agriculture news in marathi, farmers distribute free milk in Vaijapur tehsil office | Agrowon

वैजापूरच्या तहसील कार्यालयात मोफत दूधवाटप
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 8 मे 2018

वैजापूर, जि. औरंगाबाद : येथील तहसील कार्यालयात सोमवारी (ता. ७) मोफत दूध वाटून शासनाच्या दूध दर धोरणाचा शेतकऱ्यांनी निषेध व्यक्त केला. 

वैजापूर, जि. औरंगाबाद : येथील तहसील कार्यालयात सोमवारी (ता. ७) मोफत दूध वाटून शासनाच्या दूध दर धोरणाचा शेतकऱ्यांनी निषेध व्यक्त केला. 

वैजापूर तालुक्यातील व गोदावरी काठावरील ८० टक्के शेतकरी हे दूध धंद्यावर अवलंबून आहेत. गेल्या अकरा महिन्यांत दूध दरामध्ये सातत्याने घट होत असल्याने उत्पादकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. याच पाश्वभूमीवर तालुक्यातील लाखगंगा येथे विशेष ग्रामसभेचे आयोजन करून मोफत दूधवाटप करण्याचा ठराव घेण्यात आला होता. या वेळी या विशेष ग्रामसभेत सततच्या दूध दारामध्ये होणाऱ्या घसरणामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करून गावातील व तालुक्यातील सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आपले दूध तहसील व जिल्ह्याच्या ठिकाणी नेऊन मोफत दूधवाटप करण्याचे ठरवण्यात आले. त्यानुसार सोमवारी (ता. ७) वैजापूर तालुका काँग्रेसतर्फे वैजापूर तहसील कार्यालयात मोफत दूधवाटप करून शासनाच्या दूध दरविषयीच्या धोरणाचा निषेध करण्यात आला. 

दूध दरविषयी शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली. या वेळी तहसील कार्यालयात शंभर लिटर दुधाचे मोफत दूधवाटप करण्यात आले. या मोफत दूधवाटपात काॅंग्रेसचे आ. सुभाष झाबड, शेतकरी नेते धनंजय धोर्डे, कॉँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रशांत सदाफळ, जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे, लाखगंगा सरपंच दिगबर तुरकणे व तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

इतर ताज्या घडामोडी
...अन् आमचं स्वप्नच पुरानं खरडून नेलं पटवर्धन कुरोली, पंढरपूर, जि. सोलापूर : आधीच दोन...
जायकवाडी कालव्याच्या पाण्यामुळे पीक...परभणी : जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून...
एमएआयडीसी’च्या सक्षमीकरणासाठी...मुंबई : महाराष्ट्र कृषी उद्योग विकास...
उस्मानाबाद जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत...उस्मानाबाद  ः खरीप हंगामासाठी पीककर्ज वाटपात...
गंगापूर धरण क्षेत्रात पावसाचे पुनरागमन...नाशिक  : गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात...
कृषी सहायकांच्या अडचणी न सोडविल्यास २०...अकोला ः अमरावती विभागातील कृषी सहायक ते कृषी...
हवामान बदलाचा शेती, शेतकऱ्यांच्या ...नांदेड  ः हवामान बदलामुळे येत असलेल्या...
अमरावती कृषी विभागातील ३२ टक्के पदे...अमरावती  :  रिक्‍त पदांमुळे...
शेतकरी राजकारण अन् जाती-धर्मात अडकला :...नाशिक ः शेतकऱ्यांचे प्रश्न कमी होण्यापेक्षा ते...
शिरसाईचे पाणी लाभार्थ्यांसाठी मृगजळचउंडवडी, जि. पुणे : पावसाळा सुरु होवून अडीच महिने...
विम्याचे दावे निकाली काढा; आयआरडीएआयचे...नवी दिल्ली : पुराचा फटका बसलेल्या कर्नाटक,...
उत्तर भारतात मुसळधार पाऊस सुरूचसिमला/धर्मशाला : उत्तर भारतात विशेषतः हिमालयाच्या...
आता चर्चा फक्त व्याप्त काश्‍मीरवर :...काल्का, हरियाणा : पाकिस्तानप्रती कठोर भूमिका घेत...
पुण्यात वांगी, तोंडली, गाजरासह...पुणे   ः राज्यातील पूरस्थिती...
सिंधूताई विखे पाटील यांचे निधनशिर्डी, जि. नगर : दिवंगत माजी खासदार बाळासाहेब...
महाजनादेश यात्रेला बुधवारपासून नंदूरबार...नंदुरबार ः राज्यातील पूरस्थितीमुळे स्थगित झालेली...
पुणे बाजार समिती प्रशासकपदी वर्णी...पुणे  : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे...
प्रतिकूल हवामानामुळे जुन्नर तालुक्यातील...नारायणगाव, जि. पुणे  : दोन महिन्यांपासून...
नगर जिल्ह्यातील दहा ते अकरा तालुक्यांवर...नगर  ः राज्याच्या काही भागांत जोरदार पावसाने...
पीक नुकसानीबाबत शेतकऱ्याने मांडली कृषी... कऱ्हाड, जि. सातारा ः घरात हुतं नव्हतं...