agriculture news in marathi, Farmers give their first victim of power ः shetty | Agrowon

सत्तेत येणारे पहिला बळी शेतकऱ्यांचा देतात
टीम अॅग्रोवन
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

राशिवडे बुद्रुक, जि. कोल्हापूर : सत्तेत येणारे सगळे स्वार्थासाठी पहिला बळी शेतकऱ्यांचा देत आले आहेत. हे ओळखून आपल्या कृषी संस्कृतीला जपण्यासाठी प्राप्त परिस्थितीतून व्यावसायिक स्वरूप द्यावे, असे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केले. शिवाजी विद्यापीठ व भोगावती महाविद्यालय कुरुकली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शेती व शेतीपूरक उद्योग कार्यशाळेच्या उद्‌घाटन प्रसंगी ते बोलत होते.

राशिवडे बुद्रुक, जि. कोल्हापूर : सत्तेत येणारे सगळे स्वार्थासाठी पहिला बळी शेतकऱ्यांचा देत आले आहेत. हे ओळखून आपल्या कृषी संस्कृतीला जपण्यासाठी प्राप्त परिस्थितीतून व्यावसायिक स्वरूप द्यावे, असे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केले. शिवाजी विद्यापीठ व भोगावती महाविद्यालय कुरुकली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शेती व शेतीपूरक उद्योग कार्यशाळेच्या उद्‌घाटन प्रसंगी ते बोलत होते.

खासदार शेट्टी म्हणाले, ‘हजारो वर्षांपासून सुरू असलेला शेतकऱ्यांचा संघर्ष यापुढेही संपणार नाही हे वास्तव आहे. यात आमच्यासारखे शेतकरी नेते फक्त मैलाचे दगड ठरतील. सतेत असणाऱ्यांच्या आपेक्षा पूर्ण करणारे सत्ताधीश जोवर देशात आहेत. तोपर्यंत बळिराजाला न्यायासाठी झगडावे लागेल. प्रतिकार न करणाऱ्यांचे बळी दिले जातात म्हणून शेतकऱ्यांचेच बळी जातात.’

या वेळी सुवर्ण कोकणचे अध्यक्ष सतीश परब म्हणाले, ‘शेतकऱ्यांना हमीभाव दिल्यास त्यांना आंदोलन करावे लागणार नाही. शासनाच्या शेतीसाठीच्या दोन योजनाही शेतकऱ्यांना माहीत नाहीत'' त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. आता बळिराजाने शेतीकडे उदरनिर्वाहाचे साधन म्हणून न पाहाता व्यवसाय म्हणून स्वीकारावे. पारंपरिकता सोडून शेतीपूरक उद्योग उभारावेत. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. दिनकर पाटील यांनी केले. प्रा. डॉ. जालंदर पाटील यांनी स्वागत केले.

भोगावती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जयसिंग हुजरे, उपाध्यक्ष सर्जेराव पाटील यांनी सत्कार केला. या एकदिवसीय कार्यशाळेमध्ये सुवर्ण कोकण फाउंडेशनचे अध्यक्ष सतीश परब यांनी शेतीतील विविध उद्योजकीय संधी, सौ. रूपाली जाधव यांनी मशरूम लागवड या विषयावर पहिल्या सत्रात व्याख्यान दिले.

दुसऱ्या सत्रात डॉ. चंद्रकांत आपशिंगे यांचे ‘कुक्कुट पालन’ तर महिंद्र पाचारने यांचे ‘शेळी पालन’ या विषयावर व्याख्यान झाले. यानंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नांना तज्ज्ञांनी उत्तरे दिली. संचालक बंडोपंत वाडकर यांनी आभार मानले.

इतर अॅग्रो विशेष
अचूक आकडेवारीचा काळ आठव्या आंतरराष्ट्रीय कृषी सांख्यिकी परिषदेत...
उद्यापासून हंगाम सुरु, पण ऊसतोड बंदच !मुंबई / पुणे  ः राज्यातील यंदाचा ऊस गाळप...
विदर्भ, मराठवाड्यात गारठा वाढलापुणे   : किमान तापमानात घट होत असल्याने...
खतमाफियांमुळे शेतकऱ्यांची मोठी लूटपुणे : बोगस मिश्रखतांचे उत्पादन व विक्री करणाऱ्या...
भरताच्या वांग्यासह दादर ज्वारीसाठी...खानदेशकन्या तथा आपल्या कवितेतून शेतीचे...
बॅंक एकत्रीकरण एक अनावश्‍यक पाऊलभारताने १९९० मध्ये नवीन आर्थिक धोरण स्वीकारले....
भूगर्भ तहानलेलाच!रा ज्यात या वर्षी जोरदार पाऊस झाला. अनेक भागांत...
साखर उद्योगाने मूल्यपदार्थांकडे वळणे...पुणे: देशाच्या ग्रामीण अर्थकारणात मोलाचा वाटा...
देशात कापूस उत्पादन घटणारजळगाव ः देशात सर्वाधिक कापूस उत्पादित करणाऱ्या...
राष्ट्रीय कृषिमुल्य आयोगासमोर ऊस...पुणे : कायद्यातील उणिवांचा फायदा घेत ऊस उत्पादक...
नुकसानग्रस्तांसाठीचे दोन हजार कोटी...मुंबई: राज्यातील ३४ जिल्ह्यांतील ३२५ तालुक्‍...
थंड वारे वाढणार...पुणे : राज्यात किमान तापमानातचा पारा १६ अंशांच्या...
दर्जेदार दुग्धोत्पादनांचा ‘गारवा’ ब्रॅंडकोल्हापूर जिल्ह्यातील मातब्बर दूध संघ दुग्धजन्य...
शेवगा कसे ठरले 'या' शेतकऱ्याचे हुकमी...कायम अवर्षण स्थिती असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील...
'पणन'ची २७ पासून कापूस खरेदी नागपूर ः सिसिआयची खरेदी सुरूच असली तरी कापूस पणन...
शेतीला व्यावसायिक दर्जा आवश्यक: सुहास...पुणे: भावनिकतेच्या आधारे शेती न करता शेतकरी...
कुजलेल्या तुराट्यांच्या झाडण्याही होणार...परभणी ः यंदा तुरीचं पीक लई जोरात आलं होतं. चांगली...
सांगली जिल्ह्यातील अंडी उत्पादकांना...सांगली ः एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांत...
मानवी, शेती आरोग्यासाठी नैसर्गिक शेतीचा...मानवी व शेतीचे आरोग्य याबाबत अधिक जागरूक झालेल्या...
अभ्यास, नियोजनातून देशी दुग्धव्यसाय...भाजीपाला शेती करण्याबरोबरच रेशीमशेती आणि...