सातारा : शेतकऱ्यांच्या नजरा संपूर्ण कर्जमाफीकडे

सातारा : शेतकऱ्यांच्या नजरा संपूर्ण कर्जमाफीकडे
सातारा : शेतकऱ्यांच्या नजरा संपूर्ण कर्जमाफीकडे

सातारा : ‘‘दुष्काळ कोरडा असो की ओला, संकटात तुमच्यासोबत आहे. तुमची संपूर्ण कर्जमाफी करणार आहे,’’ असे आश्‍वासन नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकऱ्यांना दिले होते. सध्या राज्यभरात अतिवृष्टी, महापुरांमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून, पीक कर्जही भरणे मुश्‍कील झाले. राज्यपालांनी जाहीर केलेली नुकसान भरपाईची मदत अत्यंत तोकडी असल्याने संपूर्ण कर्जमाफीचे आश्‍वासन देणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या निर्णयाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

गत पावसाळ्यात अतिवृष्टी, सातत्याने पडलेल्या पावसामुळे बहुतांश ठिकाणी महापूर, पूर आले. त्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले. त्यात पुन्हा एकदा परतीच्या पावसाने जिल्ह्यास मेटाकुटीला आणले. अतिपावसामुळे पिके कुजून गेली. बहुतांश शेतकऱ्यांच्या पिकांचे उत्पादन घटले. फळ, बागांचे प्रचंड नुकसान झाले. त्यात निवडणुकीचा निकाल लागूनही महिनाभर सरकार स्थापन झाले नाहीत. त्यातच राष्ट्रपती राजवट लागू झाली. राज्यपालांनी जिरायती शेतीसाठी हेक्‍टरी आठ हजार, तर बागायती व फळबागांसाठी हेक्‍टरी १८ हजारांची मदत जाहीर केली. मात्र, नुकसानची तुलनेत ही मदत अत्यंत तोकडी आहे.

या दरम्यान, उद्धव ठाकरेंनी सातारा, बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भेटी घेतली. त्या वेळी त्यांनी ‘‘तुमची संपूर्ण कर्जमाफी करणार आहे. आपले सरकार स्थापन होताच कर्जमाफी केली जाईल. खचून जायचे नाही, आत्महत्या करायची नाही, धीर सोडायचा नाही, शेतकरी मर्द असतो, तो प्रत्येक संकटाचा सामना करतो, त्याला धीर देण्यासाठी आम्ही आहोत,’’ असे आश्‍वासन दिले होते. गुरुवारी सायंकाळी त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आता महाविकास आघाडीचे सरकार आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आता संपूर्ण कर्जमाफीकडे लागल्या आहेत.

हे होते आश्‍वासन... सत्ता स्थापनेचा पेच सुरू असतानाच उद्धव ठाकरेंनी सातारा, बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भेटी घेतली. त्या वेळी त्यांनी ‘‘दुष्काळ कोरडा असो की ओला, संकटात तुमच्यासोबत आहे. तुमची संपूर्ण कर्जमाफी करणार आहे. कर्ज प्रकरणात बॅंक तगादा लावत असेल तर जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करा. आपले सरकार स्थापन होताच कर्जमाफी केली जाईल,’’ असे आश्‍वासन दिले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com