सोयाबीन बियाणेप्रकरणात शेतकऱ्यांना एक कोटीची भरपाई

विभागातील पाच जिल्ह्यांत सोयाबीन बियाणे उगवणविषयी तक्रारींचा अक्षरशः पाऊस पडला. विभागात ३१ हजार १०८ तक्रारी आजवर करण्यात आल्या आहेत.
soybean
soybean

अमरावती : विभागातील पाच जिल्ह्यांत सोयाबीन बियाणे उगवणविषयी तक्रारींचा अक्षरशः पाऊस पडला. विभागात ३१ हजार १०८ तक्रारी आजवर करण्यात आल्या आहेत. या प्रकरणात कृषी विभागाच्या दबावानंतर कंपन्यांकडून शेतकऱ्यांना तब्बल एक कोटी १७ लाख ६० हजार ६०७ रुपयांची भरपाई देण्यात आली आहे.  या वर्षीच्या हंगामात सुरुवातीला चांगला पाऊस झाला त्यानंतर पावसाने उघडीप दिल्याने सोयाबीन उगवन विषयक तक्रारी वाढल्या. त्यासोबतच अनेक भागात सदोष बियाण्यांचा पुरवठा झाल्याने त्यामुळे देखील उगवणशक्ती प्रभावीत झाली. अमरावती विभागातील अकोला, वाशिम, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ या पाच जिल्ह्यात सर्वाधिक ३१ हजार १०८ तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्यातील १२२४६ तक्रारी एकट्या यवतमाळ जिल्ह्यातील असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. यवतमाळ जिल्ह्यात कापसाखालील लागवड क्षेत्र कमी करून शेतकऱ्यांनी सोयाबीन लागवड केली आहे. परंतु यावर्षी निकृष्ट दर्जाचे बियाण्याचा पुरवठा झाल्याने शेतकऱ्यांना उगवण विषयक समस्येचा सामना करावा लागला. यवतमाळ जिल्ह्यात १२२४६ तक्रारी सादर करण्यात आल्या आहेत. त्यातील ११ हजार १९९ प्रकरणात कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली. त्याआधारे आठ हजार ७७१ प्रकरणात बियाणे सदोष असल्याचा अहवाल देण्यात आला आहे.  कृषी विभागाने कंपन्यांना भरपाई देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार १२८ शेतकऱ्यांना १७२ बियाणे बॕगचा परतावा करण्यात आला. बियाणे पुरवठा करणे शक्य नसलेल्या ठिकाणी कंपनीकडून रोख रक्कम परत करण्यात आली आहे. त्यानुसार यवतमाळ जिल्ह्यात ४७४ शेतकऱ्यांना ४४ लाख ९३ हजार ३०० रुपये देण्यात आले आहेत. बुलढाणा जिल्ह्यात ३०६७ प्रकरणांपैकी १६५९ अहवाल सदोष बियाणे विषयक आहेत. यातील १३० शेतकऱ्यांना १४२ बियाणे बॅग तर ४७५ शेतकऱ्यांना २२ लाख ८६ हजार ४३५ रुपये परतावा देण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यात तक्रारींची संख्या सहा हजार ७२७ आहे. त्यातील ६३०२ प्रकरणात पंचनामे पूर्ण झाले असून पाच हजार ३९७ प्रकरणात बियाणे सदोष असल्याचा अहवाल देण्यात आला आहे. ३८ शेतकऱ्यांना १७९ बॅग तर ४४ शेतकऱ्यांना पाच लाख २४ हजार ४६० रूपये परतावा दिला आहे.  वाशीम जिल्ह्यात चार हजार ३३४ तक्रारी असून  ८९ प्रकरणात सदोष बियाणे आढळले असून ४२ शेतकऱ्यांना २३० बॅग परतावा देण्यात आला आहे. वाशीम जिल्ह्यात रोख परतावा देण्यात आला असल्याची माहितीही सूत्रांनी दिली. अमरावती जिल्ह्यात चार हजार ७३४ तक्रारींपैकी ४५४० प्रकरणात शहनिशा करण्यात आली. यातील २९५२ प्रकरणांमध्ये बियाणे सदोष आढळून आले.  त्याआधारे २५८ शेतकऱ्यांना ८६७ बियाणे बॅग तर ५१८ शेतकऱ्यांना ४४ लाख ५६ हजार ५१२ रुपये इतका परतावा देण्यात आला आहे.

कंपन्यांवर कारवाई एक कोटी रुपयांची भरपाई मिळवून देणाऱ्या कृषी विभागाने कंपन्यावर न्यायालयीन दावेही दाखल केले आहेत. बियाणे कायद्यातील २-ए नियमानुसार ११ दावे दाखल करण्यात आले आहेत. तपासणीअंती बियाणी नमुने बाद केल्याने अशा प्रकरणात ६८ कोर्ट केसेस करण्यात आल्या आहेत. तर चार प्रकरणात पोलिसांमध्ये फौजदारी गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

विभागातील स्थिती 

तक्रारी  ३१ हजार १०८
पंचनामे  २९ हजार ४४२
सदोष बियाणे १८ हजार ८६८
परतावा   १९७० बियाणे बॕग
रोख परतावा  १ कोटी १७ लाख  ६० हजार १०७ रुपये

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com