agriculture news in marathi, farmers explain situation due to crop damage, satara, maharashtra | Agrowon

पीक नुकसानीबाबत शेतकऱ्याने मांडली कृषी अधिकाऱ्यांसमोर व्यथा

टीम अॅग्रोवन
रविवार, 18 ऑगस्ट 2019

 कऱ्हाड, जि. सातारा ः घरात हुतं नव्हतं ते मोडून, कर्ज काढून भात, सोयाबीन, केळी पिकं केली हुती. पण पावसाचं पाणी पिकांवर १५ ते २० फुटांपर्यंत दहा दिवस राहिलं. त्यानं सारी पिकं भुईसपाट होऊन उद्‌ध्वस्त झालीत. साहेब तुम्हीच सांगा आता यातून सावरायच कसं. कर्ज फेडायचं कसं. अशी व्यथा पीक नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी आलेल्या कृषी अधिकाऱ्यांसमोर सुपने (ता. कऱ्हाड, जि. सातारा) येथील तरुण शेतकरी दत्तात्रेय जांभळे यांनी मांडली. या वेळी भात, केळी, सोयाबीन पिकाची आणि संबंधित शेतकऱ्यांची झालेली अवस्था पाहून अधिकारीही काही काळ निःशब्द झाले. 

 कऱ्हाड, जि. सातारा ः घरात हुतं नव्हतं ते मोडून, कर्ज काढून भात, सोयाबीन, केळी पिकं केली हुती. पण पावसाचं पाणी पिकांवर १५ ते २० फुटांपर्यंत दहा दिवस राहिलं. त्यानं सारी पिकं भुईसपाट होऊन उद्‌ध्वस्त झालीत. साहेब तुम्हीच सांगा आता यातून सावरायच कसं. कर्ज फेडायचं कसं. अशी व्यथा पीक नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी आलेल्या कृषी अधिकाऱ्यांसमोर सुपने (ता. कऱ्हाड, जि. सातारा) येथील तरुण शेतकरी दत्तात्रेय जांभळे यांनी मांडली. या वेळी भात, केळी, सोयाबीन पिकाची आणि संबंधित शेतकऱ्यांची झालेली अवस्था पाहून अधिकारीही काही काळ निःशब्द झाले. 

मुसळधार पावसाने कऱ्हाड-पाटण तालुक्याला आठवड्याहून अधिक काळ झोडपून काढले. त्यातच कोयना धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने कृष्णा-कोयना नद्यांची पाणीपातळी वाढून महापूर आला. त्यामुळे नदीकाठासह त्या परिसरातील सर्वच शेती पाण्याखाली गेली. पिकांवर किमान दहा ते बारा फूट पाणी आठवड्याहून अधिक काळ राहिल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांदेखत हातची पिके गेली. त्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

शेतकऱ्यांनी कर्ज काढून, उसनेपासने करून, उधारीवर बियाणे, खते घेऊन आपल्या शेतात घेतलेली पिके डोळ्यांदेखत वाया गेल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. पुराचे पाणी कमी झाल्यावर आता नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे सुरू झाले आहेत. त्यामुळे नुकसानीचे वास्तव सध्या समोर येऊ लागले आहे. पंचमान्यासाठी आलेल्या कृषी अधिकाऱ्यांसमोर सुपनेतील तरुण शेतकरी दत्तात्रेय जांभळे यांनी आपली व्यथा मांडली. या वेळी जांभळे यांच्या भात, केळी, हळद या पिकांची अवस्था पाहून मंडल कृषी अधिकारी प्रताप जाधव, कृषी पर्यवेक्षक अशोक कोळेकर, कृषी सहायक मंगला साळुंखे हे अधिकारी निःशब्द झाले.  

शेतकरी कर्जाच्या विवंचनेत 
कऱ्हाड-पाटण तालुक्यात अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यांचेही हेच वास्तव असून, अनेक शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे हे शेतकरी सध्या या संकटातून सावरून कर्ज फेडायचे कसे या विवंचनेत आहेत.


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात कांदा लागवड १४ हजार हेक्‍टरवरजळगाव  ः खानदेशात रब्बी हंगामातील कांदा...
‘कर्जमुक्ती योजनेसाठी येणाऱ्या...अकोला  ः  महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी...
द्राक्षपट्ट्यासह आदिवासी भागात खुलली...नाशिक  : स्ट्रॉबेरी लागवडीसाठी महाबळेश्वरची...
सांगलीत हळदीच्या उत्पादनात घटसांगली : जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात आलेला महापूर...
चांद्यात फ्लॉवरच्या निकृष्ट...नगर : तेलंगण राज्यातील एका बियाणे कंपनीचे...
'थेट जनतेतून सरपंच निवडीचा निर्णय कायम...सोलापूर  ः राज्य सरकारने थेट जनतेतून सरपंच...
औरंगाबाद जिल्ह्यातील टंचाई...औरंगाबाद : जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईचे...
लातूर विभागातील दोन हजार हेक्टरवर फळबाग...नांदेड : कृषीच्या लातूर विभागांतर्गतच्या परभणी,...
अकोला बाजार समितीचे गरजूंना पाठबळअकोला ः कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पुढाकाराने...
उशिराच्या गव्हाला वाढत्या तापमानाचा...जळगाव  ः खानदेशात गहू पिकाची स्थिती...
पपई दरांचा नंदुरबारात पुन्हा तिढाशहादा, जि. नंदुरबार  : सध्या मंदी असल्याने...
पीकविमा भरपाई न मिळाल्यास तीव्र आंदोलन...अमरावती  ः जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगामात...
गडचिरोली : 'आयसीएआर'ची काजू पीक...गडचिरोली  ः भात उत्पादक पूर्व विदर्भात...
ऐन फेब्रुवारीतच उन्हाळ्याच्या झळा पुणे : राज्यात कमाल तापमानात मोठी वाढ झाल्याने...
वनबंधू योजना सुरू करण्यासाठी केंद्राकडे...नाशिक : आदिवासी विभागाच्या वनबंधू योजनेअंतर्गत १४...
मराठवाड्यातील रेशीम प्रकल्पाला ग्रीन...औरंगाबाद : झपाट्याने विस्तारत असलेल्या रेशीम...
`गोवर-रुबेला'त सोलापूर जिल्ह्यात...सोलापूर : केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘गोवर-...
सांगली जिल्ह्यात शेत, पाणंद रस्त्यांचे...लेंगरे, जि. सांगली : शेत आणि पाणंद रस्त्यांचे...
पाणीवाटप संस्थेद्वारे मिळणार ‘ताकारी’चे...सांगली : ताकारी उपसा सिंचन योजनेच्या लाभ...
मका संशोधन केंद्राचे भिजत घोंगडेऔरंगाबाद : कार्यकारी परिषदेच्या ठरावानंतर...