पपई
पपई

पपईला फळधारणा न झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान

अकोला ः नांदुरा तालुक्‍यातील मोमीनाबाद येथील सचिन काळे व सुरेश गवळे यांनी लागवड केलेल्या पपईला फळधारणा न झाल्याने हजारोंचे नुकसान झाले. याप्रकरणी तज्ज्ञांनी तीन महिन्यांपूर्वीची शेतावर जाऊन झाडांची पाहणी केली. मात्र अद्याप त्याचा अहवाल दिला नसल्याने शेतकऱ्यांना पुढील पावले उचलण्यासाठी मारक ठरले आहे. शेतकरी या अहवालाबाबत संपर्क करीत असून त्यांना कुठलाच प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.  मोमीनाबात येथील सचिन काळे व सुरेश गवळे यांनी मार्च २०१७ मध्ये सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील एका नर्सरीतून दोन हजार पपईची रोपे घेतली होती. या रोपांची लागवड करून व्यवस्थित व्यवस्थापन केले. लागवडीनंतर शिफारशीत खते दिली. किडनाशकांच्या फवारण्या घेतल्या. मात्र एवढे करूनही सुमारे ५० टक्के झाडे नर जातीची निघाली. त्यांना फळधारणाच झाली नाही. यामुळे दोन्ही शेतकऱ्यांचे हजारोंचे नुकसान झाले. याप्रकरणी शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे रीतसर तक्रार केली. त्यांनी स्थळ पंचनामा केला असता ३८ टक्के झाडे वांझ असल्याचे नमूद केले. याबाबत शेतकऱ्यांनी संबंधित बियाणे कंपनी, नर्सरीकडे वारंवार पाठपुरावा केला. परंतु त्यांना आता प्रतिसाद मिळत नसल्याचे म्हणणे आहे.  मध्यतंरी तज्ज्ञांनी पाहणी केली. त्याला आता तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटला. यादरम्यान पाहणीचा अहवालसुद्धा शेतकऱ्यांना मिळालेला नाही. एकीकडे शेतकरी पारंपरिक पीकपद्धतीतून बाहेर पडण्यासाठी धडपडत असताना दुसरीकडे अयोग्य बियाणे पुरवून फसवणुकीचे प्रकार घडत आहेत. शेतकऱ्यांनी तातडीने न्याय देण्याची मागणी कृषी विभागाकडे केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com