विधेयकांवर राज्यसभेत दोन ते तीन दिवस...
तुरीचे दर प्रतिक्विंटल सहा हजारांवरनागपूर : स्थानिक प्रक्रिया उद्योजकांकडून मागणी...