Agriculture news in marathi Farmers disappointed by closure of bull market in Akola | Agrowon

अकोल्यात बैलबाजार बंद ठेवल्याने शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 मे 2020

अकोला ः कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू असल्याने सर्वत्र बैलबाजार बंद पडलेले आहेत. या परिस्थितीत काही शेतकरी सोशल मीडियाचा वापर करीत बैलजोड्यांची छायाचित्रे फिरवत आहेत. बाजार सुरू होण्याची कुठलीही चिन्हे सध्या नसल्याने या हंगामासाठी बैलजोडीची खरेदी-विक्री करताना शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. बैलबाजार सुरू करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत मागणी होऊनही यावर कुठलाही तोडगा काढण्यात आलेला नाही. 

अकोला ः कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू असल्याने सर्वत्र बैलबाजार बंद पडलेले आहेत. या परिस्थितीत काही शेतकरी सोशल मीडियाचा वापर करीत बैलजोड्यांची छायाचित्रे फिरवत आहेत. बाजार सुरू होण्याची कुठलीही चिन्हे सध्या नसल्याने या हंगामासाठी बैलजोडीची खरेदी-विक्री करताना शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. बैलबाजार सुरू करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत मागणी होऊनही यावर कुठलाही तोडगा काढण्यात आलेला नाही. 

लॉकडाऊन नव्याने वाढविण्यात आले असून या टप्प्यात तरी शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेऊन बैलबाजाराला सुट मिळेल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र, शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. खरीप हंगाम अवघा १५ दिवसांवर आलेला आहे. पहिल्यांदाच बैलबाजार बंद असल्याने शेतकऱ्यांना बैलजोड्यांची खरेदी-विक्री करण्यास अडचणी उभ्या राहलेल्या आहेत. 

ग्रामीण भागात आजही छोटे-मोठे शेतकरी हे शेती कामांसाठी बैलजोड्यांचा वापर करतात. हंगामापूर्वी मशागतीची कामे सुरू झाली आहेत. या काळात अनेक शेतकरी बैलजोड्यांची खरेदी-विक्री करतात. यंदा गेल्या दोन महिन्यांपासून बैलबाजार बंद झालेले आहेत. १८ मे पासून नव्याने सुरू होणाऱ्या लॉकडाऊनमध्ये या बाजाराला सुट मिळेल, अशी शक्यता होती. परंतु शासनाने आपल्या धोरणात कुठलाही बदल केलेला नाही. परिणामी अपेक्षाभंग झाला आहे. 

सोशल मीडियाचा वापर 
बैलबाजार बंद असल्याने शेतकऱ्यांना सोशल मीडियाचा आधार होत आहे. शेतकरी व्हॉट्सॲपवर बैलांचे फोटो पाठवून सौदे करीत आहेत. मात्र, बाजार बंद मुळे चांगल्या बैलजोडीच्या किमती एक लाखावर पोचल्या आहेत. अनेकांना अपेक्षित असलेले बैल मात्र पुरेशा प्रमाणात मिळेनासे झालेले आहेत. सर्वसामान्य शेतकऱ्याला बैलजोडी मिळण्यात अडचणी वाढलेल्या आहेत. 

बैलबाजार बंद असल्याने बैलजोड्यांची खरेदी कोठून व कशी करावी हा पेच तयार झालेला आहे. माझ्यासह अनेक शेतकरी चांगल्या बोलजोड्यांचा शोध घेत आहेत. शासनाने शेतकऱ्यांच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला हा बैलबाजार सुरू करण्याचा निर्णय घ्यायला हवा होता. अजूनही वेळ असून यादृष्टीने बैलबाजार सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. 
- जगदेवराव आखाडे, शेतकरी, डोणगाव, जि. बुलडाणा 


इतर बातम्या
माया आणि छायेची पालवी पुन्हा फुलणार... नाशिक : हल्ली विकासकामांच्या नावाखाली मोठ्या...
नगर जिल्ह्यात ‘निसर्ग'चा शेतीपिकांना...नगर : कोकण आणि मुंबईला तडाखा देणारे निसर्ग...
दापोली, मंडणगडमध्ये बागांना फटकारत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा...
सिंधुदुर्गात पावसाचा जोर ओसरला सिंधुदुर्ग : जिल्ह्याला बुधवारी (ता.३) वादळी...
पुणे जिल्ह्यात ‘निसर्ग’चे थैमान पुणे : निसर्ग चक्रीवादळाने बुधवारी (ता.३)...
मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत फळबागांना...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड,...
नाशिक जिल्ह्यात चक्रीवादळामुळे...नाशिक : निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यात दुपारनंतर...
मॉन्सूनने कर्नाटक किनारपट्टी व्यापली;...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
‘निसर्ग’चा शेतीला मोठा तडाखापुणेः निसर्ग चक्रीवादळामुळे राज्याला वादळी...
कापसाची ३७१ लाख क्विंटल खरेदीनागपूर ः राज्यात आतापर्यंत कापसाची हमीभावाने ३७१....
पुणे जिल्ह्यात पॉलिहाऊसचे मोठे नुकसानपुणेः कोरोना टाळेबंदीमध्ये बाजार समित्यांसह...
कापूस नोंदणीला उद्यापर्यंत मुदतवाढअमरावती ः शासकीय हमीभाव योजनेअंतर्गंत कापूस...
राज्यात गुरांचे बाजार सुरु करण्याचे आदेशअकोला ः कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने...
संकटाच्या मालिका सोसून द्राक्ष हंगामाची...नाशिक: यंदा जिल्ह्यातील द्राक्ष हंगामावर सतत...
लॉकडाउनमध्ये गजबजली ई-चावडीपुणे: शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी सुरू करण्यात...
मॉन्सून कर्नाटकात दाखल, कारवार,...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
‘चक्रीवादळ’ ओसरले; खानदेशासह पश्‍चिम...पुणे : अरबी समुद्रात आलेले ‘निसर्ग’ चक्रीवादळ...
जीवनावश्‍यक वस्तू कायदा, मुक्त शेतीमाल...नवी दिल्ली : आत्मनिर्भर भारत योजनेत जाहीर...
टोळधाड मध्यप्रदेशात, ड्रोन पोचला...नागपूर ः गेल्या दहा दिवसांपासून विदर्भातील...
एक लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलविले मुंबई: निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान होऊ नये...