Agriculture news in marathi Farmers in Gadhinglaj have nine tonnes of soybeans available | Page 2 ||| Agrowon

गडहिंग्लजमध्ये शेतकऱ्यांकडे नऊ टन सोयाबीन उपलब्ध 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 17 मे 2021

यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन टंचाईच्या शक्‍यतेने कृषी विभागाकडून सोयाबीन उपलब्धततेचा आढावा घेतला जात आहे. शेतकऱ्यांना स्वत:कडील बियाणे वापरण्याचे आवाहनही केले जात आहे.

गडहिंग्लज, जि. कोल्हापूर : यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन टंचाईच्या शक्‍यतेने कृषी विभागाकडून सोयाबीन उपलब्धततेचा आढावा घेतला जात आहे. शेतकऱ्यांना स्वत:कडील बियाणे वापरण्याचे आवाहनही केले जात आहे. या पार्श्‍वभूमीवर संकलित केलेल्या माहितीनुसार तालुक्‍यातील ५६६ शेतकऱ्यांकडे सुमारे ९ टन (८९२७ क्विंटल) सोयाबीन शिल्लक आहे. यासह कृषी सेवा केंद्रांकडून २५० टन सोयाबीन बियाण्याचे बुकिंग वेगवेगळ्या कंपन्यांकडे केली आहे. 

तालुक्‍यात सर्वाधिक क्षेत्र (१६८०० हे.) सोयाबीनखालील आहे. उसानंतरचे नगदी पीक म्हणून सोयाबीनकडे पाहिले जाते. तीन ते चार महिन्यांत चांगले उत्पन्न देणारे आणि खर्च कमी असणारे हे पीक दरवर्षी वाढतच आहे. उसाला टनामागे तीन हजार तर सोयाबीनला क्विंटलमागे हंगामात साडेतीन ते चार हजारांचा दर मिळतो. सध्या सोयाबीनचा दर ७५ ते ८० रुपये किलोप्रमाणे आहे. 

यंदा अनेक कंपन्यांनी सोयाबीनचे उत्पादन कमी केल्याचे सांगण्यात येते. निकृष्ट बियाण्यांमुळे गुजरात व मध्य प्रदेशमधील ११ कंपन्यांवर शासनाने बंदी आणली आहे. या पार्श्‍वभूमीवर यंदा सोयाबीन बियाणांची टंचाई जाणवण्याची शक्‍यता वर्तविण्यात येते. ऐन खरीप हंगामात बियाणांची टंचाई होऊ नये यासाठी कृषी विभाग धडपडत आहे. शेतकऱ्यांना स्वत:कडील बियाणेच वापरण्याचे आवाहन केले जात आहे. 

शेतकऱ्यांना आपल्याकडील संपूर्ण सोयाबीन विक्री न करता पेरणी, टोकणीसाठी शिल्लक ठेवण्याचे आवाहन केले होते. शेतकऱ्यांकडे किती सोयाबीन उपलब्ध आहे, याचा आढावा कृषी विभागाने घेतला असता तालुक्‍यातील ५६६ शेतकऱ्यांकडे सुमारे नऊ टन सोयाबीन शिल्लक असल्याचे समोर आले आहे. संबंधित शेतकऱ्यांसह इतर उत्पादकांनाही हे सोयाबीन बियाणे म्हणून वापरता येणार आहे. याशिवाय तालुक्‍यात दहा हेक्‍टरमध्ये उन्हाळी सोयाबीनचे उत्पादन शेतकरी घेत आहेत. 

तसेच तालुका बीजगुणन केंद्राकडील बियाणांचाही वापर तालुक्‍यातील शेतकऱ्यांसाठीच होणार आहे. कृषी सेवा केंद्रांनी विविध कंपन्यांकडे आगाऊ २५० टन बियाण्यांची मागणी नोंदवली आहे. हे नियोजन पाहता तालुक्‍यात सोयाबीनची टंचाई भासणार नाही, अशी परिस्थिती असल्याचे तालुका कृषी अधिकारी हरिदास बोंगे यांनी सांगितले. 


इतर बातम्या
औरंगाबाद :सोयाबीनची सरासरीच्या दीडपट...औरंगाबाद : सोयाबीनची सरासरी क्षेत्राच्या दीडपट...
जळगाव जिल्ह्यात ५७ टक्के पाऊसजळगाव : जिल्ह्यात आतापर्यंत ५७ टक्के पाऊस झाला...
शनिवारपर्यंत सुरू राहणार मका, ज्वारीची...औरंगाबाद : राज्यात रब्बीतील मका व ज्वारी खरेदीला...
परभणी जिल्ह्यात पीकविमा तक्रारींचा...परभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत टोल फ्री...
नाशिक जिल्ह्यात धरणसाठा ४६ टक्क्यांवरनाशिक : गत सप्ताहात जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट...
सोलापूर ःविमा कंपनी शेतकऱ्यांपर्यंत...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात पीकविम्यासाठी भारती...
अकोला ः नैसर्गिक आपत्तीनंतर पीकविमा...अकोला ः पीकविमा हा आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना...
मराठवाड्यात एक लाख हेक्टरवर पीकनुकसानऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठपैकी सहा जिल्ह्यांत...
मंगळवेढ्यात सूर्यफूल पीकविम्यातून वगळलेमंगळवेढा, जि. सोलापूर ः मंगळवेढा तालुक्यात...
कोल्हापूर : पीकविम्याच्या ऑनलाइन...कोल्हापूर : विमा योजनेत सहभागाबाबतीत राज्यात...
नाशिक : पीकविम्याबाबत तक्रारींचा पाढानाशिक : पीकविमा कंपन्यांची असक्षम यंत्रणा......
सिंधुदुर्गात कार्यालय; पण शेतकऱ्यांना...सिंधुदुर्गनगरी : विमा कंपनीचे सिंधुदुर्गनगरी येथे...
रत्नागिरी : पूरबाधित शेतकऱ्यांची...रत्नागिरी : जिल्ह्यातील नदी किनारी भागात पुरामुळे...
नांदेडमध्ये विमा कंपनीचे जिल्ह्याच्या...नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यासाठी...
पावसाची उसंत, सावरण्याची धडपड सुरु पुणे : पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने पावसाचा...
नगर : विमा कार्यालय, हेल्पलाइन नंबरची... नगर : नुकसानीची शेतकऱ्यांना भरपाई मिळावी,...
कोल्हापूर : पूर फुटाने वाढला, इंचाने...कोल्हापूर : जिल्ह्यातील पूरस्थिती हळूहळू कमी होत...
विमा कंपन्यांचा राज्यभर सावळागोंधळ पुणे ः पंतप्रधान पीकविमा योजनेतील खासगी विमा...
कोकणात मुसळधारेची शक्यता पुणे : कोकणसह संपूर्ण राज्यात पावसाचा जोर कमी...
राजकीय नेत्यांनी पूरग्रस्त भागांचे दौरे...मुंबई : राजकीय नेत्यांनी पूरग्रस्त भागाचे दौरे...