पालखीमार्गाच्या भूसंपादनाबाबत शेतकऱ्यांचे आजपासून उपोषण

माळीनगर, जि. सोलापूर : पालखीमार्गाच्या भूसंपादनासंदर्भात वेळोवेळी हरकती, निवेदने देऊन सुध्दा अकलूज प्रांत कार्यालयाकडून त्याबाबत लेखी उत्तर मिळत नाही.
 Farmers go on hunger strike from today regarding land acquisition of Palkhi Marg
Farmers go on hunger strike from today regarding land acquisition of Palkhi Marg

माळीनगर, जि. सोलापूर  : पालखीमार्गाच्या भूसंपादनासंदर्भात वेळोवेळी हरकती, निवेदने देऊन सुध्दा अकलूज प्रांत कार्यालयाकडून त्याबाबत लेखी उत्तर मिळत नाही. त्यामुळे महाळूंग व तोंडले येथील शेतकरी आजपासून (ता.२) अकलूज प्रांत कार्यालयासमोर तीन दिवसाचे उपोषण करणार आहेत.

या दोघांसह पालखी मार्गावरील अकलूज, माळीनगर, सवतगव्हाण, तांबवे, महाळूंग या पाच गावातील शेतकऱ्यांनी दोन सप्टेंबरला प्रशासन व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कामकाजाच्या निषेधार्थ एक दिवसाचे उपोषण केले होते. प्रांताधिकारी अकलूज यांच्यासह अन्य प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्या उपोषणाची योग्य ती दखल न घेतल्याने एका महिन्यात दुसऱ्यांदा उपोषण करण्याची वेळ या शेतकऱ्यांवर आली आहे. 

म्हसवड-कुर्डुवाडी व संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील बाधित शेतकरी नागनाथ विष्णुपंत बधे (महाळूंग) व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरील शेतकरी पोपट विठ्ठल चव्हाण (तोंडले) २ ते ४ ऑक्टोबर असे तीन दिवस उपोषण करणार आहेत.

याबाबत त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार राम सातपुते, शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, जिल्हाधिकारी सोलापूर यांच्यासह प्रशासकीय व पोलिस अधिकाऱ्यांना ई-मेलद्वारे निवेदने पाठवली आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com