agriculture news in marathi farmers doesn't respond to government procurement centers in Ahmednagar District | Agrowon

नगर जिल्ह्यात हमीभाव खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 3 डिसेंबर 2020

हमीभावाने मूग, सोयाबीन, उडदाची खरेदी करण्यासाठी नगर जिल्ह्यात अकरा ठिकाणी हमी केंद्रे सुरू केली खरी, मात्र या केंद्राकडे यंदा शेतकऱ्यांनी सपशेल पाठ फिरवली.

नगर : हमीभावाने मूग, सोयाबीन, उडदाची खरेदी करण्यासाठी नगर जिल्ह्यात अकरा ठिकाणी हमी केंद्रे सुरू केली खरी, मात्र या केंद्राकडे यंदा शेतकऱ्यांनी सपशेल पाठ फिरवली. नगर जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या अकरा केंद्रापैकी चार केंद्र वगळता उर्वरित सात केंद्रावर शेतकऱ्यांनी मका विक्रीसाठी नोंदणीच केला नाही. मूग, सोयाबीन, उडदाच्या विक्रीबाबतही यंदा केंद्राकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. 

नगर जिल्ह्यात मक्याची हमी दराने खरेदी करण्यासाठी  कर्जत, मिरजगाव, खर्डा, नान्नज, नगर, संगमनेर, श्रीरामपूर, श्रीगोंदा, कोपरगाव, राहाता, राहुरी या ठिकाणी मकाचे खरेदी केंद्रे सुरू केली. केंद्रे सुरू होऊन आणि विक्रीसाठी नोंदणीला सुरुवात करून महिन्याचा कालावधी लोटला असला तरी अजूनही नोंदणीला सुरुवात झाली नाही. आतापर्यत कर्जतला १७५, मिरजगावला ७११, नान्नजला ८८ व श्रीरामपूरला ३ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून, मिरजगावला २३९७ क्विंटल खरेदी झाली आहे. 

नगर यंदा मुगाचे साठ हजार हेक्टर, उडदाचे ४८ हजार हेक्टरवर, सोयाबीनचे १ लाखापेक्षा अधिक हेक्टरवर उत्पादन घेतले. मात्र बाजारात कमी दर मिळत असल्याने नगर जिल्ह्यात टाकळी खांडेश्वरी (ता. कर्जत), जामखेड, खर्डा, नगर, राहुरी, कर्जत, पारनेर, पाथर्डी, संगमनेर, शेवगाव, श्रीगोंदा या ठिकाणी अकरा हमीभाव खरेदी केंद्रे सुरू केली. मात्र, सोयाबीन, मूग, उडीद विक्रीकडेही शेतकऱ्यांनी पाठ फिरवली. आतापर्यंत मुगासाठी ६८७ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. त्यात ३०९ शेतकऱ्यांनी १६१७ क्विटंल, उडदाची १६ शेतकऱ्यांकडून ११२ क्विंटल खरेदी झाली. सोयाबीनसाठी १३१ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. मात्र, खरेदी झालीच नाही. सोयाबीन, मूग, उडदाच्या नोंदणीला प्रतिसाद मिळत नसताना बाजारात मात्र मूग, उडदाची मोठी आवक होत आहे आणि दरही हमीदराच्या बरोबरीने आहे. 

तुरीचे नियोजन करावे 
नगरसह राज्यातच यंदा तुरीचे पीक जोमात आहे. दोन वर्षांपूर्वी तुरीचे उत्पादन अधिक असल्याने विक्रीचा प्रश्‍न निर्माण झाला होता. यंदाची स्थिती पाहता तशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे यंदाचे लागवड क्षेत्र आणि होणारे उत्पादन याचा अंदाज बांधून शासनाने हमीभावाने तुरीची खरेदी करण्याचे नियोजन करावे, अशी मागणी होऊ लागली आहे.


इतर ताज्या घडामोडी
रिसोडमध्ये कांदा बीजोत्पादनाकडे कल रिसोड, जि. वाशीम : तालुक्यात यंदा कांदा...
औरंगाबादेत सर्वच पक्षांकडून गुलालाची...औरंगाबाद : मतदानाची प्रक्रिया शांततेत पार...
पुणे जिल्ह्यात संमिश्र निकाल; दावे-...पुणे ः जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये...
साताऱ्यात स्थानिक आघाड्यांचा जल्लोषसातारा ः दोन दिवसांपूर्वी मतदान झाले. गेले दोन...
नांदेड जिल्ह्यात प्रस्थापितांनी सत्ता...नांदेड : नांदेड जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे...
नाशिक जिल्ह्यात प्रस्थापितांना धक्कानाशिक : जिल्ह्यात एकूण ६२१ ग्रामपंचायतीच्या...
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या...यवतमाळ : माजी मुख्यमंत्री व जलक्रांतीचे प्रणेते...
परभणी जिल्ह्यात संमिश्र यशपरभणी ः परभणी जिल्ह्यातील मतदान झालेल्या ४९८...
भाजपचे ४४, शिवसेनेचे २२ ग्रामपंचायतीवर...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील ७० ग्रामपंचायतीपैकी...
नागपुरात संत्रा दरात तेजीनागपूर ः आंबिया बहाराचा हंगाम अंतिम टप्प्यात...
सांगलीत भाजपला धक्का;  महाविकास आघाडीला...सांगली : ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालात...
रत्नागिरीत शिवसेनेला कौल रत्नागिरी : जिल्ह्यातील ३६० ग्रामपंचायतींचे निकाल...
सोलापुरात प्रस्थापितांना धक्कासोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ५९०...
उमरेड येथील महिलांनी स्थापन केली शेतकरी...उमरेड. जि. नागपूर : शेतीमधील विषम परिस्थितीची दखल...
स्वाभिमानीचा विजयासाठी संघर्षकोल्हापूर : कोण म्हणतंय येत नाही, आल्याशिवाय राहत...
‘ब्लॅक राइस’ बियाणे निर्मितीचे काम सुरुरत्नागिरी ः तालुक्यातील शिरगाव येथील कृषी संशोधन...
सोलापुरात वांगी, गाजराला उठावसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
विदर्भात महाविकास आघाडी, भाजपला संमिश्र...नागपूर : विदर्भात महाविकास आघाडी, भाजप प्रणीत...
वऱ्हाडात महाविकास आघाडीला यश अकोला : ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीच्या...
जळगाव जिल्ह्यात ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव...जळगाव : परभणी जिल्ह्यात आढळून आलेल्या ‘बर्ड फ्लू’...