‘पावसामुळे पीक नुकसान झालेय; दिवाळी कशी साजरी करायची’

 ऐन दिवाळीत गाजरे धुऊन त्याची प्रतवारी करून बाजारात नेण्याची तयारी सुरू आहे.
ऐन दिवाळीत गाजरे धुऊन त्याची प्रतवारी करून बाजारात नेण्याची तयारी सुरू आहे.

नाशिक  : दिवाळीचा सण सुरू असला तरी निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या आनंदात पावसाने व्यत्यय आणला आहे. पावसामुळे जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत आले आहेत. शेतात पीक आहे, पण पावसामुळे मोठे नुकसान झाले. शेतीमाल आहे, पण खिशात पैसा नाही, अशा अवस्थेत दिवाळी कशी साजरी करायची, असा प्रश्‍न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. मॉन्सूनोत्तर पावसामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच आहे. 

जिल्ह्यातील प्रमुख नगदी पीक असलेले मका, सोयाबीन, टोमॅटो, भाजीपाला, द्राक्ष ही पिके मॉन्सूनत्तोर पावसामुळे अडचणीत आली आहेत. त्यामुळे शेतीमाल काढणीस येऊनही पावसामुळे तो मातीमोल झाला आहे. त्यामुळे दोन पैसे सुद्धा शेतकऱ्याला साधता आले नाही. आर्थिक अडचणीत दिवाळी सण साजरा करावा तरी कसा, या विवंचनेने शेतकरी त्रस्त आहेत. जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली. शेतकऱ्यांनी नियोजन करून पीक बहरवले. त्यावर शेतकऱ्यांचे वर्षभराचे, पुढील पेरणीचे नियोजन ठरले.

मात्र या वर्षी मॉन्सूनोत्तर पावसाने सोयाबीन, टोमॅटो, भाजीपाला व द्राक्ष बागांना मोठा फटका दिला. मुसळधार पावसाने सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले. द्राक्षे खराब झाली. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतीमालाच्या विक्रीवर दिवाळीत मुलामुलींच्या कपड्यालत्त्यासह फराळ, फटाके खरेदीचे नियोजन असतो. मात्र यंदा शेतकऱ्यांचे स्वप्न पावसात वाहून गेले आहे.

प्रतिक्रिया

चालू वर्षी दुष्काळी स्थितीत द्राक्ष बागा जगविल्या. मोठा खर्च करून हंगाम घेतला. मात्र पावसाने द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे दिवाळी कडू झाली आहे. - अरुण भामरे, द्राक्ष उत्पादक, पिंगळवाडे, ता. बागलाण

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com