पैनगंगा नदी पात्रात शेतकऱ्यांचे उपोषण चौथ्या दिवशी सुरूच
पैनगंगा नदी पात्रात शेतकऱ्यांचे उपोषण चौथ्या दिवशी सुरूच

पैनगंगा नदी पात्रात शेतकऱ्यांचे उपोषण चौथ्या दिवशी सुरूच

हिमायतनगर, जि. नांदेड ः मराठवाडा -विदर्भाच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवरील इसापूर येथील उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या धरणातून नदीपात्राला तिसरा कालवा जाहीर करून त्यामध्ये डाव्या -उजव्या कालव्याप्रमाणे पाणी सोडण्यात यावे, या मागणीसाठी मराठवाडा-विदर्भातील ९२ गावातील शेतकऱ्यांनी बोरी पुलाजवळील कोरड्या नदीपात्रात सोमवारी (ता. १९) सुरू केलेले बेमुदत उपोषण या प्रश्नांवर तोडगा न निघाल्यामुळे गुरुवारी (ता. २२) चौथ्या दिवशीही सुरूच होते.

दरम्यान, बुधवारी (ता. २१) खासदार अॅड. राजीव सातव, माजी खासदार सुभाष वानखेडे, आमदार नागेश पाटील आदींनी उपोषणकर्त्या शेतकऱ्यांशी चर्चा केली. नदीपात्रात पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शासन दरबारी पाठपुरावा करू, असे आश्वासन आजी -माजी खासदारांनी दिले.

इसापूर धरणात पुरेशा प्रमाणात उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाल्यामुळे डाव्या-उजव्या कालव्याद्वारे रब्बी तसेच उन्हाळी हंगामात पाणी आवर्तनाचे नियोजन करण्यात आले आहे. सध्या या कालाव्याद्वारे पाणी आवर्तन सोडण्यात आले आहे.

पावसाळ्यात धरण पूर्णपणे भरल्यानंतर नदी पात्रात पाण्याचा विसर्ग केला जातो. त्यामुळे नदीच्या दोन्ही काठावरील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी घूसून पिकांची नासाडी होते, जमिनी खरडून जातात. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. परंतु, रब्बी हंगामात मात्र नदी पात्र कोरडे पडते. त्यामुळे नदी काठावरील मराठवाडा आणि विदर्भातील अनेक गावांतील शेतकरी, नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो.

यामुळे धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्याद्वारे पाणी आवर्तन सोडले जाते. त्याप्रमाणे नदी पात्र हे धरणाचा तिसरा कालवा घोषित करून त्यामध्ये पाणी सोडण्यात यावे, या मागणीसाठी मराठवाडा -विदर्भातील ९२ गावातील शेतकऱ्यांनी सोमवार (ता. १९) पासून पैनगंगा नदीपात्रात बोरी पुलाजवळील कोरड्या नदी पात्रात बेमुदत सुरू केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com