agriculture news in Marathi farmers did not get pomegranate crop insurance Maharashtra | Agrowon

डाळिंबाच्या विम्याचे पैसे वर्षानंतरही मिळाले नाहीत 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 30 जून 2020

आमच्या गावातील बँक ऑफ इंडिया; तसेच इतर बँकांकडे भरलेल्याचे पैसे जमा झाले; पण माझे लक्ष्मी दहिवडी डीसीसी बँकेकडे भरलेल्या पीकविम्याची रक्कम अद्याप मिळाली नाही. 
- बाळकृष्ण सुडके, शेतकरी, महमदाबाद (शे), जि. सोलापूर 

मंगळवेढा, जि. सोलापूर ः गतवर्षीच्या हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेतून मंगळवेढा तालुक्यातील ६७० शेतकऱ्यांना सुमारे १ कोटी ८० लाखांची भरपाई विमा कंपनीने मंजूर केली; पण यंदा दुसऱ्या वर्षीचा विमा भरण्याची वेळ आली. कंपनीकडून अद्यापही हे पैसे शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. याबाबत पाठपुरावा करूनही कृषी विभाग वा विमा कंपनी कोणीच याबाबत दाद देत नसल्याने शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. 

गतवर्षीच्या खरीप हंगामात हवामानावर आधारित फळपीक विम्यातून डाळिंब पिकासाठी तालुक्यातील सात महसूल मंडळांमधील शेतकऱ्यांनी विमा भरला. त्यामधील मंगळवेढा, मरवडे, भोसे या महसूल मंडळांमधील जवळपास ६७० शेतकऱ्यांना भरपाई मंजूर करूनही ती दिली गेली नाही.

त्याबाबत शेतकऱ्यांनी वारंवार पाठपुरावा केला; पण त्याची दखल कोणत्याच पातळीवर घेतली नाही. पावसाचे प्रमाण आणि त्या वेळच्या हवामानातील बदलाची विविध तांत्रिक कारण देत ही रक्कम देण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. तांत्रिक अडचणीमुळे हा प्रश्न निर्माण झाला आहे. लवकच पैसे मिळतील, असे बजाज इन्शुरन्स कंपनीचे देवा कोळी यांनी सांगितले. 

 


इतर अॅग्रो विशेष
राज्याच्या कृषी आयुक्तपदी धीरज कुमार;...पुणे : राज्याच्या कृषी आयुक्तपदी धीरज कुमार यांची...
एचटीबीटी कपाशीची शेतकऱ्यांकडून पाहणीअकोला ः शेतकऱ्यांना तंत्रज्ञान स्वातंत्र्य मिळावे...
दुर्मीळ निलमणी आमरीचे सातपुड्यात...जळगाव ः जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगा या अनेक...
दूध पावडरला प्रतिकिलो ५० रुपये अनुदान...इस्लामपूर, जि. सांगली ः कोरोना सारख्या साथीत...
अकोला जिल्ह्यात सोयाबीन उगवणशक्तीबाबत...अकोला ः  सोयाबीन पिकाची पेरणी जुलैच्या...
अन्नधान्य पिकांच्या योजनांसाठी २७ कोटीपुणे: राज्यातील अन्नधान्य पिकांच्या योजनांसाठी...
ग्लायफोसेट वापराच्या मसुद्याविरुद्ध दाद...पुणे: केंद्र सरकारने ग्लायफोसेट तणनाशकाच्या...
सोयाबीन बियाणे कंपन्यांवर राज्यात ४६...औरंगाबाद ः सोयाबीनच्या बोगस बियाण्यामुळे पिकाची...
चिकाटी, आर्थिक नियोजनातून पोल्ट्री...वांजोळी (जि. नगर) येथील ३८ वर्षे वयाच्या अमोल...
अतीव संघर्ष, धैर्यातून साधली उल्लेखनीय...उस्मानाबाद जिल्ह्यातील अणदूर येथील वैशाली घुगे...
दूध व्यवसाय झाला आतबट्ट्याचा; शेतकरी...पुणेः मागील काही वर्षांपासून संकटात असलेल्या दूध...
राज्यात पाऊस जोर धरण्याची शक्यता पुणे : मॉन्सून सक्रिय होण्याचा पोषक हवामान होत...
विश्वजित माने प्रभारी कृषी आयुक्तपुणे : राज्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे यांची...
शण्मुख नाथन झटतोय निंब वृक्ष वाढीसाठीअकोला ः वृक्ष संवर्धन, पर्यावरणाच्या उद्देशाने...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा बंद मागे;...औरंगाबाद :  कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा...
देशात कृषी स्टार्टअपला वाव : संगीता...पुणे: जगात कृषी क्षेत्रातील प्रत्येक नववा...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर...पुणे: मॉन्सून सक्रिय होण्यास पोषक हवामान होत...
सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या राज्यात ५४...पुणे ः खरीप हंगामात सोयाबीन बियाणे...
देशात आता जनुक क्रांतीची गरज : माजी...पुणे: देशाला आता हरितक्रांती नव्हे तर आता जनुक...
बांगलादेशात रेल्वेद्वारे कांदा निर्यातनाशिक: जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर कांदा...