agriculture news in marathi, Farmers front for Drought Help, crop insurance | Agrowon

पीकविमा, दुष्काळी मदतीसाठी शेतकऱ्यांचा अर्धनग्न मोर्चा
टीम अॅग्रोवन
बुधवार, 19 जून 2019

माळाकोळी,जि.नांदेड : गतवर्षीच्या खरीप पिकांच्या नुकसानीबद्दल शेतकऱ्यांना विमा परतावा मंजूर करावा. दुष्काळी अनुदानाची रक्कम तत्काळ खात्यावर जमा करावी, शेतकऱ्यांना पेरणीसाठी हेक्टरी २५ हजार रुपये मदत द्यावी, आदी मागण्यांसाठी माळाकोळी परिसरातील शेतकऱ्यांनी मंगळवारी (ता. १८) अर्धनग्न मोर्चा काढला. माळाकोळी ते लोहा तहसील कार्यालय असे १३ किलोमीटर अंतर चालत जाऊन हा मोर्चा काढण्यात आला.

माळाकोळी,जि.नांदेड : गतवर्षीच्या खरीप पिकांच्या नुकसानीबद्दल शेतकऱ्यांना विमा परतावा मंजूर करावा. दुष्काळी अनुदानाची रक्कम तत्काळ खात्यावर जमा करावी, शेतकऱ्यांना पेरणीसाठी हेक्टरी २५ हजार रुपये मदत द्यावी, आदी मागण्यांसाठी माळाकोळी परिसरातील शेतकऱ्यांनी मंगळवारी (ता. १८) अर्धनग्न मोर्चा काढला. माळाकोळी ते लोहा तहसील कार्यालय असे १३ किलोमीटर अंतर चालत जाऊन हा मोर्चा काढण्यात आला.

लोहा आणि कंधार तालुक्यात सध्या भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. गतवर्षी शेतकऱ्यांना खर्चापेक्षा कमी उत्पादन झाले. शेतीमालाला भावही मिळाला नाही. यामुळे या भागातील शेतकरी कर्जबाजारी झाले. पिकविमा परतावा, दुष्काळी अनुदान लाभापासून लोहा कंधार तालुक्याला वगळण्यात आले. त्याविरोधात हा मोर्चा काढण्यात आला.

माऊली गिते, अॅड गणेश नागरगोजे, कालीदास मुस्तापुरे, शामसिंह बयास, दत्ता चाटे , सतिश कुलकर्णी, नारायण नागरगोजे, नामदेव कारेगावकर, पांडुरंग नीगरगेजे, नरेंद्र बल्लोरे, विलास केंद्रे, रंगनाथ केंद्रे, बाबुराव मुस्तापुरे, बालाजी तिडके, अनिल तिडके, सोहम गहेरवार आदीसह शेकडो शेतकऱ्यांनी आंदोलनात भाग घेतला. 

इतर ताज्या घडामोडी
गिरणा नदीवरील बलून बंधाऱ्यांसाठी आर्थिक...जळगाव ः जिल्ह्यातील सतत दुष्काळाशी झगडणाऱ्या...
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...
पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...
जळगावात लाल कांद्याचे दर आणि आवक टिकूनजळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...
नाशिकमध्ये हिरवी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक ः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
पुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे  : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...
`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
सांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...
‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी   : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
वृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
नांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...