agriculture news in Marathi farmers distributed broiler and eggs Maharashtra | Agrowon

पोल्ट्री व्यावसायिकांनी मोफत वाटल्या कोंबड्या-अंडी

टीम अॅग्रोवन
बुधवार, 18 मार्च 2020

अमरावती ः कोरोना व्हायरसला मांसाहार कारणीभूत असल्याची अफवा पसरविण्यात आली. त्याचा फटका अमरावतीमधील पोल्ट्री व्यवसायाला बसला असून रोज दोन कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागत आहे. त्याची दखल घेत शासनाकडून मदत मिळावी, अशी मागणी करीत मोफत कोंबड्या आणि अंडी वाटप आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी (ता. १७) करण्यात आलेल्या या आंदोलनाचे नेतृत्व माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केले होते. 

अमरावती ः कोरोना व्हायरसला मांसाहार कारणीभूत असल्याची अफवा पसरविण्यात आली. त्याचा फटका अमरावतीमधील पोल्ट्री व्यवसायाला बसला असून रोज दोन कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागत आहे. त्याची दखल घेत शासनाकडून मदत मिळावी, अशी मागणी करीत मोफत कोंबड्या आणि अंडी वाटप आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी (ता. १७) करण्यात आलेल्या या आंदोलनाचे नेतृत्व माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केले होते. 

विदर्भात पोल्ट्री व्यवसायाचे हब म्हणून अमरावतीची ओळख आहे. मोठ्या प्रमाणावर अंडी आणि ब्रॉयलर पक्ष्याचे उत्पादन येथे होते. सद्यःस्थितीत मात्र कोरोना प्रादुर्भावाला मांसाहार कारणीभूत असल्याची अफवा पसरविण्यात आल्याने जिल्ह्यातील पोल्ट्री व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे.

दररोज सुमारे दोन कोटी रुपयांचे नुकसान व्यावसायिकांना सोसावे लागत आहे. त्याची दखल घेत केरळच्या धर्तीवर १०० रुपये प्रति पक्षी तसेच अंड्याला पाच रुपयांप्रमाणे अनुदान, ग्रामपंचायतीद्वारे आकारण्यात येणारा मालमत्ता कर रद्द करावा, वीजबिलातून सूट मिळावी, कर्जाचे पुनर्गठण करण्यात यावे, अशा मागण्या पोल्ट्री व्यावसायिकांनी केल्या आहेत. 

त्यासोबतच ज्या कोंबड्यांची विक्री होत नाही त्या नष्ट करण्यासाठी शासनस्तरावरून उपाययोजना करण्यात याव्या, अशीही त्यांची मागणी आहे. या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना देण्यात आले. या वेळी डॉ. अनिल बोंडे यांच्यासह पोल्ट्री व्यावसायिक रवींद्र मेटकर, अतुल पिरसपूरे, डॉ. शरद भारसाकळे, सुरेश ठाकूर व पोल्ट्री व्यावसायिक उपस्थित होते.

कोंबड्या दिल्या फुकट
पोल्ट्री व्यावसायिकांनी या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोफत कोंबड्या व अंडी वाटप केले. या अभिनव आंदोलनाची परिसरात चांगलीच चर्चा रंगली होती.


इतर अॅग्रो विशेष
पीककर्ज वाटपात राज्यात कोल्हापूर प्रथम...कोल्हापूर : जिल्ह्याकरिता पीक कर्जाचे वार्षिक...
कृषी विधेयकांना वाढता विरोधनवी दिल्लीः देशभरात ठिकठिकाणी विशेषतः पंजाब आणि...
तंबी देताच फळपिकांची विमा भरपाई झाली...पुणे: फळपिक विमा योजनेतील अडवून ठेवलेली नुकसान...
कांदा उत्पादकांची सावध चाल नाशिक: केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा...
मराठवाड्यात पावसाचे धुमशान पुणे ः मराठवाड्यात पावसाचे धुमशान सुरूच आहे....
ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी निवडणूक...मुंबई: कोरोनामुळे स्थगित करण्यात आलेल्या आणि...
हलक्या पावसाची शक्यता पुणे ः बंगाल उपसागराच्या ईशान्य परिसरात उद्या (ता...
शेतकऱ्यांना उभारी देणारी संत ज्ञानेश्‍...किनखेडा (ता.रिसोड,जि.वाशीम) येथील प्रगतशील शेतकरी...
बाजार स्वातंत्र्यांची मागणी पूर्ण पुणेः केंद्र सरकारने सादर केलेल्या शेती आणि पणन...
गुणवत्तापूर्ण हळद, डाळींची थेट...सनपुरी (जि. परभणी) येथील प्रयोगशील शेतकरी नरेश...
मराठवाड्यात जोरदार पावसाचा पिकांना फटकाऔरंगाबाद, परभणी : औरंगाबाद, जालना, बीड, लातूर,...
हजारो टन कांदा निर्यातीच्या प्रतीक्षेतमुंबई/नाशिक : देशभरात कांदा निर्यातबंदी...
बीटी वांग्याच्या दुसऱ्या टप्प्यातील...पुणे : देशभरात चर्चेत असलेल्या बीटी वांग्याच्या...
साखर निर्यातीचे करार ५७ लाख टनांवरकोल्हापूर : देशातल्या साखर निर्यातीचे करार आता ५७...
तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यतापुणे ः बंगालचा उपसागर व उत्तर तामिळनाडूच्या...
दूध सल्लागार समिती कागदावरचपुणे : राज्यस्तरीय दूध सल्लागार समितीची एकही बैठक...
राज्यात मोसंबी १००० ते ४००० रुपये...औरंगाबादमध्ये १००० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल...
कांदा, लसूण शेतीत बहिरवाडीने मिळवली...बहिरवाडी (ता. जि. नगर) हे छोटे गाव कांदा व लसूण...
स्पर्धेत टिकण्यासाठी ‘ई-नाम’केंद्र सरकारने कृषी, पणन व्यवस्थेत सुधारणा घडवून...
बाजार सुधारणांत नको राजकीय धुळवडकोरोनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या संसद...