agriculture news in marathi, farmers faces problems regarding Farm land mapping | Agrowon

शेतजमीन मोजणीचा गोंधळ सुरूच
टीम अॅग्रोवन
सोमवार, 26 ऑगस्ट 2019

पुणे : ड्रोनच्या माध्यमातून गावांचे डिजिटल नकाशे तयार करून गावकऱ्याला जमीन मालमत्तेची सनद देण्याची घोषणा शासनाने केली आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला शेतजमीन मोजणी बिनचूक व वेळेवर होत नसल्याची तक्रार शेतकरी करीत आहेत. 

शेतजमीन मोजणीतील शेतकऱ्यांची दुरवस्था दाखविणारे उदाहरण बीडच्या अंबाजोगाई भागातील राडी गावाचे दिले जाते. येथील शेतकरी मधुकर राजाराम पांडे यांना भूमी अभिलेख खात्याने चांगलेच जेरीस आणले आहे. 

पुणे : ड्रोनच्या माध्यमातून गावांचे डिजिटल नकाशे तयार करून गावकऱ्याला जमीन मालमत्तेची सनद देण्याची घोषणा शासनाने केली आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला शेतजमीन मोजणी बिनचूक व वेळेवर होत नसल्याची तक्रार शेतकरी करीत आहेत. 

शेतजमीन मोजणीतील शेतकऱ्यांची दुरवस्था दाखविणारे उदाहरण बीडच्या अंबाजोगाई भागातील राडी गावाचे दिले जाते. येथील शेतकरी मधुकर राजाराम पांडे यांना भूमी अभिलेख खात्याने चांगलेच जेरीस आणले आहे. 

“माझ्या शेतजमिनीची मोजणी करण्यासाठी शुल्क भरूनही भूमी अभिलेख खात्याने छळ मांडला आहे. तीन वेळा मोजणीसाठी शुल्क भरले. मात्र, प्रत्येक वेळी मोजणी बिनचूक केली गेली नाही. जमिनीच्या मूळ अभिलेखामध्ये छेडछाड केली गेली. वेगवेगळ्या मोजमापाचे नकाशे दिले गेले. भूमी अभिलेख विभागाचे कर्मचारी शेतकऱ्यांची दिशाभूल कशी होते याचा अनुभव मी घेत आहे,” असे श्री. पांडे यांनी सांगितले. या शेतकऱ्याच्या जमीन कागदपत्रांची केवळ हेराफेरी करून भूमी अभिलेख खाते थांबले नाही. मोजणीनंतर चक्क तीन एकर जमीन गायब झाल्याने शेतकऱ्याला धक्का बसला. त्याने पुण्याच्या जमाबंदी आयुक्त व भूमी अभिलेख संचालकांपर्यंत प्रकरण  नेले आहे. अर्थात, शेतकऱ्याला अजून न्याय मिळालेला नाही. 

“भूमी अभिलेख खात्याच्या चुकांमुळे माझी तीन एकर जमीन कमी भरली आहे. न्याय मागण्याचा प्रयत्न केला असता संशयास्पदपणे टाळाटाळ केली जाते. त्यामुळे येत्या २६ ऑगस्टला बीड जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहन करण्याचा निर्णय मी घेतला आहे,’’ असे श्री. पांडे यांनी हताशपणे म्हटले आहे. मात्र, भूमी अभिलेख विभागाने शेतकऱ्याच्या मुद्यांना चुकीचे ठरविले आहे. या प्रकरणात संबंधित शेतकऱ्याने फाळणी अभिलेखाविरुद्ध हरकत घेतली आहे. त्यामुळे भूमी अभिलेख विभागाकडे रीतसर अपील दाखल करून मूळ फाळणी नकाशा दुरुस्त करण्याचा पर्याय आहे, असे खात्याचे म्हणणे आहे.  

मोजणीप्रक्रिया नियमानुसारच  : जाधव 
बीडचे भूमी अभिलेख जिल्हा अधीक्षक सुदाम जाधव यांनी जमीन मोजणीत चुका झाल्याचा दावा फेटाळून लावला आहे. या प्रकरणात मोजणीची कार्यवाही नियमानुसारच पूर्ण झालेली आहे. मात्र, शेतकऱ्याकडून वारंवार अर्ज किंवा उपोषणासारख्या आतताई मार्गाचा अवलंब केला जात आहे. प्रशासनाला असे वेठीस धरल्यास पुढील जबाबदारी शेतकऱ्याचीच राहील, असा इशारा भूमी अभिलेख खात्याने दिलेला आहे.

इतर अॅग्रो विशेष
अन्नद्रव्यांचा वापर हवा संतुलितचशेतकऱ्यांनी माती आणि पाणी परिक्षणाबरोबरच...
मराठवाडा वॉटर ग्रिडचा संशयकल्लोळ! चिमणीचा खोपा ते राजवाडा, असे निवाऱ्याचे अनेक...
‘एफएमओ’चा सह्याद्री फार्म्सला १२०...नाशिक : शेतकरी उत्पादक कंपन्यांनी स्वतःच्या...
लष्करी अळीच्या नुकसानीचे पंचनामे का...औरंगाबाद : ‘‘शेती तोट्यात गेली, गावचं अर्थकारण...
जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्गजायकवाडी, जि. औरंगाबाद : जायकवाडी धरणामधून...
थकबाकीदार सूतगिरणीच्या संचालकांवर राज्य...मुंबई: कोट्यवधींचे कर्ज थकवल्याप्रकरणी राज्य...
रेशीम विभागाचा सुधारित आकृतीबंध...जालना: झपाट्याने वाढत असलेल्या रेशीम उद्योग व...
अमेरिकन लष्करी अळीकडून ४० टक्के मका फस्तपुणे: राज्यात मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचे...
लष्करी अळी आटोक्यात: कृषी विभागपुणे : राज्यात दोन लाख ६७ हजार हेक्टर क्षेत्रातील...
प्रतिकूलतेतून मेघाताईंची शेतीत भरारीपरभणी जिल्ह्यातील झरी (ता. परभणी) येथील...
सोलापुरात हिरव्या मिरचीचा बाजार कडक सोलापुरात हिरव्या मिरचीचा बाजार कडक ! गेल्या...
अनुदान अर्जांच्या पूर्वसंमतीची पद्धत...पुणे : राज्यातील शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी...
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : राज्यात पावसाला पोषक हवामान होत असल्याने...
महाराष्ट्राप्रमाणे आम्हालाही विकसित...पुणे : महाराष्ट्रातील शेतकरी पीक उत्पादन...
कांदा खाणाऱ्यांचा विचार करता, मग...नाशिक : कांद्यातील भाववाढीला आळा घालण्यासाठी...
द्राक्षपंढरीत गोड्या छाटण्यांना सुरवातनाशिक : चालू वर्षीच्या द्राक्ष हंगामाला सुरवात...
युरियाशिवाय शेती विचार रुजला तरच...नागपूर ः सेंद्रिय शेतीचा विचार गेल्या अनेक...
...अखेर ऊसतोड कामगार महामंडळ स्थापनमुंबई ः गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या...
जलसमृद्धी बक्षीस योजनेतील चौथ्या आणि...पुणे : ॲग्रोवन जलसमृद्धी बक्षीस योजनेची सोडत...
नागपूर जिल्हा बॅंक घोटाळा निकाली...नागपूर ः नागपूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेतील...