Agriculture News in Marathi Farmers did it: Dr. Gauhar Raza | Page 3 ||| Agrowon

शेतकऱ्यांनी करून दाखवलं : डॉ. गौहर रझा 

टीम अॅग्रोवन
रविवार, 5 डिसेंबर 2021

नव्या भारताचे स्वप्न साकारण्यासाठी शेतकरी लढले. त्यांची अजूनही लढाई सुरू आहे. तिथेही एक विचाराने प्रेरित होऊन लोकसभाच सुरू होती.

नाशिक : नव्या भारताचे स्वप्न साकारण्यासाठी शेतकरी लढले. त्यांची अजूनही लढाई सुरू आहे. तिथेही एक विचाराने प्रेरित होऊन लोकसभाच सुरू होती. त्यातील तत्व, नियम आणि एकजुटीने विजय मिळविला. हे शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या शक्ती विरुद्ध करून दाखवले, असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ व लेखक डॉ. गौहर रझा यांनी केले. 

       संविधान सन्मानार्थ १५वे विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचा प्रारंभ शनिवारी (ता. ४) नाशिक येथील केटीएचएम महाविद्यालयाच्या वामन दादा कर्डक जनशताब्दी साहित्यनगरी प्रांगणात सुरुवात झाली. संमेलनाचे उद्‍घाटन डॉ. रझा यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. या वेळी संमेलनाचे अध्यक्ष शिव इतिहासकार डॉ. आनंद पाटील, डॉ. प्रमोद लुलेकर, सुधाकर गायकवाड, डॉ. अजीज नदाफ, संमेलनाचे स्वागताध्यक्ष शशिकांत उन्हवणे आदी उपस्थित होते. 

    डॉ. रझा म्हणाले, ‘‘शेतकरी आंदोलन डोळ्यासमोर ठेवत विद्रोही साहित्यिकांनी नव्या भारताचे स्वप्न पहावे. ते सत्यात उतरविण्याची ताकद विद्रोही साहित्यिकांमध्येच आहे. विद्रोही साहित्याची मशाल महाराष्ट्रातील सर्व शहरात, अन्य राज्यांत जावी. महाराष्ट्रबाहेर जात देशभरात विद्रोही साहित्याचा जागर होण्याची गरज आहे. कृषी कायदे रद्द झाल्याने शेतकऱ्यांनी हुकूमशाही मोडून काढली, हे मोठे यश आहे. ही कष्टकरी शेतकऱ्यांची एकीची पावती आहे. ही सुरुवात असून, सरकारवर विजय मिळवायचा आहे.’’ आता शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे झाले पाहिजेत. शेतकऱ्यांचा अन् संविधानाचा सन्मान वाढविण्यासाठी कटिबद्ध राहू या असे आवाहन मुख्य संयोजक राजू देसले यांनी प्रस्ताविकातून केले. 

     शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा समर्थन देशभरातून झाले. मात्र केंद्र सरकारने पाण्याचे फवारे मारून आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांसोबत अतिरेक्यासारखे वर्तन केले गेले. तुम्ही पाण्याचे फवारे मारा, आम्ही शेतकऱ्यांवर स्तुतीसुमने उधळू, अशा भूमिका विद्रोही साहित्य चळवळीच्या राज्यध्यक्षा प्रा. प्रतिमा परदेशी यांनी मांडली. नाशिक शहरातून सकाळी हुतात्मा स्मारक, अशोक स्तंभ, मार्गे विद्रोही साहित्य-संस्कृती विचार यात्रा निघाली होती. यात विद्यार्थी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वेशभूषा साकारल्या होत्या.


इतर बातम्या
नगर जिल्ह्यासाठी ५४० कोटी रुपयांचा निधी...नगर : नगर जिल्हा वार्षिक योजनेत २०२२-२३ या आर्थिक...
दळणासाठी नदीतून जीवघेणा प्रवासतळोदा, जि. नंदुरबार : सातपुड्यातील सावऱ्या दिगर...
वाळूदर येतील आवाक्यात  लिलाव कालावधी...मुंबई : राज्यात वाळूचा मुबलक पुरवठा आणि दरांमध्ये...
नगरमध्ये दीड लाख हेक्टरवर कांदा लागवडनगर ः नगर जिल्ह्यात यंदाही कांदा लागवडीला...
लासलगाव स्टेशनवर किसान रेल्वेच्या ...नाशिक : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा,...
औरंगाबादच्या ३८५ कोटींच्या प्रारूप...औरंगाबाद : कोविड, महसुलात घट आदींमुळे जिल्ह्याला...
मराठवाड्यात केशर आंबा लागवडीस वाव : डॉ...औरंगाबाद ः ‘‘केशर आंबा, लागवडीस मराठवाड्यात वाव...
खोडवा उसात पंचसूत्री महत्त्वाची : डॉ....केज, जि. बीड : ‘‘खोडवा उसाची योग्य जोपासना...
हिंगोलीचा वार्षिक योजनेचा आराखडा १७०...हिंगोली ः औरंगाबाद येथे शुक्रवारी (ता.२१) आयोजित...
सिंधुदुर्गात पशुसंवर्धनाच्या २.१९ कोटी...सिंधुदुर्गातनगरी ः विविध १६ योजनांचा समावेश...
सोलापूर: उजनीतून रब्बीसाठी एक, उन्हाळी ...सोलापूर ः उजनी धरणातून रब्बी हंगामासाठी एक तर...
बुलडाणा: नारी शक्ती पुरस्कारासाठी ३०...बुलडाणा : केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास...
सांगली जिल्हा बॅंकेचा बड्या...सांगली ः जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बड्या...
पाणीपुरवठ्याचे थकीत देयक भरल्यास अर्धा...वाशीम ः ग्रामीण भागातील नागरिकांना जिल्हा...
नांदेड जिल्ह्यात अनुदानावर भुईमुगाचे...नांदेड जिल्ह्यात : उन्हाळी हंगाम २०२१-२२ साठी...
खानदेशात तूर काढणीचा हंगाम सुरू जळगाव : खानदेशात तूर काढणीचा हंगाम सुरू झाला आहे...
नाशिक विभागाला ३४६ कोटींचा वाढीव निधी...नाशिक : सन २०२२-२३ साठी नाशिक विभागाला जिल्हा...
नगर विभागात ऊसगाळपात यंदाही खासगी साखर...नगर, ः नगर जिल्ह्यात यंदा सतरा सहकारी व नऊ खासगी...
नागपूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा नागपूर ः अवकाळी पावसामुळे नागपूर जिल्ह्यात मोठ्या...
कृषी वीजपुरवठा खंडित केल्यास तीव्र...अमरावती : नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील...