शेतकऱ्यांना मिळाली पंतप्रधानांसोबत चर्चेची संधी

शेतकऱ्यांना मिळाली पंतप्रधानांसोबत चर्चेची संधी
शेतकऱ्यांना मिळाली पंतप्रधानांसोबत चर्चेची संधी

अकोला  : चित्रकूट येथे झालेल्या कार्यक्रमात मलकापूर (जि. बुलडाणा) येथील जय सरदार शेतकरी उत्पादक कंपनीचे दिलीप नाफडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मराठमोळी टोपी व रुमाल घालून सन्मान केला. उत्तर प्रदेशातील चित्रकूट येथे १० हजार शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्यासाठी भारत सरकारच्या योजनेची सुरुवात या वेळी करण्यात आली. या वेळी भारतातील चांगले काम करीत असलेल्या १५ शेतकरी उत्पादक कंपन्यांना आमंत्रित करण्यात आले होते. यामध्ये कृषी मंत्रालयाने मलकापूर येथील जय सरदार शेतकरी उत्पादक कंपनीला सुद्धा आमंत्रित केले होते. मलकापूर तालुक्यातील शेतकरी संचालक दिलीप नाफडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधतानाच महाराष्ट्रीय टोपी व रुमाल घालून त्यांचा सत्कार सुद्धा केला. या वेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर, राज्यपाल आनंदीबेन पटेल व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. नरेंद्र मोदी यांनी जय सरदार शेतकरी उत्पादक कंपनीच्या दालनाला भेट दिली. या वेळी तळणी येथील शेतकरी श्री. नाफडे यांच्यासह माकोडी येथील शेतकरी सुनील चोपडे व मलकापूर येथील कृषी विकास संस्थेचे प्रकल्प समन्वयक रवी पाटील यांनी पंतप्रधानांना कंपनीने विकसित केलेल्या ''संतुष्ट'' या बँडची माहिती दिली. कंपनीच्या माध्यमातून परिसरातील शेतकऱ्यांचा कसा फायदा होत आहे.  याविषयी माहिती दिली. नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रीय कृषी उत्पादने व त्यापासून प्रक्रिया करून तयार होवू शकणारे पदार्थ याची सविस्तर माहिती घेत शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून अधिक चांगले कार्य करण्यासाठी कंपनीच्या सदस्यांना प्रोत्साहन दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com