पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल सोयाबीनकडे

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  ः जून महिन्यात उशिरा आलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांशी शेतकऱ्यांनी पीक बदल केला आहे. शेतकरी तूर, मूग, उडीद या पिकांऐवजी सोयाबीन पिकाकडे वळले आहेत. त्यामुळे सोयाबीनच्या क्षेत्रात तिपटीहून अधिक वाढ झाल्याचे चित्र आहे. 

यंदा हवामान विभागाने चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविला. जिल्ह्यात सुरवातीच्या काळात काही भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. त्यानंतर पावसाचा खंड पडला. त्यामुळे शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा होती. आतापर्यंतच्या पावसाचे प्रमाण कमी कालावधीत अधिक पाऊस असे आहे. त्यातही पश्‍चिम पट्ट्यातील बहुतांशी भागात पाऊस झाला. पूर्व पट्ट्यात सुरवातीपासून पावसाचे प्रमाण कमी असून जून, जुलै आणि सप्टेंबरमध्ये बहुतांशी वेळा पावसाने ओढ दिली. त्यामुळे शेतकऱ्यांनी इतर पिकांऐवजी कमी कालावधीच्या पिकांवर भर दिला.  

जिल्ह्यात सोयाबीनचे सरासरी क्षेत्र पाच हजार २०० हेक्टर आहे. त्यापैकी १९ हजार ३७ हेक्टर म्हणजेच ३६६ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षीही १७ हजार ९४६ हेक्टरवर म्हणजेच ३४५ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली. २०१७-१८ मध्येही खरिपात सोयाबीनची १८ हजार १६५ हेक्टरवर पेरणी झाली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जवळपास एक हजार ९१ हेक्टरने क्षेत्रात वाढ झाली आहे. 

जुन्नर तालुक्यात सोयाबीनची सर्वाधिक सुमारे सहा हजार ६१८ हेक्टरवर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षीही जुन्नरमध्ये सात हजार ४२ हेक्टरवर पेरणी झाली होती. खेडमध्ये यंदा सहा हजार १४७ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी ती पाच हजार ७४२ हेक्टरवर झाली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत खेडमध्येही जवळपास ४०५ हेक्टरने क्षेत्र वाढले आहे. चालू वर्षी भोरमध्येही सोयाबीन क्षेत्रात चांगलीच वाढ झाली आहे.  

तालुकानिहाय सोयाबीन पेरणी (हेक्टरमध्ये) 
तालुका गेल्या वर्षीचे क्षेत्र यंदाचे पेरणी क्षेत्र
जुन्नर  ७०४२ ६,६१८
खेड ५७४२ ६१४७ 
भोर २२०९ ३५०२ 
आंबेगाव १७९२ १७०९
बारामती ४३८ ३१६ 
हवेली २३६ २०५
पुरंदर १९७ ६१
मावळ १९५ ३६६
वेल्हा ३५ ३२
मुळशी  २५ ३४
शिरूर २० १६ 
दौंड १४ 
इंदापूर १८
एकूण   १७,९४६ १९,०३७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com