नाविन्यपूर्ण प्रयोग करणारे शेतकरी कृषी विभागाचे आयडॉल ठरावेत

कोल्हापूर जिल्ह्यात सोयाबीनच्या उत्पादनवाढीबरोबरच हायड्रोफोनिक्‍स शेतीचे प्रयोग केले जात आहे. याबाबी अतिशय कौतूकास्पद असून, हे प्रयोग राज्यात राबविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी येथे सांगितले.
नाविन्यपूर्ण प्रयोग करणारे शेतकरी कृषी विभागाचे आयडॉल ठरावेत Farmers experimenting with innovation The idol of the agriculture department should be decided
नाविन्यपूर्ण प्रयोग करणारे शेतकरी कृषी विभागाचे आयडॉल ठरावेत Farmers experimenting with innovation The idol of the agriculture department should be decided

कोल्हापूर : जिल्ह्यात सोयाबीनच्या उत्पादनवाढीबरोबरच हायड्रोफोनिक्‍स शेतीचे प्रयोग केले जात आहे. याबाबी अतिशय कौतूकास्पद असून, हे प्रयोग राज्यात राबविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी येथे सांगितले. भुसे हे खरीप आढावा बैठकीसाठी शुक्रवारी(ता. ८) जिल्हा दौऱ्यावर होते. या दरम्यान त्यांनी हातकणंगले तालुक्‍यातील नाविन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या त्यावेळी आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदाही शेतकऱ्यांची अवस्था बिकट बनली आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्हावार दौरे करून किफायतशीर शेतीचे प्रयोग मी पहात आहे. राज्याची हेक्‍टरी सोयाबीन उत्पादकता १४ क्विंटल असताना कोल्हापूर जिल्ह्यात मात्र एकरी १३ क्विंटलपर्यंत उत्पादन घेऊन उत्पादन वाढीचे प्रयोग केले जात आहेत. ही समाधानाची बाब आहे. याचबरोबर हायड्रोफोनिक्‍स सारखे नवीन तंत्रज्ञानही प्रयोग म्हणून केले जात आहे. जिल्ह्यातील पश्‍चिम भागात मधुमक्षिका पालनासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पुढाकार घेवून त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे.

जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात चहा लागवडीचे प्रयोग झाले होते. अशा प्रयोगांना बळकटी देण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने नक्कीच प्रयत्न केले जातील. प्रयोग छोटे असले तरी त्यातून दिसणारी शेतकऱ्यांची धडपड हे खूप महत्वाचे ठरतात. त्याची दखल येथून पुढील काळात शेती विभागा प्राधान्याने घेईल. यावेळी शेतकऱ्यांनी कृषी पतपुरवठासह विविध योजनांच्या अडचणी भुसे यांच्यासमोर  मांडल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com