Agriculture news in marathi Farmers experimenting with innovation The idol of the agriculture department should be decided | Agrowon

नाविन्यपूर्ण प्रयोग करणारे शेतकरी कृषी विभागाचे आयडॉल ठरावेत

टीम अॅग्रोवन
शनिवार, 10 एप्रिल 2021

कोल्हापूर जिल्ह्यात सोयाबीनच्या उत्पादनवाढीबरोबरच हायड्रोफोनिक्‍स शेतीचे प्रयोग केले जात आहे. याबाबी अतिशय कौतूकास्पद असून, हे प्रयोग राज्यात राबविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी येथे सांगितले.

कोल्हापूर : जिल्ह्यात सोयाबीनच्या उत्पादनवाढीबरोबरच हायड्रोफोनिक्‍स शेतीचे प्रयोग केले जात आहे. याबाबी अतिशय कौतूकास्पद असून, हे प्रयोग राज्यात राबविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी येथे सांगितले. भुसे हे खरीप आढावा बैठकीसाठी शुक्रवारी(ता. ८) जिल्हा दौऱ्यावर होते. या दरम्यान त्यांनी हातकणंगले तालुक्‍यातील नाविन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या त्यावेळी आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदाही शेतकऱ्यांची अवस्था बिकट बनली आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्हावार दौरे करून किफायतशीर शेतीचे प्रयोग मी पहात आहे. राज्याची हेक्‍टरी सोयाबीन उत्पादकता १४ क्विंटल असताना कोल्हापूर जिल्ह्यात मात्र एकरी १३ क्विंटलपर्यंत उत्पादन घेऊन उत्पादन वाढीचे प्रयोग केले जात आहेत. ही समाधानाची बाब आहे. याचबरोबर हायड्रोफोनिक्‍स सारखे नवीन तंत्रज्ञानही प्रयोग म्हणून केले जात आहे. जिल्ह्यातील पश्‍चिम भागात मधुमक्षिका पालनासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पुढाकार घेवून त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे.

जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात चहा लागवडीचे प्रयोग झाले होते. अशा प्रयोगांना बळकटी देण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने नक्कीच प्रयत्न केले जातील. प्रयोग छोटे असले तरी त्यातून दिसणारी शेतकऱ्यांची धडपड हे खूप महत्वाचे ठरतात. त्याची दखल येथून पुढील काळात शेती विभागा प्राधान्याने घेईल. यावेळी शेतकऱ्यांनी कृषी पतपुरवठासह विविध योजनांच्या अडचणी भुसे यांच्यासमोर 
मांडल्या.


इतर बातम्या
मॉन्सूनच्या प्रवाहाला पोषक स्थिती पुणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अरबी...
महिनाभरातच गाईच्या दूधदरात ८ रुपये कपात नगर ः कोरोना लॉकडाउनमुळे दुधाची मागणी कमी...
काबुली हरभऱ्याच्या दरात घसरणीची शक्यता...नवी दिल्ली ः देशात यंदा काबुली हरभऱ्याचे उत्पादन...
ग्राम कृषी विकास समित्या स्थापन करा :...पुणे ः कोरोना लॉकडाउनमुळे राज्याच्या खरीप...
पीकविम्यासाठी राज्यात बीड मॉडेल ः ...अमरावती : प्रशासकीय खर्च आणि दहा टक्के नफा अशी...
माढा, उत्तर सोलापूर, अक्कलकोटला पाऊससोलापूर ः जिल्ह्यात रविवारी (ता.९) काही भागात...
उजनीचे पाणी पळविण्याचा प्रश्न...सोलापूर ः उजनी जलाशयातील पाच टीएमसी पाण्याला...
जळगाव जिल्ह्यातील पीक कर्जवाटपाला गती...जळगाव ः जिल्ह्यात खरिपासंबंधी पीक कर्जवाटप गेल्या...
वार्सा येथे पाणीटंचाईशी पंधरा...वार्सा, जि. धुळे : धज्या आंबापाडा येथील...
बीडमध्ये वादळी पावसाचा दुसऱ्या दिवशीही...बीड : जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही वादळी पावसाचा...
नांदेड जिल्ह्यात पावसाचा तडाखा सुरुच नांदेड : जिल्ह्यात पूर्व मोसमी पावसाने मुक्काम...
‘लिंबोटी’चे पाणी २३ गावांना मिळणारनांदेड : कंधार तसेच लोहा तालुक्यातील संभाव्य...
साताऱ्यात आले लागवडपूर्व कामांना गतीसातारा ः जिल्ह्यात अक्षय तृतीयेच्या शुभ...
पुणे बाजार समितीमध्ये लसीकरणाला प्रारंभपुणे ः गुलटेकडी येथील पुणे बाजार समितीच्या वतीने...
केवळ जाहिरातींद्वारे कोरोना संपणार नाही...मुंबई ः कोरोना परिस्थिती लक्षात घेता ‘एक देश एक...
कोरोनानंतर ‘कृषी’चा अनुशेष दूर करणार ः...नागपूर : विदर्भातच नाही तर राज्याच्या कृषी...
कृषी कर्मचाऱ्यांना कोरोनाचा धसकाकोल्हापूर : राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव...
बुलडाण्यात तीन लाखांवर शेतकऱ्यांना...बुलडाणा : सातत्याने संकटाचा सामना करणाऱ्या...
कांदा बियाणे भेसळीचा शेतकऱ्यांना फटकाश्रीरामपूर, जि. नगर ः यंदा खरिपात कांदा उत्पादक...
पशुवैद्यक करणार घरपोच सेवा बंदनागपूर : पशुवैद्यकांना फ्रंटलाइन वर्कर्स व कोरोना...