agriculture news in marathi, farmers friend selection in nagar, maharashtra | Agrowon

नगर जिल्ह्यात ४८१ शेतकरी मित्रांची निवड
टीम अॅग्रोवन
शनिवार, 21 एप्रिल 2018
जिल्ह्यात आवश्‍यक त्या ठिकाणी शेतकरी मित्रांच्या निवडी होतील. कृषी विभागाच्या योजनांच्या अंमलबजावणीत त्यांचा महत्त्वाचा सहभाग असेल. आतापर्यंतचा अनुभव पाहिला तर शेतकरी मित्र हे कृषी विभागासाठी महत्त्वाचा दुवा आहेत.
- भाऊसाहेब बऱ्हाटे, प्रकल्प संचालक, आत्मा, नगर.
नगर  ः कृषी विभागाच्या विविध योजना लोकांपर्यत नेऊन त्याबाबत जनजागृती करण्यासह त्या यशस्वी करण्यासाठी आतापर्यंत ४८१ शेतकरी मित्रांची ‘आत्मा’ने निवड केली आहे. या निवडी ग्रामसभातून झाल्या असून आलेल्या ठरावानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीने मंजुरी दिली आहे. अजून ३१० गावांच्या ग्रामसभांचे ठराव प्राप्त झाले नाहीत. 
 
कृषी विभागामार्फत अनेक महत्त्वाच्या योजना राबवल्या जातात. विशेषतः शेती विकासासह नवीन तंत्रज्ञानाचा वापर व्हावा, यावर शासनाचा भर आहे. कृषी अधिकारी, कर्मचाऱ्यांसह अन्य माध्यमातून योजनांबाबत जागृती व्हावी आणि सरकारकडून आलेल्या निधीचा योग्य विनियोग व्हावा यासाठी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थान यंत्रणेमार्फत (आत्मा) शेतकरी मित्रांची नियुक्ती केली जाते.
 
दोन गावांत एक शेतकरी मित्र निवडला जात आहे. मध्यंतरीच्या काळात शेतकरी मित्रांच्या निवडी रखडल्या होत्या. जिल्ह्यामध्ये १५८१ गावे असून ७९१ शेतकरी मित्रांच्या निवडी करायच्या आहेत. त्यातील आतापर्यंत ग्रामपंचायतीचे ठराव प्राप्त झालेल्या ४८१ शेतकरी मित्रांच्या निवडी केल्या आहेत. 
 
२५ ते ४० वयोगट, किमान दहावीपर्यंतचे शिक्षण, कृषी पदवीधारक असल्यास प्राधान्य, स्वतःच्या शेतीत नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब, गाव पातळीवर नियोजन व विस्तार कार्याची अंमलबजावणी करणारा, गोपालन, शेळीपालनाची माहितीसोबत तंटामुक्ती, बोअरबंदी यांसारख्या उपक्रमातही त्याचा सहभाग, राष्ट्रीय फलोत्पादन, रेशीमशेती, मत्स्यविभाग, पशसंवर्धन आदीच्या योजनांची जाणीव असलेल्या शेतकऱ्यांची निवड करण्याला प्राधान्य दिले आहे.
 
दोन वर्षांसाठी या निवडी असून कृषी विभाग आणि शेतकरी यांचा समन्वयक म्हणून शेतकरी मित्र काम करणार आहेत. निवड केलेल्या शेतकरी मित्राला प्रवासासह अन्य कामाला प्रतिवर्षासाठी सहा हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. जिल्ह्यामधील शेतकरी मित्रांच्या मानधनावर दोन वर्षांत जवळपास ९५ लाख रुपये खर्च होतील. 

इतर ताज्या घडामोडी
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...
पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...
जळगावात लाल कांद्याचे दर आणि आवक टिकूनजळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...
नाशिकमध्ये हिरवी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक ः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
पुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे  : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...
`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
सांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...
‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी   : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
वृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
नांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे ...पुणे  ः  केंद्र सरकारच्या वतीने झिरो...