शेतकऱ्यांनो ऊसतोडणी, वाहतूक स्वत: करा : सहकारमंत्री सुभाष देशमुख

शेतकऱ्यांनो ऊसतोडणी, वाहतूक स्वत करा : सहकारमंत्री सुभाष देशमुख
शेतकऱ्यांनो ऊसतोडणी, वाहतूक स्वत करा : सहकारमंत्री सुभाष देशमुख

सोलापूर  : ‘‘शेतकऱ्यांनी ऊसतोडणी व वाहतूक स्वतः केल्यास त्यांना एफआरपीची पूर्ण रक्कम मिळू शकेल. यंदाच्या हंगामापासून हा प्रयोग करावा,’’ असा अजब सल्ला राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी गुरुवारी (ता. ५) येथे शेतकऱ्यांना दिला. सरकारने पूर्ण एफआरपी देण्यासाठी काय केले, यापेक्षा एफआरपी मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी काय करावे, याचेच मार्गदर्शन देशमुख यांनी केल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. 

राज्य शिखर बॅंकेतर्फे ऊस परिसंवाद आयोजित करण्यात आला. शिखर बॅंकेचे प्रशासक विद्याधर अनासकर, प्रशासकीय सदस्य संजय भेंडे, प्रशासकीय संचालक अविनाश महागावकर, व्यवस्थापकीय संचालक डॉ. अजित देशमुख, मनीष देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, साहेबराव पाटील, अभिजित पाटील यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती. 

शिखर बॅंक विविध विभागांत असे परिसंवाद आयोजित करून शेतकऱ्यांशी संवाद साधू पाहत आहे. त्याच अनुषंगाने हा परिसंवाद झाला. पण शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी त्यांनाच सल्ले देण्याच्या या भूमिकेवर अनेकांनी नापसंती व्यक्त केली. आधीच सातत्याचा दुष्काळ आणि ऊसाला मिळणारा दर, यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. 

कारखान्याकडे अडकलेल्या एफआरपी आणि जादाचा भाव कसा मिळेल, यावर बोलण्यापेक्षा अशा पद्धतीने अजब सल्ले मंत्र्यांकडूनच मिळू लागले, तर काय करणार, असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित होत आहे. उजनीमुळे मुबलक पाणी आहे, पाण्याचा अतिरेकी वापर टाळा, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. त्याशिवाय ऊसशेती कशी करावी, याचेही मार्गदर्शन त्यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com