agriculture news in marathi, Farmers of flowers grow in diwali | Agrowon

फूल उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळीवर भिस्त
टीम अॅग्रोवन
शनिवार, 3 नोव्हेंबर 2018

पुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची प्रमुख भिस्त असणाऱ्या वर्षभरातील महत्त्वाच्या गणेशोत्सव, दसरा आणि दिवाळी या तीन सणांपैकी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर चांगले दर मिळण्याची आशा आहे. यंदा परतीच्या पावसाने केलेली निराशा आणि दुष्काळी परिस्थितीमुळे फुलांना चांगले दर मिळण्याची शक्यता आहे. पुणे बाजार समितीमध्ये दिवाळीसाठी शनिवार (ता. ३) पासून राज्याच्या विविध भागातून व्यापाऱ्यांकडून खरेदीला सुरवात होऊन आवकेबरोबरच दर वाढण्याची शक्यता वर्तविण्‍यात येत आहे. दिवाळीसाठी झेंडूचे दर १०० तर शेवंतीचे दर १५० रुपयांपर्यंत जाण्याचा अंदाज शेतकरी आणि फूल व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

पुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची प्रमुख भिस्त असणाऱ्या वर्षभरातील महत्त्वाच्या गणेशोत्सव, दसरा आणि दिवाळी या तीन सणांपैकी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर चांगले दर मिळण्याची आशा आहे. यंदा परतीच्या पावसाने केलेली निराशा आणि दुष्काळी परिस्थितीमुळे फुलांना चांगले दर मिळण्याची शक्यता आहे. पुणे बाजार समितीमध्ये दिवाळीसाठी शनिवार (ता. ३) पासून राज्याच्या विविध भागातून व्यापाऱ्यांकडून खरेदीला सुरवात होऊन आवकेबरोबरच दर वाढण्याची शक्यता वर्तविण्‍यात येत आहे. दिवाळीसाठी झेंडूचे दर १०० तर शेवंतीचे दर १५० रुपयांपर्यंत जाण्याचा अंदाज शेतकरी आणि फूल व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

याबाबत बोलताना शेवंती उत्पादक शेतकरी बी. टी. बांगर (रा. मंचर, ता. आंबेगाव) म्हणाले, ‘मी गणेशोत्सव, दसरा आणि दिवाळीचे नियोजन करून पाच एकर शेवंतीची ठिबक सिंचन आणि मल्चिंग पेपरवर लागवड केली. शेवंतीचा हंगाम शेवटच्या टप्प्यात आला असून, दिवाळीसाठी नियोजन केले आहे. यासाठी दहा दिवसांपूर्वी २५० क्रेट फुले शीतगृहात ठेवली आहे.

आज (शुक्रवार, ता. २) पुणे बाजार समितीमध्ये ६० ते ७० रुपये दर मिळाला. उद्यापासून व्यापाऱ्यांकडून खरेदी सुरू होईल. लक्ष्मीपूजन आणि पाडव्याला चांगले दर मिळतील, अशी आशा आहे. या दोन दिवसांसाठी रविवार, सोमवारी खरेदी वाढेल. यावेळी १५० रुपयांपर्यंत दर मिळतील, अशी आशा आहे. गणपती, दसऱ्याला याच दरम्यान दर मिळाले होते. दुष्काळामुळे जर आवक कमी झाली तर शेवंतीचे दर २०० रुपयांपर्यंतदेखील जाण्याची शक्यता आहे.’

दिवाळीसाठी अर्धा एकर झेंडूची लागवड केली असून, सोमवार, मंगळवारी तोडणी करणार आहे. या दोन दिवसांत ८०० किलो फुले निघतील, असा अंदाज आहे. तर दर ५० ते ८० रुपये मिळतील, असे दीपक तरटे (रा. बावधन, ता. वाई) येथील शेतकऱ्यांनी सांगितले. तर पाणी कमीच असून, आताचे पीक निघेल. मात्र, पुढे पाण्याची टंचाई निर्माण होईल. पुढील पिके घेता येतील की नाही माहिती नाही, असेही तरटे म्हणाले.

इतर ताज्या घडामोडी
डॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार...पुणे ः डॉ. परुळेकर जयंतीनिमित्त ‘सकाळ माध्यम...
कर्जमाफी, ऊसबिलासाठी शेतकऱ्यांचा एल्गारनवी दिल्ली : शेतकरी कर्जमाफी, थकीत ऊसबिल,...
पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी...नाशिक  : पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना...
औरंगाबादमध्ये कांदा १५०० ते ४४०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
मराठवाड्यातील ११ मंडळांत जोरदार पाऊसऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ मंडळांपैकी ३८४...
`प्रक्रिया उत्पादनांवरील १२ टक्के...रत्नागिरी : कोकणातील फळ उद्योगांसाठी...
सांगली जिल्हा बॅंकेच्या ऑनलाइन परिक्षा...सांगली : जिल्हा बॅंकेतील कनिष्ठ लिपिक पदाच्या...
कापूस उत्पादकांचा दसऱ्याचा मुहूर्त...अकोला  ः ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून...
पहुर्जीरा गावात पाण्यात बैलगाडी उलटलीबुलडाणा  : जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात...
चांदा ते बांदा योजनेअंतर्गत विविध करारः...मुंबई: राज्यात चांदा ते बांदा योजनेअंतर्गत...
पुणे जिल्ह्यात हलक्या ते मध्यम...पुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून पुणे...
मालेगाव तालुक्यात पावसामुळे पिके भुईसपाटनाशिक : मालेगाव तालुक्यातील सौंदणे गावाच्या...
पुणे जिल्ह्यात दोन हजार ३५४ पीककापणी...पुणे ः पिकांची उत्पादकता आणि पीकविमा नुकसानभरपाई...
छावण्या सुरू ठेवण्यासाठी शेवगावात आंदोलननगर ः शेगाव तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये अजूनही...
आघाडीचे सरकार आल्यास सरसकट कर्जमाफी ः...जालना : केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या...
नगरमध्ये कांदा प्रतिक्विंटल कमाल पाच...नगर : नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिकच्या सभेत पंतप्रधानांकडून ज्वलंत...नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...
साताऱ्याच्या दुष्काळी भागात दुसऱ्या...सातारा : जिल्ह्यातील दुष्काळी माण, खटाव तालुक्‍...
विधानसभा निवडणुकीसाठी मनसे १०० जागा...मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र...
विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची...मुंबई ः चौदाव्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता...