agriculture news in marathi, farmers to get trade facility | Agrowon

शेतकऱ्यांना व्यापार संधी उपलब्ध होणार
टीम अॅग्रोवन
सोमवार, 25 मार्च 2019

पुणे : राज्यात फळे भाजीपाल्याचे वाढते उत्पादन आणि त्यातुलनेत न मिळणारे दर, यावर उपाययोजना करण्यासाठी राज्य पणन मंडळाने परराज्य शेतमाल विपणन संधीबाबत विविध ९ राज्यांचा अभ्यास अहवाल तयार केला आहे. या अहवालाच्या अंमलबजावणीसाठी पणन मंडळ आराखडा तयार करत असून, थेट शेतकऱ्यांना व्यापार संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी दिली. 

पुणे : राज्यात फळे भाजीपाल्याचे वाढते उत्पादन आणि त्यातुलनेत न मिळणारे दर, यावर उपाययोजना करण्यासाठी राज्य पणन मंडळाने परराज्य शेतमाल विपणन संधीबाबत विविध ९ राज्यांचा अभ्यास अहवाल तयार केला आहे. या अहवालाच्या अंमलबजावणीसाठी पणन मंडळ आराखडा तयार करत असून, थेट शेतकऱ्यांना व्यापार संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी दिली. 

श्री. पवार म्हणाले, की महाराष्ट्र देशामध्ये फळे, भाजीपाला उत्पादनामध्ये अग्रेसर आहे. महाराष्ट्रातून विविध राज्यांमध्ये शेतमाल पाठविला जातो. मात्र हा शेतमाल व्यापाऱ्यांद्वारा पाठविला जातो. यामध्ये शेतकऱ्यांना तुलनेत कमी दर मिळून व्यापारी अधिकचा नफा मिळवित असल्याचे वास्तव आहे. हे टाळण्यासाठी शेतकऱ्यांना परराज्यातील शेतमाल विपणनाच्या थेट संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी पणन मंडळाने ९ राज्यांमध्ये व्यापार प्रतिनिधी पाठविले होते.

या प्रतिनिधींनी प्रत्येक राज्यात एक महिना अभ्यास करून, त्याचा अहवाल पणन मंडळाला सादर केला आहे. या अहवालानुसार विविध राज्यांची विविध फळे आणि भाजीपाल्याची सध्याची गरज, दर, हंगाम, संबंधित राज्यातील व्यापाराच्या संधी याबाबची माहिती संकलित करण्यात आली आहे. त्यानुसार फळे, भाजीपालानिहाय प्रत्येक राज्याचा शेतमाल विपणन संधी आराखडा तयार केला जात आहे. यामध्ये थेट शेतकऱ्यांना कशाप्रकारे सहभागी करून घेता येईल याबाबतचे प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, परराज्यात शेतमाल व्यापार संधी उपलब्ध होण्यासाठी पणन मंडळाने आंतरराज्य शेतमाल रस्ते आणि हवाई वाहतूक अनुदान योजना सुरू केली आहे. या योजनेमध्ये शेतकरी गट, उत्पादक कंपन्याना वाहतूक खर्चाची ५० टक्के अनुदान दिले जात आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीबरोबरच शेतकरी गट, कंपन्यांना परराज्यातील शेतमालनिहाय व्यापार संधी नवीन अहवालानुसार उपलब्ध होणार आहे, असे पवार यांनी सांगितले. 

शेतकऱ्यांची फसवणूक टाळणे शक्य
परराज्यांत थेट शेतमालाची थेट व्यापार संधी उपलब्ध करून देत असताना, व्यापारी, खरेदीदारांकडून होणारी फसवणूक टाळली जाणार आहे. पणन मंडळाने विविध राज्यांतील बाजार समित्या, पणन मंडळाद्वारे पीकनिहाय खरेदीदारांची माहिती संकलित केली आहे. या खरेदीदार आणि शेतकऱ्यांचा समन्वय साधत थेट व्यापार संधी उपलब्ध होणार आहे. यासाठी संबंधित राज्याचे पणन मंडळ समन्वयक असणार असल्याने खरेदीदारांकडून शेतकऱ्याची होणाऱ्या फसवणुकीला आळा बसणार आहे. 

या राज्यांचा केला अभ्यास 
राजस्थान, पंजाब, हरियाना, चंदिगड, दिल्ली, पश्‍चिम बंगाल, आसाम, तमिळनाडू 

या शेतमालाला आहेत संधी 
कांदा, बटाटा, डाळिंब, द्राक्ष, पपई, संत्रा, आंबा, केळी

इतर अॅग्रो विशेष
जलसमस्येच्या आढाव्यासाठी औरंगाबादेत...औरंगाबाद  : मराठवाडा आणि संपूर्ण...
कृषिसेवक भरती प्रक्रियेवरील बंदी...अकोला ः कृषी खात्याने १४१६ जागांसाठी राबवलेल्या...
यंदा ५० साखर कारखाने बंद राहण्याची...पुणे ः राज्यातील उसाचे क्षेत्र आधीच्या...
पन्नास लाख शेतकऱ्यांच्या खात्यात २४...मुंबई : शेतकऱ्यांना दुष्काळाच्या चक्रातून बाहेर...
कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक...पुणे  : ओडिशाच्या किनाऱ्यालगत तयार झालेल्या...
झाडांच्या गोलाईच्या आकारानुसार...पुणे: दुष्काळावर मात करण्यासाठी शेतातील आणि...
राज्य बँक घोटाळाप्रकरणी दोषींवर कारवाई...जळगाव  ः महाराष्ट्र राज्य सहकारी बँक...
पीकविमा योजनेतील झारीतील ...मुंबई : शेतकऱ्यांसाठीच्या पीकविमा योजनेवरून...
मध्य प्रदेश भावांतर योजना बंद करणारनवी दिल्ली : शेतीमालाचे दर कमी झाल्यानंतर...
वाशीम बाजारपेठेत डंका मापारी यांच्या...वाशीम जिल्ह्यातील सोमठाणा येथील विश्वनाथ मापारी...
बोगस खतप्रकरणी ‘लोकमंगल’वर गुन्हापुणे : राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना...
कोकण, विदर्भात पावसाची शक्यतापुणे : तापमानात झालेली वाढ आणि ढगाळ हवामान...
डाळी, प्रक्रिया उद्योगातील ‘यशस्विनी’...बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) परिसरातील तब्बल ८८५...
विषबाधेबाबत गांभीर्य कधी?घटना क्रमांक १ ः तारीख - ४ मे २०१९, ठिकाण -...
समवर्ती लेखापरीक्षणातूनच टळतील...इ.स. पूर्व सहाव्या शतकापूर्वी प्राचीन इजिप्शियन...
सरकारच्या फसव्या आश्वासनांना बळी पडू...जिंतूर, जि. परभणी: शेतकऱ्यांना पीक कर्ज दिले जात...
पाण्याच्या उपलब्धतेनुसार देशमुखांकडून...नांदेड जिल्ह्यातील पारडी (ता. अर्धापूर) येथील...
आदिवासीबहुल भागात ‘निसर्गराज’ची घौडदौड धुळे जिल्ह्यातील हारपाडा (ता. साक्री) या...
बचत गटांची उत्पादने आता ‘ॲमेझॉन’वरमुंबई  : महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळ...
वनस्पतीतील विषारी अंशाने दगावली ४२...नगर : पावसाळ्यात शेती बांध, मोकळ्या रानात...