पुणतांब्यात शेतकऱ्यांच्या मुलींचे अन्नत्याग आंदोलन सुरूच

पुणतांब्यात शेतकऱ्यांच्या मुलींचे अन्नत्याग आंदोलन सुरूच
पुणतांब्यात शेतकऱ्यांच्या मुलींचे अन्नत्याग आंदोलन सुरूच

पुणतांबा, जि. नगर : शेतकरी संपकाळात सरकारने दिलेली अश्वासने पूर्ण केली नाहीत. शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांची सरकारने तातडीने सोडवणूक करावी, यांसह अन्य मागण्यासाठी पुणतांबा (ता. राहाता, जि. नगर) येथे रविवार (ता. ३)पासून तरुणींनी सुरू केलेले अन्नत्याग आंदोलन मंगळवारी सुरूच होते. तहसीलदारांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती केली, मात्र तरुणी अंदोलनावर ठाम राहिल्या. गावकऱ्यांनीही आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. दरम्यान, या आंदोलनकर्त्या मुलींच्या रक्तातील साखरेचे प्रमाण घटले आहे. मुलींच्या आंदोलनाला पाठिंब्यासाठी उद्या पुणतांबे बंद राहणार असून गावात घरांवर काळ्या गुढी उभारण्यात येणार आहे.  राज्यात गेल्या वर्षी ‘शेतकरी संप’ करणयाची हाक पुणतांब्याहून दिली गेली. त्याची वेळी सरकारने अश्‍वासने दिली. वर्षाचा कालावधी उलटून गेला असला तरी, अश्‍वासनाची पूर्तता झाली नाही. त्यामुळे पंधरा दिवसांपूर्वीच येथून पुन्हा एकदा अंदोलनाची हाक दिलेली आहे. पुणतांब्यात (रविवार) निकिता धनंजय जाधव, पूनम राजेंद्र जाधव आणि शुभांगी संजय जाधव या महाविद्यालयीन शेतकऱ्यांच्या मुलींनीच अन्नत्याग अंदोलन सुरू केले, ते तिसऱ्या दिवशीही सुरू होते. तहसीलदार माणिक आहेर यांनी अंदोलनस्थळी जाऊन मुलींची भेट घेतली. ‘मागण्या शासनाला कळवतो, उपोषण सोडवा’ अशी विनंती केली, मात्र मुलींनी विनंती धुडकावत ‘मागण्या मान्य होईपर्यंत माघार घेणार नाही,’ असे स्पष्ट केले. गावकऱ्यांनी उपोषणाला पाठिंबा दिला आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com