agriculture news in Marathi farmers fear of orange project migration Maharashtra | Agrowon

नवा संत्रा प्रक्रिया प्रकल्प पळविला जाण्याची भीती 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 20 मार्च 2021

विदर्भात नव्या हायटेक संत्रा प्रकल्पाची घोषणा झाल्याने संत्रा उत्पादकांनी समाधान व्यक्त केले. मात्र हा प्रकल्प पूर्ण होईल किंवा नाही, अशी अनामिक भीती देखील शेतकऱ्यांमध्ये आहे.

अमरावती ः विदर्भात नव्या हायटेक संत्रा प्रकल्पाची घोषणा झाल्याने संत्रा उत्पादकांनी समाधान व्यक्त केले. मात्र हा प्रकल्प पूर्ण होईल किंवा नाही, अशी अनामिक भीती देखील शेतकऱ्यांमध्ये आहे. यापूर्वी अमरावती जिल्ह्यासाठी संत्रा प्रक्रिया उद्योगाची घोषणा झाली होती. मात्र हा प्रकल्प अशोक चव्हाण यांनी नांदेडला नेला होता. त्यामुळे या वेळी देखील वजनदार नेत्यांकडून आपल्या हक्‍काचा प्रकल्प पळविला जातो की काय, या शक्‍यतेने संत्रा उत्पादकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. 

दीड लाख हेक्‍टर लागवडीच्या माध्यमातून भौगोलिक मानांकन प्राप्त असलेला नागपुरी संत्रा विदर्भाचे मुख्य फळपीक झाला आहे. असे असताना गुणवत्ता सुधार, प्रक्रियेसाठी लागणारे वाण विकसित करण्यात संशोधन संस्था अपयशी ठरल्या. एकूण उत्पादनाच्या ४० टक्‍के संत्रा लहान आकाराचा (टुल्ली) राहतो. प्रक्रियेकामी याचा वापर झाल्यास चांगले दर मिळू शकतात. परंतु प्रक्रिया उद्योगच नसल्याने ही फळे फेकण्याशिवाय पर्याय राहत नाही.

राज्याच्या अर्थसंकल्पात आमदार देवेंद्र भुयार यांच्या पुढाकाराने वरुड-मोर्शी मतदारसंघात हायटेक संत्रा प्रक्रिया उद्योगाला मान्यता मिळाली. परंतु हा प्रकल्प आकारास येतो किंवा नाही या भीतीने या भागातील उत्पादकांना पिछाडले आहे. त्यामागे कारणेही तशीच आहेत. 

वरुड तालुक्‍यात १९५७ मध्ये अमरावती जिल्हा फळ बागायतदार रस उत्पादक औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित, शेंदूरजनाघाट यांनी ज्यूस प्रकल्प उभारला. तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी २७ नोव्हेंबर १९५७ मध्ये या प्रकल्पाचे कोनशिला रोवली. सहकारी तत्त्वावरील या प्रकल्पातून देशाच्या मुख्य शहरात ज्यूस पाठविण्याचा प्रयत्न झाला. परंतु राजाश्रयाअभावी अवघ्या पाच वर्षांतच हा प्रकल्प अवसायनात गेला आणि जिल्हा बॅंकेने ताब्यात घेतला. १९९२ मध्ये सोपॅक या खासगी कंपनीने प्रकल्प उभारला. तो देखील बंद पडला. 

तत्कालीन कृषिमंत्री हर्षवर्धन देशमुख यांनी मोर्शी तालुक्‍यातील मायवाडी येथे ग्रेडिंग, कोटिंग प्रकल्पाची उभारणी केली. पहिल्या टप्प्यातील हा प्रकल्प देखील बरीच वर्ष बंद होता. आता महाऑरेंजच्या माध्यमातून तो चालविला जात आहे. अमरावती जिल्ह्यातील इतरही खासगी आणि प्रस्तावीत प्रकल्पांना निधीची चणचण भासत आहे. त्यामुळे ते देखील पूर्णत्वास जाण्याची शक्‍यता कमीच आहे. त्यासोबतच नागपुरातील रामदेबाब यांचा फूड प्रोसेसिंग प्रकल्प देखील गुंडाळल्याची चर्चा आहे. त्यामुळे संत्रा प्रकल्पांची घोषणा ही या भागातील शेतकऱ्यांसाठी ‘नेमेची येतो पावसाळा’ या पठडीतील ठरत असल्याने त्याविषयीची उत्सुकता मात्र आता उरली नाही हे देखील तितकेच खरे आहे. 

