agriculture news in Marathi farmers distribute free vegetables Maharashtra | Agrowon

मदतीच्या झऱ्याने ओलावले शिवार; अतिरिक्त भाजीपाल्याचे मोफत वितरण

राजकुमार चौगुले
गुरुवार, 9 एप्रिल 2020

दररोज निघणारा व बाजारपेठेत उठाव नसल्याने अतिरिक्त होणारा भाजीपाला फेकून न देता तो लोकांपर्यंत जावा यासाठी अनेक शेतकरी पुढे आले आहेत.

कोल्हापूर: दररोज निघणारा व बाजारपेठेत उठाव नसल्याने अतिरिक्त होणारा भाजीपाला फेकून न देता तो लोकांपर्यंत जावा यासाठी अनेक शेतकरी पुढे आले आहेत. गरज असलेल्या ठिकाणी भाजीपाला मोफत वाटला जातोय. यासाठी तरुणांची फौज एकत्र आली. भाजीपाला तोडायला मजूर नसले म्हणून काय झाले, आम्ही तोडून देतो, तुम्ही मोफत वाटा, असे सांगत शेतकऱ्याला मानसिक समाधान देण्याचे काम ही तरुणाई करत आहे. यामुळे संचारबंदीच्या काळात माणुसकीचे असणारे अस्तित्व निश्‍चितच अधोरेखित होत आहे. 

कोराना संकटाच्या पार्श्‍वभूमीवर शिवारात फुललेला भाजीपाला पाहिला की दर, बाजारपेठ नसल्याने याचे भवितव्य काय असा विचार मनात येतो आणि मन गलबलून जाते. भाजीपाला तोडणी करतानाचे निराश चेहरे पाहिले की किती ही क्रूर थट्टा चालली आहे अशा विचाराने मनात काहूर माजते. अशा परिस्थितीतही माणुसकीचे झरे या शिवारांमध्ये खळखळ वहात आहेत. 

चिंचवाड (ता.शिरोळ) येथील अभिनंदन पाटील या शेतकऱ्यालाही या तरुणांची साथ मिळाली. त्यांचा टोमॅटोचा प्लॉट ऐन बहरात आला आहे. पण त्याला तोडून बाजारपेठेत पाठविण्यासाठी मजूर नसल्याने काहीसा चांगला दर मिळत असूनही श्री. पाटील यांना त्याचा फायदा होणे शक्‍य नव्हते.

टोमॅटोच्या प्लॉटचे भवितव्य अनिश्‍चित असल्याने श्री. पाटील यांना काय करावे हा प्रश्‍न पडला. परंतु इथे माणुसकी सामोरी आली. आज अनेक ठिकाणी भाजीपाल्याची चणचण आहे. तिथे मोफत वाटला तर नक्कीच समाधान मिळेल असा विचार त्यांच्या मनात आला. 

गोमटेश ग्रुपच्या अनेक सदस्यांनी त्यांना मदत केली. आत्तापर्यंत या तरुणांच्या सहकार्याने श्री. पाटील यांनी तब्बल पाच टन टोमॅटो वाहनधारकांच्या मदतीने मोफत वाटले आहेत. आर्थिक नुकसान झाले असले तरी आपत्तीच्या काळात लोकांच्या मुखात आपला भाजीपाला जातोय, हे सांगताना अभिनंदन पाटील यांच्यातील खरा शेतकरी जागा झालेला दिसला. 

इतर शेतकरीही आले पुढे 
श्री. पाटील यांच्याबरोबरच उमेश घाटगे यांनी १०० किलो कारले, ६० किलो ढोबळी मिरची, तर दादू गोधडे यांनी ५० किलो दोडक्‍याचे वाटप केले. आर्थिक नुकसान प्रचंड होत असले तरी संकटाच्या काळात धावून येणारे हे भूमिपुत्र कौतुकाचे विषय बनले आहेत. 


इतर ताज्या घडामोडी
बार्शी तालुक्यात सहा स्वस्त धान्य...सोलापूर : बार्शी तालुक्यातील सहा स्वस्त...
फालसापासून जाम, जेली, चटणीफालसा हा एक रानमेवा आहे. फालसा फळामध्ये प्रथिने,...
सोलापूर जिल्ह्यात पिकांच्या...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सलग...
परभणी, हिंगोलीत सोयाबीन, तुर, कपाशीचे...परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील मंडळांत...
परभणी जिल्ह्यात पावसाचा सोयाबीन पिकाला...परभणी : जिल्ह्यात दीर्घ खंडानंतर पावसाचे आगमन...
विष्णुपुरी प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडलेनांदेड : गोदावरी नदीवरील विष्णुपुरी...
खानदेशात नुकसानीबाबत सोयाबीनचेही...जळगाव ः मूग, उडीद नुकसानीसंबंधी गेल्या...
जळगाव जिल्ह्यात बाजार समित्यांकडून...जळगाव ः जिल्ह्यात काही बाजार समित्यांचा...
परजिल्ह्यातील कारखान्यांची खानदेशातील...जळगाव ः खानदेशात उसाचे क्षेत्र यंदा...
पंजाब, हरियानात शेतकऱ्यांची आंदोलने नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणलेल्या कृषिविषयक...
चक्रीवादळाची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई...सिंधुदुर्ग ः निसर्ग चक्रीवादळातील नुकसानीकरिता...
नगर जिल्ह्यात मूग उत्पादकतेत यंदा...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने...
मुळा धरणातून वीस हजार क्युसेक विसर्गनगर ः नगर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून जोरदार...
पावसाने सोयाबीनला फुटले कोंबवाशीम ः जिल्ह्यात काही भागात सततच्या पावसामुळे...
औरंगाबाद, लातूरमध्ये पावसाचा धुमाकूळऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच...
पोषणयुक्त आहार घेण्यावर भर द्या : पाटीलनाशिक : ‘‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने...
कांदा निर्यातबंदी विरोधात ‘सोशल मीडिया...नाशिक : २०१३-१४ मध्ये सोशल मीडियाचा मोठ्या...
कारखान्यांना २५ बेडचे हॉस्पिटल बंधनकारकसोलापूर : राज्यातील ऊस गाळप हंगाम १५ ऑक्‍...
निर्यात अडथळे, बियाणे दराचा कांदा...जळगाव ः खानदेशात प्रतिकूल वातावरणामुळे खरिपातील...
परभणीत भेंडी १००० ते १५०० रूपये क्विंटल परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...