शेततळे, ट्रॅक्टरचे अनुदान मिळाले

शेततळे अस्तरीकरणाच्या एकूण अनुदानापैकी ४२ टक्‍के रक्‍कम दोन वर्षांपासून मिळणे बाकी होती. कृषी विभागाकडे वारंवार जाऊनही न्याय मिळत नव्हता. ‘ॲग्रोवन’ने याविषयी वृत्त प्रकाशित केल्यानंतर व शेतकऱ्यांनी कृषी आयुक्‍तालयावर धडक दिल्याने आशा निर्माण झाली. त्यामुळे न्याय मिळाला आमची दिवाळी गोड झाली. - निवृत्ती कागदे, लाखेगाव, ता. पैठण जि. औरंगाबाद
ट्रॅक्टर
ट्रॅक्टर

औरंगाबाद: जिल्ह्यातील दोन वर्षांपासून अस्तरीकरणाचे तसेच २०१८-१९ मधील सामूहिक शेतततळ्याचे व ट्रॅक्‍टरचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आल्याने जिल्ह्यातील पाचशेवर शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाली आहे. यासाठी ‘ॲग्रोवनने’ वृत्त प्रकाशित केले होते.   औरंगाबाद जिल्ह्यातील जळपास २८७ शेतकऱ्यांचे २०१७-१८ मधील शेततळे अस्तरीकरणाच्या एकूण अनुदानित रकमेपैकी जवळपास ४२ टक्‍के शेतकऱ्यांना मिळणे बाकी होते. याविषयी वारंवार पाठपुरावा करूनही अनुदानित अपेक्षीत पूर्ण रक्‍कम मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी थेट कृषी आयुक्‍तालयावर धडक देऊन आयुक्‍तांकडेच याविषयीचे गाऱ्हाणे मांडले होते. त्या वेळी त्यांना शिल्लक असलेली अनुदानाची रक्‍कम मिळवून देण्याबाबत प्रयत्न करण्याविषयी आश्वस्त करण्यात आले होते. याविषयी वेळोवेळी वृत्त प्रकाशित करून ‘ॲग्रोवन’ने शेतकऱ्यांना अनुदानाची रक्‍कम किती मिळायला हवी होती, किती मिळाली, त्याविषयी शेतकऱ्यांचे काय म्हणने आहे याविषयीचा उहापोह केला होता. अखेर या प्रयत्नांना यश आले आल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.  दोन दिवसांपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन वर्षांपूर्वीचे अस्तरीकरणाचे बाकी असलेले पैसे जमा होणे सुरू झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. याविषयी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या संबंधीतांशी संपर्क साधला असता त्यांनी २०१७-१८ मध्ये शेततळे अस्तरीकरणाची शिल्लक असलेली ४२ टक्‍के रक्‍कम २८७ शेतकऱ्यांच्या खात्यावर जवळपास ८२ लाख ९२ हजार रुपये जमा करण्यात आली. शिवाय २०१८-१९ मधील सामूहिक शेततळ्याचे १३६ शेतकऱ्यांचे ३ कोटी ८५ लाख, व ७४ शेतकऱ्यांचे २ कोटी २० लाख अनुदान, ४० शेतकऱ्यांचे ट्रॅक्‍टरचे ३५ लाख रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आल्याची माहिती दिली. या अनुदानाच्या रकमेमुळे दिवाळी गोड होण्यास मदत झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com