कांद्याच्या शिवार खरेदीत लुटीचे प्रकार समोर

नाशिक : जिल्ह्यातील बाजार समित्या बंदचा गैरफायदा शिवार खरेदी करणाऱ्या काही व्यापाऱ्यांनी घेतल्याची माहिती समोर आली आहे. मालेगाव, येवल्यासह काही तालुक्यांत असे प्रकार झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
कांद्याच्या शिवार खरेदीत लुटीचे प्रकार समोर
कांद्याच्या शिवार खरेदीत लुटीचे प्रकार समोर

नाशिक : जिल्ह्यातील बाजार समित्या बंदचा गैरफायदा शिवार खरेदी करणाऱ्या काही व्यापाऱ्यांनी घेतल्याची माहिती समोर आली आहे. मालेगाव, येवल्यासह काही तालुक्यांत असे प्रकार झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. आधीच लेट खरीप कांदा विकता येत नसल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याच्या प्रकाराबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.  मार्चअखेर बंदनंतर जिल्ह्यात फक्त लासलगाव बाजार समितीत कांदा लिलावाचे १ एप्रिलपासून कामकाज सुरू झाले. सरासरी ८१५ प्रतिक्विंटल दर मिळाला. मात्र त्यात घसरण होतीच. या अनुषंगाने कांदा लिलाव बंदमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी कांदा उत्पादकांना संपर्क केल्यानंतर हा प्रकार त्यांनी सांगितला. शेतकऱ्यांनी याबाबत सांगितले, की काही जणांनी सोशल मीडियावर खरेदीची जाहिरात केली. मालेगाव तालुक्यात लासलगाव येथील काही व्यापाऱ्यांनी खरेदीसाठी संपर्क साधला होता. मात्र अवघ्या ७०० ते ७५० प्रतिक्विंटलप्रमाणे भाव पाडून मागितले गेले. एकीकडे संभाव्य लॉकडाउनच्या धर्तीवर शेतकरी चिंतेत आहे. अधिक उत्पादन खर्च, उत्पादनात घट व दरात घसरण अशा अनेक अडचणींचा सामना कांदा उत्पादक करतोय, अशातच हे प्रकार समोर आल्याने संताप व्यक्त होत आहे.  

लेट खरीप रांगड्या कांद्याला टिकवणक्षमता नसल्याने उष्णता वाढून कांद्यावरील आवरण निघणे, वजनात घट, जास्त दिवस काढणी झाल्याने मोड येऊन पोकळ पडण्याची समस्या वाढली आहे. परिणामी, प्रतवारी घटल्याने कांद्याची खाद होत आहे. हे नुकसान ३० टक्क्यांवर गेल्याचा अंदाज आहे. बाजार सुरू करा ही शेतकऱ्यांची आग्रही मागणी होती. यावर जिल्हा उपनिबंधकांनी आदेश देत कामकाज सुरू करण्याचे पत्रही दिले. मात्र लासलगाव वगळता कामकाज बंद असल्याने आदेशाला केराची टोपली दाखवल्याची स्थिती आहे. ‘आधी रांगडा नंतर उन्हाळ विकणार’ या भूमिकेवर शेतकरी ठाम बाजार समित्या बंद राहिल्याने रांगडा कांदा विक्रीविना तुंबला आहे. त्याची टिकवणक्षमता कमी असल्याने अगोदर ‘रांगडा विका त्यांनतर उन्हाळ कांदा विका’,अशी शेतकऱ्यांनी सोशल मीडियावर मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे सोमवार (ता. ५)पासून अधिक रांगडा कांदा बाजारात येण्याची शक्यता आहे. मात्र आवक वाढल्यास दर घसरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अशी आहे आडमुठी भूमिका 

  • काही ठिकाणी टोमॅटो, भाजीपाला, डाळिंब, द्राक्षमणी लिलाव सुरू; फक्त कांद्याचे बंद
  • शिवार खरेदीत बाजार भावापेक्षा कमी दराने खरेदीचा प्रयत्न  
  • खळ्यांवर खरेदी सुरू सांगून मनमानी भावाने खरेदी
  • काही ठिकाणी माल खराब होण्यापेक्षा द्या, असे सांगून उधार खरेदी करण्याचा प्रयत्न 
  • प्रतिक्रिया.. अगोदर कांदा बियाण्यात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी अडचणीत आहे. मात्र मार्च अखेर कारण दाखवीत कामकाज बंद ठेवून अडचणी वाढवल्या आहेत. त्यामुळे आवक वाढवून दर पाडण्याचा हा प्रकार उघड झाला आहे. तेजीत सुटीच्या दिवशी कामकाज सुरू राहते, मात्र मंदीच्या काळात शेतकऱ्यांची अडचण केली जाते. - कैलास जाधव, कांदा उत्पादक, भरवीर, ता. चांदवड लाल कांदा उन्हाळ सारखा टिकत नसल्याने विकण्याची वेळ आली. बाजार समित्या बंद असताना व्यापाऱ्यांनी शिवार खरेदी रोखीने माल पाहून मनमानी दरात खरेदी केली. एकीकडे संचालकांना मतदान शेतकऱ्यांच पाहिजे, मात्र कामकाजात व्यापाऱ्यांना जाऊन मिळतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. व्यापारी अडवणूक करतात. - पोपट निकम, शेतकरी ढवळेश्‍वर, ता. मालेगाव

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com