तलाठी हरवल्याची शेतकऱ्यांची तक्रार

तिवसा तालुक्यातील अनकवाडी मालपूर येथील तलाठी गेल्या अनेक दिवसांपासून गावात आले नाहीत. त्यामुळे तलाठी हरवल्याची तक्रार ग्रामस्थांनी तिवसा तहसीलदार यांच्याकडे केली आहे.
तलाठी हरवल्याची शेतकऱ्यांची तक्रार
तलाठी हरवल्याची शेतकऱ्यांची तक्रार

अमरावती: तिवसा तालुक्यातील अनकवाडी मालपूर येथील तलाठी गेल्या अनेक दिवसांपासून गावात आले नाहीत.  त्यामुळे तलाठी हरवल्याची तक्रार ग्रामस्थांनी तिवसा तहसीलदार यांच्याकडे केली आहे.  तिवसा तालुक्यातील अनकवाडी, रघुनाथपुर, मालधूर मी जेमतेम लोकवस्तीची गावे आहेत. गावातील सर्व लोकांची उपजीविका ही शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज व इतरही कामाकरता गावात तलाठी असणे गरजेचे आहे. मात्र तलाठी मुख्यालयी राहत नसल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ६ दिवसांपूर्वी या गावाचा कारभार ए. आर. सोळंके या तलाठ्याकडे प्रभारी म्हणून देण्यात आला. परंतु प्रभार स्वीकारल्यापासून एकही दिवस तलाठी या तिन्ही गावाकडे फिरकले नाही. त्यामुळे ऐन हंगामात शेतकऱ्यांना शेती कामासाठी लागणाऱ्या विविध कागदपत्रांसाठी भटकंती करावी लागत आहे. परिणामी अनकवाडी, मालधूर येथील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात येऊन संबंधित तलाठी उपस्थित नसल्याबाबत तक्रार दिली आहे.  शेतकऱ्यांना होणारा त्रास लक्षात घेता प्रशासनाने या बाबीकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच तलाठी रुजू न झाल्यास युवा संघर्ष संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेण्याचा इशारा दिला आहे. यावेळी मनोज साबळे, सुरज घुमरखेडे, विकास तूर्काने, गजानन साबळे, प्रदीप साबळे, विजय डोंगरे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

प्रतिक्रिया माझ्याकडे अनकवाडी, मालधूर, रघुनाथपुर, सालोरा या मौजातील एकूण सहा गावांचा अतिरिक्त प्रभार आहे. शेतकऱ्यांना त्रास होणार नाही याची काळजी सुद्धा घेत आहे. डी. एस. सी. चे काही अधिकार माझ्याकडे आले नाहीत त्यामुळे इतर कागदपत्रे देण्यात अडचणी आहेत. - ए. आर. सोळंके, तलाठी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com