प्रतिक्रिया
हा प्रकल्प अर्थसंकल्पात मंजूर व्हावा याकरिता सर्व बागायतदार आमदार देवेंद्र भुयार यांच्या पाठीशी राहिले. तो पूर्णत्वास जावा याकरिता पाठपुरावा करणेच आपल्या हातात आहे. माजी मुख्यमंत्र्यांनी हिवरखेड भागात एका मोठ्या कंपनीच्या प्रकल्पाचे भूमिपूजन केले. त्याकरिता या भागातील परंपरागत संत्रा चालणार नाही. नवीन रोपांची खरेदी व त्याचे संवर्धन करावे लागणार आहे. मग त्या प्रकल्पाचा नागपुरी संत्र्याच्या मुल्यवर्धनात उपयोग काय? 
- हर्षवर्धन देशमुख, माजी कृषिमंत्री 


इतर अॅग्रो विशेष
राज्यात आठवडाभर हलक्या पावसाची शक्यतापुणे : कोकणसह राज्यातील काही भागांत पावसाने...
देशात सव्वादोन लाख हेक्टरवर हळद लागवडसांगली ः यंदा देशात हळदीची लागवड अंतिम टप्प्यात...
आयातशुल्क वाढीचा संत्रा निर्यातीवर...अमरावती : संत्र्याचा मुख्य आयातदार असलेल्या...
मध्य प्रदेशात सोयाबीनचे क्षेत्र कमी...नागपूर : मध्य प्रदेशात पिवळं सोनं म्हणून ओळखल्या...
प्रक्रिया उद्योगातून ‘सूर्या’ची झळाळी तेलगाव (ता. वसमत. जि. हिंगोली) येथील सूर्या...
संकटांमधून जांभूळ शेती उद्योगाची वाटचालसिंधुदुर्ग जिल्ह्यातील निरुखे येथील अनिरुद्ध...
पावसाचा जोर कमी होणार पुणे : कोकण, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे व...
कोकणात पावसाचा जोर ओसरला पुणे : कोकणात धुमाकूळ घातलेल्या पावसाचा जोर...
सोसायट्यांवर बॅंकिंग सुधारणांचा परिणाम...पुणे ः बॅंकिंग नियमन कायद्यात झालेल्या...
राज्यात ‘एचटीबीटी’च्या ७५ लाख पाकिटांची...पुणे ः बंदी असूनही देशात कपाशीच्या तणनाशक सहनशील...
राज्यातील धरणांत २३४ टीएमसी पाणीसाठानगर ः राज्याच्या एकूण सहा महसूली विभागांतील...
कोकण, विदर्भात मुसळधारेचा अंदाज पुणे : दक्षिण कोकणची किनारपट्टी ते उत्तर...
राज्यात ठिकठिकाणी मुसळधारपुणे : कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग...
उत्तरेत मॉन्सूनचा वेगाने प्रवास पुणे : गेल्या दोन दिवसांपासून उत्तर भारतात पुन्हा...
तुम्हीच अभ्यास करा, अन् विम्याचे ठरवा...सोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक...
चिकू विमा हप्त्यात सहा पटीने वाढ पालघर ः कोरोनाच्या संकटात चहूबाजूंनी शेतकरी...
फळपीक विमा योजनेत हवामान धोके कायम, ...सोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा...
चार पिकांमध्ये पूर्ण बियाणे बदल नगर ः चांगले उत्पादन घ्यायचे तर नवी सुधारित...
द्राक्ष उत्पादकांची फसवणूक, ५...नाशिक : दिंडोरी तालुक्यातील वळखेड, निगडोळ, नळवाडी...
राज्यात ३.१४ लाखांवर नवीन वीजजोडण्या सांगली ः कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत मार्च...