Agriculture news in marathi To the farmers of Devikhindi Waiting for the water of ‘Tembhu’ | Agrowon

देवीखिंडीच्या शेतकऱ्यांना ‘टेंभू’च्या पाण्याची प्रतीक्षा

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 25 नोव्हेंबर 2021

लेंगरे, जि. सांगली : टेंभूच्या चौथ्या, पाचव्या टप्प्यानंतर पूर्ण होऊन अखेर टेंभूचे पाणी घाटमाथ्यावर पोहोचले. देवीखिंडी भिकवडी हद्दीतील वनविभागाकडून पाइपलाइनचे काम थांबविण्यात आले आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना पाण्याची प्रतीक्षा आहे.

लेंगरे, जि. सांगली : टेंभूच्या चौथ्या, पाचव्या टप्प्यानंतर पूर्ण होऊन अखेर टेंभूचे पाणी घाटमाथ्यावर पोहोचले. देवीखिंडी भिकवडी हद्दीतील वनविभागाकडून पाइपलाइनचे काम थांबविण्यात आले आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना पाण्याची प्रतीक्षा आहे.

देवीखिंडी (ता. खानापूर) येथून घरनिकीला पाणी नेण्यासाठी सुमारे सहा किलोमीटर लांबीचा बोगदा पाडण्यात आला. त्यामुळे देवीखिंडीतील पाणीसाठे संपुष्टात आले. त्याचबरोबर डोंगर माथ्यावरून वाहत जाऊन तलावात पडणारे बंद झाले. त्यामुळे वेजेगाव, देवीखिंडी गावातील लोकांचा पाणीप्रश्‍न उभा राहिला. परंतु लोकांनी आशा न सोडता आमदार बाबर यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे त्यांनी टेंभूचे अधिकाऱ्यांच्या मदतीने हा पाणी प्रश्‍न सोडविला. प्रथम तलावात पाणी सोडवण्यासाठी स्वतंत्र कालवा काढून पाणी सोडण्यात आले. त्यामुळे वेजेगाव, देवीखिंडीचा थोडा भाग ओलिताखाली आला. तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटला. परंतु देवीखिंडी गावांच्या पूर्वेला पाणी मिळत नव्हते. त्यामुळे लोकांमध्ये नाराजी होती. त्यामुळे टेंभूचे पाणी देण्याचे आश्‍वासन देत शेतकरी वर्गाला दिलासा दिला.

या टेंभूच्या पाण्याने परिसरातील द्राक्ष बागायतदारांचा प्रश्‍न सुटणार आहे. तरी लवकर पाइपलाइन पूर्ण करून पाण्याने तलाव भरून द्यावेत, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. दरम्यान, देवीखिंडी भिकवडी हद्दीतील वनविभागाकडून पाइपलाइनचे काम थांबविण्यात आले. त्यामुळे पाइपलाइनचे काम रखडल्याने लांबणीवर पडले आहे. या अगोदर गेलेल्या कालव्या शेजारीच पाइपलाइन काम सुरु करण्यात आले. मात्र वनविभागाने काम थांबले. त्यामुळे दोन्ही विभागातील अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन आमदार अनिल बाबर यांनी हा प्रश्‍न मार्गी लावल्यास पाइपलाइनचे काम लवकर पूर्ण होईल.


इतर बातम्या
...तर विमा कंपन्यांवर  गुन्हे दाखल...पुणे : शेतकऱ्यांना पीकविम्याचे पैसे वेळेत न...
आंदोलन सुरूच राहणार : संयुक्त किसान...नवी दिल्ली : शेतकऱ्यांच्या मागण्यांसदर्भात...
राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानाचा अंदाज पुणे : राज्यात सुरू असलेल्या पावसाने उघडीप दिली...
परळी थर्मलमध्ये इंधनासाठी बांबूचा वापर...लातूर ः परळी येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात...
पेप्सिकोच्या बटाटा वाणाचे  मालकी हक्क...नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ः केंद्र सरकारच्या...
मेंढ्यांच्या संरक्षणासाठी लवकरच योजना ...सुपे, जि. पुणे ः पावसाची संततधार, अतिवृष्टी व...
शेतकऱ्यांनी करून दाखवलं : डॉ. गौहर रझा नाशिक : नव्या भारताचे स्वप्न साकारण्यासाठी शेतकरी...
द्राक्ष पीकविमा योजना  विभागनिहाय...नाशिक : दोन दिवसांपासून राज्यात झालेल्या...
सोयाबीन दरातील सुधारणा  आठवड्याच्या...पुणे ः चालू आठवड्यात बुधवारनंतर सोयाबीन दरात...
‘जवाद’ चक्रीवादळाची  तीव्रता कमी होणारपुणे : बंगालच्या उपसागरातील ‘जवाद’ चक्रीवादळ...
दर्जेदार कृषी विद्यापीठांत  राज्याला...पुणे ः देशातील पहिल्या २० दर्जेदार कृषी...
पुणे जिल्ह्यात १,२४५ ‘विकेल ते पिकेल’...पुणे : शेतीमालाला केवळ हमीभाव नाही तर हमखास भाव...
पुणे जिल्ह्यात धरणांत एक टीएमसी...पुणे : जिल्ह्यात दोन दिवसांपासून धुमाकूळ...
कोल्हापूर जिल्हा बँकेसाठी ३६८...कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा बॅंकेच्या...
सांगली जिल्ह्यातील नुकसानग्रस्त पिकांचे...सांगली : जिल्ह्यामध्ये दोन दिवसांपूर्वी मुसळधार...
सांगली जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष पदाची...सांगली ः जिल्हा बँकेत अध्यक्षपदी आमदार मानसिंगराव...
नंदुरबार : पशुसंवर्धन विभागाच्या...नंदुरबार : पशुसंवर्धन विभागामार्फत सन २०२१-२२ या...
नंदुरबार : रब्बीचे अनुदानित बियाणे...नंदुरबार : कृषी विभागाच्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा...
खानदेशात मका लागवड घटणार  गहू, बाजरीची...जळगाव ः खानदेशात मका लागवड घटेल, असे संकेत आहेत....
नांदेड जिल्ह्यात नुकसानीच्या मदतीचे...नांदेड : अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी...