agriculture news in marathi Farmers gather at crop insurance company office for crop damage enteries | Page 2 ||| Agrowon

पीक नुकसान नोंदीसाठी विमा कंपन्यांच्या दारी गर्दी

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 10 सप्टेंबर 2021

७२ तासांच्या आत पीक नुकसानीची नोंद करण्यासाठी येत असलेल्या तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांनी अखेर विमा कंपन्यांच्या कार्यालयाकडे धाव घेतल्याने येथे नोंदीसाठी गर्दी होत आहे. 

परभणी : ७२ तासांच्या आत पीक नुकसानीची नोंद करण्यासाठी येत असलेल्या तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांनी अखेर विमा कंपन्यांच्या कार्यालयाकडे धाव घेतल्याने येथे नोंदीसाठी गर्दी होत आहे. 

जिल्ह्यात सोमवार (ता. ६) ते मंगळवार (ता. ७) या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या पीकनुकसानीबात पूर्वसूचना देण्यासाठी विमा कंपनीचा टोल फ्री नंबर लागत नाही. पीकविमा अॅप इंटरनेट रेंज अभावी चालत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ऑफलाइन पूर्वसूचना द्याव्या लागत आहेत.

पीकविमाधारक शेतकऱ्यांना स्थानिक आपत्ती अंतर्गत पीकनुकसानीच्या पूर्व सूचना देण्यासाठी ७२ तासांची मुदत आहे. अतिवृष्टीमुळे पाच एकरांवरील सोयाबीनचे नुकसान झाले आहे. परंतु ऑनलाइन पद्धतीने तक्रारी देताना विमा कंपनीचा टोल फ्री नंबर लागत नाही. 

मोबाईल टॉवरची रेंज नसल्यामुळे अॅपद्वारे देखील पूर्वसूचना देता येईनात असे मांडवा येथील शेतकरी उद्धव कऱ्हाळे यांनी सांगितले. परभणी येथील जुना पेडगाव रस्त्यावरील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात असलेले रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीचे कार्यालय आता दर्गा रोड वरील आझम चौक परिसरात गेले आहे. त्या ठिकाणी ऑफलाइन पीकनुकसान पूर्वसूचना देण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी होत आहे.


इतर ताज्या घडामोडी
शेतकऱ्यांना बियाण्यांबाबत स्वावलंबी...औरंगाबाद : ‘‘शेतकऱ्यांना बियाण्यांच्या बाबतीत...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पंधरा...परभणी  : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील १५...
परभणी जिल्ह्यात अतिवृष्टिग्रस्तांसाठी...परभणी ः जिल्ह्यात जुलै महिन्यात झालेल्या...
लखीमपूर हिंसाचार : आशिष मिश्राला ‘नोटीस...लखीमपूर, उत्तरप्रदेश ः येथील हिंसाचारप्रकरणी...
सत्तेचा दुरुपयोग सगळ्यांनाच दिसतो आहे...सोलापूर : ‘‘निवडणुकी आधी मला ईडीची नोटीस पाठवली,...
बुलडाण्यात खरीप हंगामात ९५० कोटी...बुलडाणा : अतिवृष्टी, पूर परिस्थितीने यंदाच्या...
साडेचार हजार रुपयांचा पहिला हप्ता उसाला...कुडित्रे, जि. कोल्हापूर : यंदा उसाला उत्पादन...
वादळी पावसामुळे ऊस उत्पादकांचे लाखोंचे...आर्णी, जि. यवतमाळ : संततार पाऊस, वादळाचा...
सांगली जिल्ह्यात रब्बीच्या पेरण्या सुरू सांगली : जिल्ह्यात रब्बी हंगामातील पेरण्यांना...
पुणे बाजार समिती सेस प्रवेशद्वारावर ...पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सह...
आंबा, काजू विमा परतावा मंडलनिहाय जाहीर सिंधुदुर्गनगरी : फळपीक विमा योजनेचा परतावा...
कंबोडियाची शाही नांगरणीशेती व्यवसायावर भर देणाऱ्या कंबोडियामध्ये...
कोरडवाहूमध्ये चिंचेची वनशेतीऔषधी गुणांमुळे चिंचेला भारतीय खजूर असे म्हणतात....
छापेमारीच्या हेतूबाबत आयकर विभागच सांगू...मुंबई ः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांशी...
मराठवाड्यातील २३१ मंडलांत पाऊसपरभणी ः मराठवाड्यातील २३१ मंडलांत बुधवारी (ता. ६...
पुणे जिल्हा बँकेतर्फे रब्बी पीककर्ज...पुणे : खरीप हंगामात सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस...
रत्नागिरी : आंबा, काजू विमा परतावा ५३...रत्नागिरी ः वातावरणातील बदलामुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांची वीज कापली; लोकप्रतिनिधी...जळगाव ः जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत...
आंबा प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी...रत्नागिरी ः पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया...
सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षांवर...सोलापूर : नराळे (ता. सांगोला) येथील आरोग्य...